Life-Fantasy..!
"माणसांच्या गर्दीत माणसांचं होवून जाणे ते भर माणसांच्या गर्दीत एकटं वाटत राहणे" ही अवस्था खूप भयाण अन् आपल्याला खूप वाईट तर कधीतरी खूप सेफ,एकांताचं आपल्याला व्यसन लागावं,त्या विचारांची सवय पाडायला लावणारी ही अवस्था आहे..!
भर माणसांच्या गर्दीत जेव्हा आपण भटकायला जातो अन् जेव्हा एका त्या सेफ म्हणजे माणसांच्या सहवासापासून पण त्यांच्यात उपस्थित असल्याचं अंतर राखून कोपऱ्यात असलेला बाकडा जेव्हा रोज आपल्या बसण्याची जागा बनते ; तेव्हा आपण खरंच माणसांच्या गर्दीत एकटे पडलो आहो अन् ते ही आपल्यामुळेच..!
दूरवर एकांतात बसून माणसांना न्याहाळत राहणं.त्यांच्याजवळ जेव्हा काही बोलण्याची वेळ येते तेव्हा आपले शब्द अडखळत राहणं,हे वाईट आहे.मनावर स्वार झालेला एकांत इथवर आपल्या मनावर राज्य करतो अन् मग आपले मन आपले राहत नाही.यात माणूस आयुष्यातून सुद्धा उठून जावू शकतो,नाहीतर कायमचा एकांताचा होवून जावू शकतो..!
सध्या माहीत नाही यातील कुठल्या स्टेजला आहे.हल्ली एक गोष्ट खूप सातत्याने वाटते की,कुठल्याश्या एकांत ठिकाणी एकसंथपणे वाहणाऱ्या,खाचखळगे असलेल्या अन् पाण्याच्या प्रवाहाने गुळगुळीत झालेल्या दगड धोंड्यातून वाहणाऱ्या वाहत्या नदीच्या अगदी जवळच एक छोटंसं घर असावं पण खूप जुनं जिथं आधुनिक असं काहीच नसावं.
खेरीच आयुष्यभर वाचनाची भूक भागवेल इतक्या पुस्तकांच्या अन् एका जुन्या काळातील टेबललॅम्प अन् एका मोडकळीस आलेल्या खुर्चीच्या..!
Fantasy म्हणून आपण आपल्याला आवडत्या अनेक गोष्टींना कल्पनेचा आधार देऊन रंगवत असतो.कधीतरी या गोष्टी सत्यात उतरता तर कधी त्या कल्पनेतच राहून जातात असच पुस्तकांच्या बाबतीत खूप काही मनात आहे..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा