एक साथी और भी था..! ❤️
काल सायंकाळी सहज यूट्यूब स्क्रोल करत असताना शहीद शुभम सूर्यकांत मुस्तापुरे (वय २०) याचा व्हिडिओ बघण्यात आला अन् कालची संपूर्ण रात्र विचार करण्यात खूप सहज निघून गेली..!
चौथीमध्ये असतांना संपूर्ण परभणी जिल्ह्यातून शिष्यवृत्ती परीक्षेत पहिला येतो.पुढे १८ व्या वर्षी पालघर जिल्ह्यातून पोलिस भरतीला उतरतो,पहिल्याच भरतीत पहिल्याच प्रयत्नात तो तिथे सिलेक्ट होतो.
परंतु देशसेवेचं असलेलं वेड अन् देशाच्या सेवेसाठी इंडियन आर्मीमध्ये जाण्याचं त्याचं स्वप्न.त्यासाठी रात्रंदिवस दिवस घेतलेली मेहनत,उर फुटेस्तोवर पळत राहणं,व्यायाम करणं..!
पुन्हा वयाच्या १९ व्या वर्षी नांदेड येथे पहिल्याच आर्मी भरतीसाठी उतरणं,तिथेही पहिल्याच प्रयत्नात सिलेक्ट होणं अन् देशसेवेचं आपलं स्वप्न साकार झालं,इंडियन आर्मीमध्ये आपल्याला नोकरी लागली म्हणून त्या आनंदात त्याच्या संपूर्ण गावाला गावजेवण देणं..!
आर्मी ट्रेनिंग नंतर "जम्मू काश्मीर" येथील "पुंछ" येथील "कृष्णा घाटी सेक्टर" मध्ये तो ड्युटीसाठी जॉईन होणं.काही दिवसांच्या सेवेनंतर पाकिस्तानी सैनिकांशी चकमक होणं,बॉर्डरच्या आत ३२ किमी जावून देशासाठी लढत राहणं..!
घरच्यांना फोन करून शेवटचं बोलणं,काय बोलावं वीस वर्षाच्या मुलाने ते वाक्य ऐकले अन् डोळ्यातून अश्रू ओघळले..!
"तात्या मी इथून पुन्हा आलो तर तुमचा नाहीतर भारत मातेचा..!"
अन् पुढच्या काही क्षणात तो आपल्या भारत मातेचा सेवेत आपल्या प्राणाची बाजी लावतो अन् शहीद होतो..!
काय बोलावं या देशभक्तीला,एकीकडे आपण विसाव्या वर्षी स्वतःचे निर्णय घेऊ शकत नसतो.तिथं हा शुभम इतका मोठा निर्णय घेऊन भारत मातेच्या सेवार्थ शहीद होतो,हे देशसेवेचं वेड आपसूक येत नाही..!
या वेडासाठी नेहमीच तू आठवणींत असशील..!
खूप काही लिहायचं होतं पण पुढे नाही लिहू शकलो..!
आज चार वर्षांनीसुद्धा तुझी आठवण तितकीच येते..!
काही दिवसांपूर्वी IAS होण्यासाठी असलेला संघर्ष एका वेब सिरीजमधून बघितला एरवी तो जवळून अनुभवला आहेच.त्या वेब सिरीज मधले एक वाक्य पक्के डोक्यात बसले होते..!
हम बहोत बाद में रिलाईज करते हैं,
की हम देश के काम तो आ रहे हैं,
पर हम पर गर्व करनेवाला कोई नहीं हैं..!
असं कधीच होणार नाही कारण तुमचं कार्य खूप उंचीचं आहे,जिथं गर्व हा शब्द छोटा वाटतो..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा