Aurangabad - Industrial Hub..!
औरंगाबाद शहर आॅरीक सिटीच्या माध्यमातून एकीकडे देश-जगतातील उद्योगविश्वात महत्त्वाचे शहर म्हणून नावारूपास येण्याचा प्रयत्न करत आहे.आॅरीक सिटीच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे,औरंगाबाद शहराच्या भूमीवर येणारे विविध मोठाले देश विदेशातील प्रकल्प यामुळे भविष्यात औरंगाबाद शहराचे नाव उद्योग विश्वात देशातीलच नव्हे तर जगातील महत्वाचे शहर म्हणून नावारूपास येणारे शहर ठरणार आहे..!
औरंगाबाद शहराला लागून असलेल्या औद्योगिक वसाहतीत एमआयडीसी व तेथील कंपन्यांचा विचार केला असता,औरंगाबाद परिसरात रेल्वे स्टेशन एमआयडीसी ही सर्वाधिक पहिली औद्योगिक वसाहत,त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी,पैठण रोड एमआयडीसी,वाळूज एमआयडीसी आणि आशिया खंडातील प्रमुख एमआयडीसी विश्वात ज्या एमआयडीसीचे नाव प्रामुख्याने उच्च स्थानावर घेतले जाते,ज्या ठिकाणी देश विदेशातील विविध नामांकित कंपन्याचे प्रॉजेक्ट उभारले गेले आहेत अशी शेंद्रा एमआयडीसी..!
सोबतच आता नव्याने स्थापन झालेली ऑरीक आधुनिक औद्योगिक वसाहत अशा पाच औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आहे...
महाराष्ट्राची "ऐतिहासिक राजधानी" म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहराची आता नवी ओळख "ऑटोमोबाईल इंडस्ट्रियल सिटी हब" म्हणुन हे शहर नव्याने नावारूपाला येत आहे...
याच वेळी शहराचा इतर बाबतीत विचार केला तर समोर येणारा चेहराही विचार करण्यासारखा आहे,एकीकडे औरंगाबाद शहरातील एमआयडीसी भागात कोरोना सदृश्य काळ असो किंवा त्यामुळे उद्योग जगतात मंदावलेली अर्थव्यवस्था,ढासळलेली परिस्थिती,त्यामुळे औरंगाबाद शहरातील उद्योग विश्वात मोठ्या प्रमाणात झालेल्या हालचाली,आपला उद्योग कोरोना नंतरच्या काळात पुन्हा सुरळीत करण्यासाठी घेतलेली उद्योजकांनी मेहनत..!
शहराचे गलिच्छ राजकारण,देश विदेशातील नामांकित कंपन्या जेव्हा प्रोजेक्ट आखण्या हेतुस्पर बोलण्या करता येतात त्यावेळी दिली जाणारी वागणूक,त्यामुळे औरंगाबाद शहरात उद्योग विश्वात येणारे नवीन-नवीन प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यात जात आहेत.
औरंगाबाद सोबतच शेजारचे परभणी,बीड,जालना,या आसपासच्या जिल्ह्यातील बरेच तरुणांना रोजगार निर्माण झाला आहे.ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्यालगत शेंद्रा-बिडकीन येथे आशिया खंडातील बऱ्यापैकी मोठा प्रोजेक्ट असलेली ऑरीक ही आधुनिक औद्योगिक वसाहत निर्मानाचे पूर्ण होवून हजारो हाताना रोजगार मिळाला आहे.
ज्या कंपन्या सध्या औरंगाबाद लगत असलेल्या औद्योगिक वसाहतीत आहे त्यांना निर्माण होणाऱ्या इतर अनेक समस्या हे शहराच्या विकासात अडथळा आणणारे ठरत आहे.कोरोनाच्या या अतिशय वाईट काळात इंडस्ट्रियल विश्वातील हालचाल बघितली तर समोर येणारी अवस्था ही अत्यंत वाईट अशी होती...
या काळात मजूर वर्ग आप-आपल्या गावी स्थलांतरित झाला.पुढे जेव्हा लॉकडाऊन शिथिल करून काही धोरणे आखून देत कंपन्यांना चालू करण्यात आले त्याच वेळी वेळीत मजूर न भेटल्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान असो,ज्या ठिकाणी आठ तासांच्या कामाच्या तीन शिफ्ट कंपनी मध्ये चालत होत्या त्याच ठिकाणी बारा तासांच्या दोन शिफ्ट कराव्या लागल्या.त्यामुळं मजूर वर्गाच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या,कच्चा माल वेळेत न मिळाल्यामुळे,कामात येणाऱ्या असंख्य अडचणी यामुळे या काळात इंडस्ट्रियल विश्वात खूप नुकसान झाले आहे...
औरंगाबाद शहरात ज्याप्रमाणात ऑटोमोबाईलशी निगडित कंपन्यांना येण्यास प्राधान्य देण्यात आले दिले जात आहे त्याच,तेव्हढ्या प्रमाणात कुठेतरी आयटी क्षेत्रात असणाय्रा कंपन्यांना,प्रकल्पांना प्राधान्य दिलेले दिसत नाही ही एक खंत कायम वाटते.या क्षेत्रातील कंपन्यांना जर औरंगाबाद शहरात स्थान दिले किंवा ते आणण्यासाठी प्रयत्न केले तर बराच सुशिक्षित बेरोजगार तरुण आपले कौशल्य दाखवून रोजगार मिळवू शकतो असे वाटते...
अलीकडे आयटी क्षेत्रातही औरंगाबाद शहर हळू हळू का होईना बाळसे धरू बघत आहे अन् IT,BPO,KPO, TRANSCRIPTION या क्षेत्रात काम करणाऱ्या MNC Multinational companies औरंगाबाद शहरात नव्याने उभ्या रहात आहे..!
सोबतीने औद्योगिक वसाहतीत निर्माण झालेला कच्चा माल असो किंवा तयार झालेली पार्टस यांना दुसऱ्या राज्यात,देश विदेशात निर्यात करण्यासाठी किंवा तेथील काही गोष्टी कंपन्यांत ज्या महत्त्वाच्या आहेत त्यांना आयात करण्यासाठी दळणवळणाची साधने निर्माण झालेली आहे..!
औरंगाबाद शहराच्या जवळून जाणारा समृध्दी महामार्ग असो किंवा NH 211 त्यानंतर शहरातून अनेक पर्यायी मार्ग यामुळे हा प्रवास सहज झाला आहे,त्यानंतर आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या माध्यमातून सुरू असलेली कार्गो सेवा आणि त्या माध्यमातून होणारे दळणवळण..!
औरंगाबाद शहराच्या बाबतीत काही Negative गोष्टी नेहमीच घडत आल्या आहेत ज्यामुळे नेहमीच औरंगाबाद शहरात संभ्रमाची स्थिती निर्माण झालेली असते..!
एकीकडे महाकाय पैठण येथील "नाथसागर प्रकल्प" शहराच्या जवळ असूनही शहरात अनेक भागात पाचव्या-सहाव्या दिवशी येणारं पाणी यामुळे नागरिक त्रस्त आहे.शहराचे नुतनीकरण करण्याचे काम चालू असताना शहरात महत्त्वाच्या मार्गाला अनेक कामे कित्येक दिवस बंद अवस्थेत पडलेली आहे.त्यामुळे नेहमीच नागरिकांची गैरसोय होताना दिसून येते..!
क्रमशः
Written by,
Bharat Sonwane.
(MBA-Production & Operation Management).
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा