मुख्य सामग्रीवर वगळा

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!


खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!
 
औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य.

डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो.

आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आपण या ठिकाणी अनुभवाल,डोळ्यांचे पारणे फेडणारे असे विविधतेने नटलेले हे गौताळा अभयारण्य आहे.

गौताळा अभयारण्याची १९८६ साली स्थापना झाली.कन्नड तालुक्यातील १७ गावातील वनक्षेत्राचा अभयारण्यात समावेश होतो.कन्नडपासून अवघ्या ९ कि.मी. अंतरावरच अभयारण्य सुरु होते.तर चाळीसगावपासून २० कि.मी अंतरावर एक फाटा आहे.त्या फाट्यापासून सरळ गेल्यास गौताळा अभयारण्याचे प्रवेशव्दार लागते.तिथे एक चौकी आहे,चौकीत नोंद केल्यास आत प्रवेश मिळतो...

अभयारण्यात पायी अथवा वाहनानेही फिरता येते,वन विभागामार्फत काही ठिकाणी अतिशय चांगल्याप्रकारचे ट्रेकिंग ट्रॅकही पर्यटकांना उपलब्ध आहेत जे आकर्षित आपल्याकडे करतात.याउलट आपण कन्नड वरून कधी आला तर आपण हिवरखेडा मार्गे येऊ शकतो...

गौताळा अभयारण्यास भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी हा "१५ जून ते १५ ऑक्टोबर" हा आहे.यावेळी झालेला पाऊस अन् बहरलेले वृक्षवेली,प्राण्यांचे होणारे सहज दर्शन,परदेशातून येणारे विविध स्थलांतरीत पक्षी यांचा येण्याचा हा काळ असल्यामुळे नक्कीच हा काळ महत्त्वाचा ठरतो.यापेक्षा सर्वोत्कष्ट काळ जर कोणता असेल तर "श्रावण महीना" या वेळेत अभयारण्य हे पूर्णपणे हिरवाईने नटलेले असते...

या वेळी अभयारण्य अनेक प्रकारची झाडे,वनौषधी जोमाने वाढीस लागलेली असतात.त्यामुळे या काळात वनौषधी तज्ञ, व निसर्गाशी जवळीक करून विषयांना घेऊन अभ्यास करणारे तज्ञ या काळात आले तर खूप माहिती आपल्याला भेटू शकते.चंदनाच्या वनामधून वाहणारा जो नाला आहे,याचीच ओळख पुढे "चंदन नाला" म्हणून होते.या नाल्याच्या काठालाच पाणी प्यायला येणाऱ्या अनेक प्राण्यांची ये-जा याठिकाणी अनुभवता येते...

मोर, सुगरण,बिबट्या,लांडगा,कोल्हा,नीलगाय,सायाळ,वानर, घोरपड आणि साप या प्राण्यांसह २०० हून अधिक पक्षांच्या प्रजातींची नोंद या अभयारण्यात आहे...
बुलबुल,कोतवाल,चंडोल,गरुड,भारद्वाज,पोपट,हरीयाळ आदी पक्षी येथेच दिसतात,नाल्यानंतर दाट जंगलाने हिरवाईचा अविष्कार आपणाला भूलवतो.पुढे मारोतीचे मंदिर आहे.या मंदिरासमोरच दर्गाह,तलाव आहे...

तलावाच्या सभोवतालचा संपूर्ण परिसर गवताळ आहे तलावात रान कमळ बघायला भेटतात.मारवेल,पवण्या,गोडाळ,चारवळ,कूसळी,बेटेगवत,कुंदा,शहाडा,शिंपी आदी गवतांच्या प्रजाती येथे दिसतात.पूर्वी या ठीकाणी गवळी लोक निवास करत असे.त्यांच्या गाई याच परिसरात चरत असत.त्यावरुनच या परिसराला गौताळा नाव पडले असावे.तेच पुढे अभयारण्यालाही असा एक समज जनमानसात आहे..

सीताखोरे,सीता नान्ही,गौतम ऋषी यांचे डोंगरातील मंदिर,केदार कुंड,धवलतीर्थ धबधबा हे येथे पाहण्याजोगे असेच आहे.उन्हाळ्यात अभयारण्यातील पक्षांना,प्राण्यांना पाण्याची चणचण भासते.परंतु तरीही निसर्गाच्या साहाय्याने तयार झालेल्या अर्थातच नैसर्गिक पाणवठ्याशिवाय वन्यजीव विभागातर्फे पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात येते.

नवीन २२ कृत्रिम पाणवठे वन्यजीव विभागामार्फत या ठीकाणी तयार करण्यात आले.वनपरिक्षेत्रात शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा "जलयुक्त शिवार" अभियांनातर्गत विविध कामे करण्यात अभयारण्यात करण्यात आली आहे.लिंबू,सीताफळ,करंजी,वड,मोहा,आवळा व लिंबाच्या झाडांची लागवड शासनाच्या वनविभागमार्फत २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेली आहे...

विहंगम असं निसर्गसौंदर्य व पावसाळी पर्यटनाचा आनंद याठिकाणी पर्यटकांना घेता येतो.यासाठी वन्यजीव विभागीय वनाधिकारी विभागामार्फतही विविध सोयीसुविधा पर्यटकांसाठी करण्यात आलेल्या आहेत.या परिसरातच अभयारण्याबाबत माहिती व्हावी,या दृष्टीकोनातून पर्यटकांसाठी निसर्ग निर्वचन केंद्राची निर्मितीही वन्यजीव कार्यालयामार्फत करण्यात आली आहे...

यामध्ये गौताळा अभयारण्यातील आंबा,आवळा,बाभूळ,बेल आदी वनसंपदा व वनौषधींबाबत माहिती या केंद्रात देण्यात आलेली आहे. मराठवाड्यात केवळ सुपुष्प वनस्पतीच्या सुमारे १६५० प्रजाती असून त्यापैकी ५०० हून अधिक प्रजातीचा औषधींसाठी उपयोग होतो.वन औषधीचा खजिना म्हणूनही गौताळा अभयारण्याकडे पाहिले जाते.अशा विविध प्रकारच्या वनौषधी या ठिकाणी आढळतात.त्यात चिंच,कडुनिंब,कवठ, पळस,पिंपळ आणि उंबर आदींचा समावेश आहे...

वन्यजीव विभागाने उत्तमप्रकारे व्यवस्थापन आणि संवर्धन करुन या जैवविविधतेची जपणूक केली आहे.त्यामुळे पर्यटक,पक्षी अभ्यासक,पर्यावरणप्रेमी यांनी या पावसाळ्यात गौताळ्यात निसर्गसहलीचा,भ्रमंतीचा आनंद घ्यायलाच हवा...

औरंगाबाद ते कन्नड रोडच्या डावीकडील आकर्षक असा "पितळखोरा लेणी समूह" सह्याद्री पर्वत रांगेच्या सातमाळ पर्वतश्रेणीत वसलेल्या गौताळ्यात कोरलेले आहे.अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभलेला पितळखोरा लेणी समूह आहे.
भारतात आढळणाऱ्या १२०० लेण्यांपैकी जवळ-जवळ ८०० लेण्या एकट्या महाराष्ट्रात आढळतात.इथल्या सह्याद्रीने केवळ शुरवीरांचेच संगोपन केले,असे नाही तर अनेक जगप्रसिद्ध आणि सर्वांना आश्चर्य करायला भाग पाडणाऱ्या लेण्याही आपल्या अंगा-खांद्यावर गोंदून घेतल्या आहेत...

पितळखोरा ही भारतातील सर्वात जुनी लेणी आहेत असे मानले जाते,लेणी सुमारे इसपूर्व दुसऱ्या शतकातील म्हणजे अजिंठा-वेरूळची लेणी येथील लेण्यांपेक्षाही प्राचीन मानली जाते.पितळखोरा लेणी ही औरंगाबादपासून ७८ कि.मी.अंतरावर आहे.औरंगाबाद येथून पितळखोरा लेणीस जाण्यासाठी औरंगाबाद-कन्नडमार्गे-कालीमठ फाटा जावे लागते...

एकूण १४ लेण्यांचा हा समूह प्राचीन भारतातील पहिल्या टप्प्यातील आहे.पितळखोरा या लेणीत जाण्यासाठी खोल दरीत जावे लागते,लेणी दुमजली आहे.येथे मुख्य गुफा म्हणजे एक मोठा चैत्य आहे.आतील भागात ३५ स्तंभ असून या स्तंभांवर कृष्णधवल,लाल आणि तपकिरी वा फिकट रंगात रंगवलेली बौद्ध संन्यास्याची चित्रे आहेत...

बाजूच्या दालनातील छतावर सिंहासनाधिष्ठीत आणि वर छत्र असलेल्या बुद्ध मूर्तीनी चीत्रलेले,सजवलेले आहे.डोक्यावरील केस नसलेली मुले व छोट्या मूर्ती गुडघे टेकून वंदन करताना दिसतात.स्त्री-पुरुष यांच्या आकृतीही येथे दिसतात.चैत्य लेणी व विहार लेणी यांच्या दर्शनीय भागात गंधीक कुलातील मितदेव आणि पैठणच्या संघकपुत्र यांचे दानलेख आहेत...

विहार लेणी येथील गजथर हा प्राचीन भारतीय वास्तू शिल्पातील चौथऱ्यावर दाखविलेला पहिला गजथर आहे.हत्तींच्या ओळी थेट प्रवेशद्वाराशी जोडतात.विहाराचा एक समूह,एक चैत्य हॉल,आणि दगडावर असलेल्या दोन छोट्या लेणींमध्ये स्तूपांचा समावेश आहे.अत्यंत सुंदर आणि प्राचीन बौद्ध लेणी पाहायला पितळखोरा या ठीकाणी गेलेच पाहिजे...

इ.स.पूर्व दुसऱ्या शतकामध्ये खोदलेली हीनयान पंथाची ही लेणी आणि तो सगळा परिसरच अत्यंत नयनरम्य व शांतता भेट देणारा आहे.गौताळा अभयारण्यात हा भाग येतो,लेण्यांमध्ये जाण्यासाठी उत्तम बांधलेल्या पायऱ्या आहेत. १४ लेण्यांचा हा समूह असून त्यातील चार चैत्यगृहे आहेत.त्यातील खांबांवर अत्यंत सुंदर रंगवलेली चित्रे आजही शाबूत आहेत.नैसर्गिक रंगांनी रंगवलेली ती चित्रे खांबांचे आकार आणि खोदीव स्थापत्य पाहून आश्चर्याने बोटे तोंडात जातात...

याच मार्गे आपण आपण लेणी बघून आलात की,आपल्याला "सुरपळा डोंगररांगेचे" दर्शन होते.साहसी ट्रेकरसाठी ही डोंगररांग खूप छान आहे,निसर्ग सौंदर्याने नटलेले ही डोंगरांग ट्रेकिंगसाठी कन्नड वासियांच्या पसंतीस उतरते.कन्नड शहराची मूळ ओळखच आहे की टेकड्या अन् डोंगर रांगानी वेढलेले शहर,कारण कन्नड शहराच्या जवळपास चहूबाजूंनी टेकड्या अन् डोंगरांगा आहेत.

कन्नड शहर परिसरात येतांना आपण "अंबाडी प्रकल्प"सुद्धा बघू शकतो,अंधानेर येथे असलेलं पुरातन काळातील "संगमेश्वर महादेव मंदिर" आपण बघू शकतो,ज्याचे आता नव्याने नूतनीकरण झाले आहे.जिथे भामासाद महाराज यांची समाधी आहे.कन्नड शहराजवळ अजून एक महत्वपूर्ण गाव आहे ज्याचे नाव स्वातंत्र्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहले जाते,ते म्हणजे "मक्रणपुर" कारण "जय भीम" हा नारा (घोषणा) हा सर्वप्रथम कुठे देण्यात आला तर तो या मक्रणपुर गावात.अजुन जवळच "रेल" येथे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले "भैरवनाथ मंदिर" या रेल गावी आहे...

औरंगाबाद ते चाळीसगाव महामार्गावरील कालिमठ फाट्यापासुन मध्ये २ कि.मी.असलेलं कालीमातेचे मंदिर म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचं ग्रामदैवत कालिकामाता मंदिर आहे.कन्नड तालुक्यातील या निसर्गरम्य परिसरात प्रणवानंद सरस्वतींनी मंदिरची स्थापना केली आहे.निद्रीस्त शंकराच्या अंगावर उभी असलेल्या कालीकामातेची भारतात केवळ तीन मंदिर आहेत.त्यातीलच हे एक भव्य कलाकृती लाभलेलं कालीमातेचे मंदिर...

कन्नड शहरापासून अवघ्या ९ कि.मी.अंतरावर असलेल्या कालीमठ परिसरात असलेलं कालीमातेचे मंदिराची स्थापना १० एप्रिल १९८८ रोजी स्वामी "प्रणवानंद सरस्वती महाराज" यांनी केली. मुळचे कोलकात्याचे रहिवाशी असलेल्या स्वामी प्रणवानंद सरस्वती यांनी राजवैभवाचा त्याग करून १९६८ रोजी चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवीला वास्तव्यास आले.तब्बल 19 वर्षे इथं वास्तव्य केल्यानंतर त्यांनी कालीकामातेचे एक भव्य मंदिर उभारण्याचा मनोदय केला. मंदिरासाठी कालिमठ येथे जागा विकत घेऊन तेथे हे मंदिर उभं केलं.

कालिकामातेचे मंदिर हे आधुनिक स्थापत्य कलेचा,शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे,जे डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. हे मंदिर बऱ्याच मोठ्या क्षेत्रात व्यापलेलं असून परिसरात आंब्याची अनेक झाडे आहेत. मंदिर बांधणीसाठी शास्त्राचा आधार घेऊन प्रामुख्याने ९ अंकाला महत्व दिले आहे.मंदिराचे बांधकाम नऊ महिन्यांत पूर्ण झाले.प्रत्येक बांधकामाची रचना,बांधणी ही नऊच्या पटीत आहे,९ अंकाला जोडुन केलेली आहे.ओटा,कॉलमचे अंतर,प्रदक्षिणेचा मार्ग,गाभारा,सभामंडप आणि मंदिरावरील कळसांची संख्यादेखील नऊ आहे.या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कन्नड ते कालीमठ अंतरदेखील ९ कि.मी. आहे.

मंदिरात प्रवेश करताच आपल्या नजरेस पडते ती देवीची प्रसन्नमुर्ती. मुर्तीच्या एका हातात रक्तपिपासू नावाच्या राक्षसाचे शीर,तर दुसऱ्या हातात तलवार आहे.देवीच्या पायाखाली निद्रिस्त शंकर आहेत.कालिकामातेची ९ फूट उंचीची ही मूर्ती काळ्या संगमरवरी दगडाने साकारण्यात आली आहे.मंदिराच्या पाठीमागे स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराजांची समाधी आहे...

देशभरातून कालीकामातेच्या दर्शनासाठी भक्तांची वर्दळ सतत या ठिकाणी असते.मंदिरात रोज नित्यनेमानं सकाळी अभिषेक,पुजा,आरती करण्यात येते,संध्याकाळी महाआरती होते.या मंदिरात गुरूपोर्णिमा,महाशिवरात्री,नवरात्रात,दसरा सणाला मोठा उत्सव असतो.
मंदिराची किर्ती दिवसेंदिवस वाढत असून, इथं भाविकांची गर्दीही वाढली आहे देशभरातून इथं भाविक येतात आणि कालिकामाते चरणी लीन होतात...

आपण कन्नड चाळीसगाव मार्गावर उभारलेला भव्य "अंबाडी प्रकल्प" आपण बघु शकतो.या ठिकाणी आपल्याला सरकारी नर्सरी बघायला मिळते,येथे अनेक वनस्पती,औषधी वनस्पती बघायला भेटतात वनस्पती शास्त्रा विषयीची बरीचशी माहिती,वनस्पती लागवड याबद्दलचे ज्ञान आपल्याला या ठिकाणी भेटु शकते...

कालीमठ फाट्यावरुन आपण पुढे येऊन कालिकामातेचे दर्शन घेऊन पुढे निघालो की,आपल्याला याच मार्गावर पुढे 8 कि.मी. अंतरावर जगप्रसिद्ध पितळखोरा लेणी बघायला भेटते...

वरील माहिती दिलेली स्थळं ही सर्व आपण २ दिवसात पाहु शकतो,यामुळे वेळेचे योग्य नियोजन केल्यास ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कन्नड वास्तवातील अनेक ठीकाणांना आपण बघु शकतो...

माहिती संकलन:Bharat Sonwane.
TQ,Kannad. Dist,Aurangabad.
Photo Credit,
Me & "Gautala Wildlife sanctuary" all Tourist Photographer.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड