मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सांजवेळ अन् निसर्गाशी गप्पा..!

सांजवेळ अन् निसर्गाशी गप्पा..!   दुपार सांजवेळीकडे कलायला लागलेली असते,सांजवेळीकडे ढळणाऱ्या उतरत्या उन्हाच्या तिरपेला नजरेसमोर ठेवून अनवाणी पायांनी पाऊलवाटेने चालत रहावं,कधीतरी पावलं मोजत रहावी सोबतीला तर कधी मनात येऊन जाणारे असंख्य प्रश्न मोजत रहावी अन् त्यांना वेळोवेळी उत्तरेही देत रहावी.... पाऊलवाट जिकडे नेईल तिकडे पावलांसोबत आपणही मिरत राहायचं, कारण काहीही नसतांना,अलिकडे रिकामेच मिरायला आपल्याला आवडायला लागलं आहे,मग त्याला कधी कारणही नसते तर कधी त्यामागचा कुठलाही नसलेला दृष्टीकोन.मुळातच आता ही अशी अलंकारिक शब्द  तोंडातून यावी इतकाही समतोल नाही आपल्यात हा परका भास वेळोवेळी होतच असतो... अनवाणी पायांनी पाऊलवाटेने चालत चालत येऊन बसावं त्या भकास भासणाऱ्या टेकडीवर अन्  बसावं शून्यात नजर लावुन ते म्हणतातना तीमिराकडूनी तेजाकडे अगदी तसंच पण तेजाकडे इथे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होणार आहे.  मग नजरेने न्याहाळत रहावं उन्हाच्या पाऱ्यात वाळून गेलेल्या तनास,तरुस अन् बघत रहावी पानगळ झालेल्या मरणासन्न अवस्थेत असलेल्या झाडांच्या फांदीला... कधीतरी मधुनच कुणीतरी अनोळखी ...

कवी.ग्रेस कळतांना..!

कवी.ग्रेस कळतांना..! आज सांध्यपर्वाचा कवी,कविवर्य ग्रेस यांचा स्मृतिदिन.दिवसभर त्यांच्या आयुष्यावर केलेले लेख विविध माध्यमातून वाचनात आले अन् मन दुःखात,एकांतात जाणवणाऱ्या एकटेपणात बुडत गेले.... काय बोलावं कवी ग्रेस यांच्याविषयी खरच अनोखं रसायन आहे,एक असं रसायन जे आजवर त्यांच्या अनोख्या शैलीतून मराठी साहित्याला,काव्य लिखनाला एक वेगळं वळण देणारे ठरलं आहे...  खरं तर आपल्या सारख्या सामान्य माणसानं काय बोलावं या साहित्यातील ध्रुव ताऱ्याबद्दल,हो ध्रुव ताराच भासतात ते मला मराठी साहित्य विश्वातील. कारण,मराठी साहित्यात ध्रुव तार्यासारखं त्यांच स्थान अढळ व त्या एक ठीकांणच आहे,जिथवर कुणीही जाऊ शकत नाही अन् कुणी जाणारही नाही.कारण त्यांनी ते आपल्या अनोख्या कवितेच्या लिखाणातून, व्यक्त करण्याच्या धाटनितून ते मिळवलं आहे .... १९६० नंतरच्या कालखंडात आपल्या अनोख्या बहारदार काव्यशैलीने हा कालखंड ज्या प्रतिभासंपन्न कवीने उजाळुन टाकला ते कवी म्हणजेच कविवर्य कवी ग्रेस. या काळात अनेक कवी होऊन गेले,परंतु कविवर्य ग्रेस हे नेहमीच उजवे अन् अनोखे ठरत राहिले.त्यांच्या कवितांमधून एका आगळ्यावेगळ्या स्...

अस्वस्थ मनाचे विचार..!

अस्वस्थ मनाचे विचार..! गेले दोन दिवस जरा जास्तच अस्वस्थ वाटतं आहे,काही क्षण ठरवूनही टाळता नाही येत...अगदी हे क्षणही तसेच भासत आहे,कितीतरी वेळ वाटले की मोकळा श्वास घ्यायला हवा आता... काही वेळापूर्वी बाल्कनीत येऊन उभा राहिलो होतो,मनाला विचारांचे ते कोरडे शुष्क वारे झोंबु लागले आहे,आतून पुर्णपणे थकल्या सारखं झालंय... हवेच्या दिशेनं उडणारं एखादं वाळलेलं गुलमोहराचं पान वाऱ्याशी हितगुज घालत वाऱ्याच्या पुढे पुढे उडत चाललंय.बस तितकसं सोप होऊन जावं जीवन काही क्षणांसाठी,कारण एकदम थांबल तर ते दगडासारखे एक जागचे राहून जाईल.... कधीतरी मधूनच अलवार सूर्यकिरणे मिठीत घेत,घामाची काही ओघळ शरीराशी समीप करण्यासाठी माझ्या आत सोखवून गेलीये...घामाचा एक थेंब घरंगळत मानेशी प्रेमाचे मिलन करत खाली खाली अगदी हनुवटीवर येऊन स्थिरावला आहे,त्याचं अस्तित्व सुद्धा गेल्या दोन दिवसांप्रमाणे भासतय... ते अस्तित्व कधी पर्यंत माझं असेल अन् कधीतरी ते मी कायमचं गमावून बसेल,त्याचं टिपणे माझ्या नशिबी यावं फक्त आता... काही वेळ स्थिरावलेला श्वास आता कुठेतरी जिवंत असलेल्या,त्राण नसलेल्या शरीराची जाणीव करून देत आहे...काही...

कविता होतांना..!

कविता होतांना..! अनोळखी  शब्दांची मोबाईलवर एक रचना टाईप झाली अन् नेमकं बॅकस्पेसच्या गोंधळात ती पुन्हा वाचण्यात आली,जोवर ती रचली जात होती तोवर मी भानावर नव्हतो.जेव्हा ती रचली गेली अन् मग बॅकस्पेसच्या बटनाशी तडजोड चालू झाली त्यावेळी मात्र मी रचना निरखुन बारकाईने वाचली... कवितेत मला बघताना आपलं खरं व्यक्त होणं कवितेतले की खर्याखुर्या आयुष्यातलं..?  हा प्रश्न पडून गेला.... तोवर उत्तरे  मिळू लागले होते माझ्याच मनाचे त्यामुळे इतरांच्या उत्तराची गरज नव्हतीच,परंतु मनच ते कित्येकदा त्याच्यावर वश झालं की ते खोटंही बोलतं म्हणुन मग टाईप केलेल्या रचनेला बघत मनाच्या आरश्यात मीच मला कितीवेळ न्याहाळत राहिलो,प्रश्न करत राहीलो... अन् अन्... मग कळून चुकलं,माझ्या व्यक्त झालेल्या मनाला भूतकाळ नको हवा होता कारण,त्याने भविष्यासाठी बघितलेली स्वप्ने तो कवितेतून उतरवत होता... मग पुन्हा एकदा तीच रचना टाईप केल्या गेली मोबाईलवर बॅकस्पेसच्या तडजोडीत,जी की मगाशी Delete झालेली होती पण कवितेशी केलेली तडजोड असो किंवा आयुष्याशी केलेली तडजोड मग यमक जुळवून येणं अवघड असतं. पुन्हा भविष्यकाळासाठी कव...

Article..!

Article..! अडगळीतल्या खोलीत जसं जुन्या पुस्तकांचा संग्रह असावा तसं आयुष्यात काही जुन्या गोष्टींचा संग्रह असतो,जो वेळी अवेळी स्वतःला ताब्यात ठेवण्यासाठी सावरण्यासाठी पूरक ठरत असतो.जसजसे आयुष्याची गणिते उलगडायला लागली,तसतसे ही संग्रही असलेली अनुभवाची शिदोरी आयुष्याला एका सरळ रेषेत जगण्यासाठी सूत्रांची कामे करू लागली... जसे लीहत्या हाताला जोवर लिखाणासाठी आपण मोकळीक देत नाही तोवर मनात चालू असलेल्या असंख्य विचारांना,हालचालींना आपण पूर्णपणे कागदावर उतरवू शकत नाही,व्यक्तही करू शकत नाही... इथवर ठीक असतं की मनातलं कागदावर उतरवल जावं अन् ते कागदाशी व्यक्त केलं जावं,कारण मनातल्या मनातच जेव्हा माणूस माणसाला खायला उठतो तेव्हा होणारा त्रास कदाचित कागदावर व्यक्त होण्यापेक्षा कैक पटीने जास्त जाणवणारा असावा... कधीतरी वाटायचं की एकांताशी स्वगत करावं,मनाचं सांगावं त्याला पण हे फार काळ टिकणारे नाही. गर्दीत जेव्हा माणसे हरवायला होतात तेव्हा तेव्हा या कागदावर व्यक्त व्हायला शिकलोय,मग कधीतरी गर्दी ओळखीची वाटायला लागायची मग पुन्हा माणसाच्या सहवासात येऊन वावरण्याची सुरुवात करायचो... Written by, ©®B...

World Poetry Day..!

World Poetry Day..! "कविता इतिहासापेक्षा चांगली आणि तात्विक आहे, कारण कविता सार्वत्रिक आणि इतिहासाला विशिष्ट  व्यक्त करते." - अॅरीस्टॉटल. संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक,वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) १९९९ मध्ये पॅरिस येथे झालेल्या ३०व्या सर्वसाधारण परिषदेदरम्यान २१ मार्च रोजी दरवर्षी जागतिक कविता दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.ऑक्टोबरमध्ये यापूर्वी बर्‍याच ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात आला जो युनेस्कोच्या १९९९ च्या अधिवेशनानंतरही चालू होता. १५ ऑक्टोबर रोजी रोमन कवी व्हर्जिन यांच्या वाढदिवसानिमित्त काही देश कविता दिन साजरे करतात. पुस्तक प्रेमींना माहीत असलेले संघर्षही खुप आहे यात प्रेम,सहवास,विद्रोह,एकाकीपण हे फक्त कवितेतून खूप छान वाटते कारण कविता अप्रतिम,अलवार आहे.ही माझी कवितेसाठी माझ्याच मनातील शुद्ध भावना अन् ते तितकेच सत्यही आहे. जेव्हा एखादा वाचक कवितेच्या पुस्तकाच्या पृष्ठांमध्ये प्रवेश करतो,तेव्हा तो अशा जगामध्ये प्रवेश करते जिथे स्वप्ने भूतकाळाला विद्यमान ज्ञानाने रूपांतरित करतात आणि जिथे भविष्यासाठी विलक्षण संभाव्यतेत ती कविता रूपांतरित कर...

अंधारलेल्या वाटांच्या ओळी..!

अंधारलेल्या वाटांच्या ओळी..! विचारांच्या गर्तेत माणसे जागायला होतात अन् कित्येक प्रयत्नांना अपेक्षित उत्तरे नाही भेटले की नैराश्याच्या गर्तेत सापडले जातात,काय होतं..?, कुणामुळे होतं..? का बरं होत आहे..?  प्रत्येकवेळा पूर्णपणे फोल ठरले जाणं याची कारणं काय..? किंवा उत्तरे नसेल तर थोडक्यात आहे त्या परिस्थितीला बळजबरीचं स्वीकारणं,म्हणजे शेवट काय आहे हे माहीत असूनही ते स्वीकारणं म्हणजेच .....  इतकं सहज अन् सोप्पं असतं का निर्णय घेणं..? ती भावना जी खुप वाईट आहे... भर दुपारची वेळ अन् ढळणारी सांज,सूर्याचे अस्ताला जाणे,अस्ताला जाणाऱ्या सूर्याला कितीवेळ टिपत राहणे या वर्तुळाच्या भोवताली गेले काही दिवस मन भटकत असते...                                                      विचारांच्या गर्तेत एकदाका स्वतःला झोकुन दिले की,मग पडणारी प्रश्न आपलीच असतात अन् मिळणारी उत्तरं सुद्धा आपलीच असतात.कधीतरी वाटतं की,काहीतरी चुकतंय तरीही  आपले मन मनाच्या अस...