Article..!
अडगळीतल्या खोलीत जसं जुन्या पुस्तकांचा संग्रह असावा तसं आयुष्यात काही जुन्या गोष्टींचा संग्रह असतो,जो वेळी अवेळी स्वतःला ताब्यात ठेवण्यासाठी सावरण्यासाठी पूरक ठरत असतो.जसजसे आयुष्याची गणिते उलगडायला लागली,तसतसे ही संग्रही असलेली अनुभवाची शिदोरी आयुष्याला एका सरळ रेषेत जगण्यासाठी सूत्रांची कामे करू लागली...
जसे लीहत्या हाताला जोवर लिखाणासाठी आपण मोकळीक देत नाही तोवर मनात चालू असलेल्या असंख्य विचारांना,हालचालींना आपण पूर्णपणे कागदावर उतरवू शकत नाही,व्यक्तही करू शकत नाही...
इथवर ठीक असतं की मनातलं कागदावर उतरवल जावं अन् ते कागदाशी व्यक्त केलं जावं,कारण मनातल्या मनातच जेव्हा माणूस माणसाला खायला उठतो तेव्हा होणारा त्रास कदाचित कागदावर व्यक्त होण्यापेक्षा कैक पटीने जास्त जाणवणारा असावा...
कधीतरी वाटायचं की एकांताशी स्वगत करावं,मनाचं सांगावं त्याला पण हे फार काळ टिकणारे नाही. गर्दीत जेव्हा माणसे हरवायला होतात तेव्हा तेव्हा या कागदावर व्यक्त व्हायला शिकलोय,मग कधीतरी गर्दी ओळखीची वाटायला लागायची मग पुन्हा माणसाच्या सहवासात येऊन वावरण्याची सुरुवात करायचो...
Written by,
©®Bharat Sonawane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा