World Poetry Day..!
"कविता इतिहासापेक्षा चांगली आणि तात्विक आहे,
कारण कविता सार्वत्रिक आणि इतिहासाला विशिष्ट
व्यक्त करते."
- अॅरीस्टॉटल.
संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक,वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) १९९९ मध्ये पॅरिस येथे झालेल्या ३०व्या सर्वसाधारण परिषदेदरम्यान २१ मार्च रोजी दरवर्षी जागतिक कविता दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.ऑक्टोबरमध्ये यापूर्वी बर्याच ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात आला जो युनेस्कोच्या १९९९ च्या अधिवेशनानंतरही चालू होता. १५ ऑक्टोबर रोजी रोमन कवी व्हर्जिन यांच्या वाढदिवसानिमित्त काही देश कविता दिन साजरे करतात.
पुस्तक प्रेमींना माहीत असलेले संघर्षही खुप आहे यात प्रेम,सहवास,विद्रोह,एकाकीपण हे फक्त कवितेतून खूप छान वाटते कारण कविता अप्रतिम,अलवार आहे.ही माझी कवितेसाठी माझ्याच मनातील शुद्ध भावना अन् ते तितकेच सत्यही आहे.
जेव्हा एखादा वाचक कवितेच्या पुस्तकाच्या पृष्ठांमध्ये प्रवेश करतो,तेव्हा तो अशा जगामध्ये प्रवेश करते जिथे स्वप्ने भूतकाळाला विद्यमान ज्ञानाने रूपांतरित करतात आणि जिथे भविष्यासाठी विलक्षण संभाव्यतेत ती कविता रूपांतरित करत असते,हे सर्व फक्त वर्तमान काळामध्ये घडत असते.
त्यावेळी हे जे सर्व कवितेतून शब्दबद्ध होते तेव्हा आपण कोण आहोत याची पर्वा नाही,
तेव्हा तेथे एक कविता आहे जी आपल्याला स्पर्श करेल,आपल्या हृदयाशी मनाशी अन् अंगावर येऊन जाणाऱ्या शहार्यांशी स्वगत करेल ही सुंदर भावना मनावर अधिराज्य करत असते...
#मग_कधीतरी..!
कधीतरी माझी कविता होते आठवणीतल्या बापावर
तर कधी मला पदराआड घेऊन दुध पाचणार्या आईवर...!
कधीतरी माझी कविता होते माझ्या शोर्य सांगणार्या भारत मातेवर तर कधी माझ्या तिरंग्यात शहिद झालेल्या माझ्या फौजीवर...!
कधीतरी माझी कविता होते समाजाने रांड ठरवलेल्या माझी माय वेश्येवर तर कधी समाजाने गैरसमजुतीतुन दुर केलेल्या माझ्या कीन्नर भावा बहिणींवर...!
कधीतरी माझी कविता होते स्त्री सौंदर्यावर,तिच्या नयनांवर तर कधी करावी लागते बळजबरीच कविता बलात्कारावर,अत्याचारावर...!
कधीतरी माझी कविता होते हिरव्या गर्द शालुने पांघरलेल्या निसर्गराजावर तर कधी झाडावर लटकणार्या माझ्या शेतकरी बापाच्या फाशीवर...!
तुला विसरून कसे चालेल...!
कधीतरी माझी कविता होते तुझ्यावर तर कधी माझ्या एकतर्फी प्रेमावर तर कधी आपल्या अव्यक्त आठवणीतल्या क्षणांवर...!
अन् मग शेवट....
कधीतरी अधांतरी जगलेल्या अलवार जीवनावर तर कधी कल्पेनील माझ्याच त्या आसवांसाठी कोरड्याठाक राहीलेल्या माझ्याच चितेवर...!
#Happy_poetry_Day...
Written by,
Bharat Sonawane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा