अस्वस्थ मनाचे विचार..!
गेले दोन दिवस जरा जास्तच अस्वस्थ वाटतं आहे,काही क्षण ठरवूनही टाळता नाही येत...अगदी हे क्षणही तसेच भासत आहे,कितीतरी वेळ वाटले की मोकळा श्वास घ्यायला हवा आता...
काही वेळापूर्वी बाल्कनीत येऊन उभा राहिलो होतो,मनाला विचारांचे ते कोरडे शुष्क वारे झोंबु लागले आहे,आतून पुर्णपणे थकल्या सारखं झालंय...
हवेच्या दिशेनं उडणारं एखादं वाळलेलं गुलमोहराचं पान वाऱ्याशी हितगुज घालत वाऱ्याच्या पुढे पुढे उडत चाललंय.बस तितकसं सोप होऊन जावं जीवन काही क्षणांसाठी,कारण एकदम थांबल तर ते दगडासारखे एक जागचे राहून जाईल....
कधीतरी मधूनच अलवार सूर्यकिरणे मिठीत घेत,घामाची काही ओघळ शरीराशी समीप करण्यासाठी माझ्या आत सोखवून गेलीये...घामाचा एक थेंब घरंगळत मानेशी प्रेमाचे मिलन करत खाली खाली अगदी हनुवटीवर येऊन स्थिरावला आहे,त्याचं अस्तित्व सुद्धा गेल्या दोन दिवसांप्रमाणे भासतय...
ते अस्तित्व कधी पर्यंत माझं असेल अन् कधीतरी ते मी कायमचं गमावून बसेल,त्याचं टिपणे माझ्या नशिबी यावं फक्त आता...
काही वेळ स्थिरावलेला श्वास आता कुठेतरी जिवंत असलेल्या,त्राण नसलेल्या शरीराची जाणीव करून देत आहे...काही विशेष कारणांसाठी अस्वस्थ होणं किती काटेकोरपणे पाळतं नाही का आपलं मन....
की...हे सर्व विचाराचे मनाला अस्वस्थ करण्याचे खेळ असतात,आतल्या त्या माणूस नावाच्या कल्पनेतील जीवाला जगते ठेवण्यासाठी....
#अस्वस्थ_मनाचे_विचार...
Written by,
©®Bharat Sonawane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा