अंधारलेल्या वाटांच्या ओळी..!
विचारांच्या गर्तेत माणसे जागायला होतात अन् कित्येक प्रयत्नांना अपेक्षित उत्तरे नाही भेटले की नैराश्याच्या गर्तेत सापडले जातात,काय होतं..?,
कुणामुळे होतं..?
का बरं होत आहे..?
प्रत्येकवेळा पूर्णपणे फोल ठरले जाणं याची कारणं काय..?
किंवा उत्तरे नसेल तर थोडक्यात आहे त्या परिस्थितीला बळजबरीचं स्वीकारणं,म्हणजे शेवट काय आहे हे माहीत असूनही ते स्वीकारणं म्हणजेच .....
इतकं सहज अन् सोप्पं असतं का निर्णय घेणं..?
ती भावना जी खुप वाईट आहे...
भर दुपारची वेळ अन् ढळणारी सांज,सूर्याचे अस्ताला जाणे,अस्ताला जाणाऱ्या सूर्याला कितीवेळ टिपत राहणे या वर्तुळाच्या भोवताली गेले काही दिवस मन भटकत असते...
विचारांच्या गर्तेत एकदाका स्वतःला झोकुन दिले की,मग पडणारी प्रश्न आपलीच असतात अन् मिळणारी उत्तरं सुद्धा आपलीच असतात.कधीतरी वाटतं की,काहीतरी चुकतंय तरीही आपले मन मनाच्या असंख्य हालचाली अन् पडणारी प्रश्न त्या चुकत्या उत्तराला प्रश्न करायला धजावत नाही...
मनाची मनानेच खोटी समजुत घातली की होतं सगळं व्यवस्थित हे तोवर उमगायला लागलेलं असतं,अन् मग या खोट्या उत्तरांच्या आशेवर आपण बघत राहावी अस्थाला जाणाऱ्या त्या सूर्याची अन् नैराश्येच्या गर्तेतुन स्वतःला सावरत भानावर यायची वेळ..!
भानावर येणं कदाचित अवघड अन् जिक्रीचे वाटते पण वेळ मारून न्यायला इतकं खुप आहे,कारण एकदाका वेळ टळली की पडलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊनही फायदा नसतो किंवा अर्थही नाही.मग नकळत शून्यात नजर लावुन आपलेच आपल्याला शोधणे होते,आपण खूप काही वेगळं करतोय वाटत नाही अन् नको ते करायला लागतो...
मग चुकतात घेतलेली निर्णय,पडलेली चुकीची प्रश्न अन् त्याला मिळालेली चुकीची उत्तरे मग अस्ताला गेलेल्या सूर्या बरोबरच आपलं अंधारलेल्या वाटा चाचपडत अनवाणी पायांनी चालणं होतं,कुठेतरी आशेची लकेर भर अंधारात दिसावी अन् गोंधळलेल्या मनाने तिकडे धाव घ्यावी...
पुन्हा एकदा मार्ग चुकावा अन् पुन्हा खोल गर्तेत आपण सापडावे मग पुन्हा पडलेली प्रश्न,मिळालेली उत्तरं यांची वजाबाकी,गुणाकार,भागाकार,बेरीज जगण्याचे सूत्र हरवून बसले की मग उत्तरे भेटत नाही...
मग कितीवेळ तेच तेच अन् तेच...
अंधारलेल्या वाटांच्या ओळी..!
सांज ढळून गेली
अस्ताला सूर्य गेला आहे,
नजर शोधते गर्तेत सापडलेल्या मला..!
शून्यात मिळाली उत्तरे
नैराश्याचे भाव जपुन ठेवायला,
अंदाज न आता जीवनी सुत्र कसे ते जुळावे..!
अनवाणी पावलांनी व्हावा शोध
अंधारलेल्या त्या चुकल्या वाटांना,
मार्ग चुकला,चुकली उत्तरे गुनील्यात भटकतांना..!
लकेर ती दिसावी अन्
काळोखात डोळ्यांना नजर यावी,
चुकली ती वाट पुन्हा एकदा गर्तेत मी सापडावे..!
गर्तेत खोल भटकतसे
विचारांच्या तंद्रीत मना माझ्या,
जुळले जावे सुत्र,व्हावे वजा एकदा नैराश्य मनच्या वाटेतुनी
एकदा आता..!
Written by,
Bharat sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा