कविता होतांना..!
अनोळखी शब्दांची मोबाईलवर एक रचना टाईप झाली अन् नेमकं बॅकस्पेसच्या गोंधळात ती पुन्हा वाचण्यात आली,जोवर ती रचली जात होती तोवर मी भानावर नव्हतो.जेव्हा ती रचली गेली अन् मग बॅकस्पेसच्या बटनाशी तडजोड चालू झाली त्यावेळी मात्र मी रचना निरखुन बारकाईने वाचली...
कवितेत मला बघताना आपलं खरं व्यक्त होणं कवितेतले की खर्याखुर्या आयुष्यातलं..?
हा प्रश्न पडून गेला....
तोवर उत्तरे मिळू लागले होते माझ्याच मनाचे त्यामुळे इतरांच्या उत्तराची गरज नव्हतीच,परंतु मनच ते कित्येकदा त्याच्यावर वश झालं की ते खोटंही बोलतं म्हणुन मग टाईप केलेल्या रचनेला बघत मनाच्या आरश्यात मीच मला कितीवेळ न्याहाळत राहिलो,प्रश्न करत राहीलो...
अन् अन्...
मग कळून चुकलं,माझ्या व्यक्त झालेल्या मनाला भूतकाळ नको हवा होता कारण,त्याने भविष्यासाठी बघितलेली स्वप्ने तो कवितेतून उतरवत होता...
मग पुन्हा एकदा तीच रचना टाईप केल्या गेली मोबाईलवर बॅकस्पेसच्या तडजोडीत,जी की मगाशी Delete झालेली होती पण कवितेशी केलेली तडजोड असो किंवा आयुष्याशी केलेली तडजोड मग यमक जुळवून येणं अवघड असतं. पुन्हा भविष्यकाळासाठी कवितेत केलेली शब्दांची जुळवाजुळव मला वेळोवेळी भानावर आणुन वर्तमानकाळात जगायला सांगू लागली...
Written by,
©® Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा