सुगीचे दिस भाग -१ सूर्य अस्ताला गेला तसे गाव, रानात दिवस मावळतीला आला. अंधार पडायच्या आत शेतातून घराकडे जायची ओढ लागली. ढोरांना हौदावर पाणी पाजून, वैरण टाकून, गोठ्यात बांधली. गायीचे दूध वासराला पाजून,काही सांच्या चहाला म्हणून केटलीत काढून घेतलं. हातपाय धुवून वावरातले कापडंबदलून तो विष्णू म्हातार बाबा घराच्या दिशेनं निघाला होता. अंगात इरलेला सदरा, चार ठीकाणी ठीगळं दिलेल धोतर घालून तो उरे दिवस पुरे करत होता. वाहनाला चिंदकाने बांधुन एकएक दिवस काढत होता, त्याला नको होत सुटर अंगाला की नाही वाजली त्याला कधी थंडी. हा पण हल्ली दिसायला कमी झालं होतं विष्णू म्हातार बाबाला की काय म्हणुन लेकानं शहरातल्या सरकारी दावखण्यातून त्याला एक चष्मा आणला होता. विष्णू म्हातार बाबा त्याला जीवापाड जपत होते, गळ्यात तुळशी माळ अन् आता उतारवयात त्या तुळशी माळेच्या सोबत ही या चष्म्याची सुतळी होती. विष्णू म्हातार बाबा त्याचा तो निघला होता सावकाश केटलीला हातात घेऊन, मी न्याहाळत राहिलो दूरपर्यंत जास्तोवर त्याला. मी पण निघणारच होतो आता इतक्यात पण; आता कुठं बोर पिकली होती, मग गेलो बोरं खायला. अजून म्हणा तशी बोरं पिकली नव...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!