मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

गौताळा अभयारण्य,पितळखोरा लेणी भाग 2

आजच्या लेखमधून मी आपल्याला गौताळा अभयारण्य व जवळच असलेली पितळखोरा लेणी या दोन ठिकाणांबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करेल... #गौताळा_अभयारण्य... औरंगाबादपासून 75 कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य.डोंगरदऱ्यांच्या कपारी खाणीतून वाट काढत,उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्या सारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो..आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आपण या ठिकाणी अनुभवाल,डोळ्यांचे पारणे फेडणारे असे विविधतेने नटलेले हे गौताळा अभयारण्य. गौताळा अभयारण्याची 1986 साली स्थापना झाली.कन्नड तालुक्यातील 17 गावातील वनक्षेत्राचा अभयारण्यात समावेश होतो.कन्नडपासून अवघ्या 9 कि.मी. अंतरावरच अभयारण्य सुरु होते.तर चाळीसगावपासून 20 कि.मी अंतरावर एक फाटा आहे.त्या...

गौताळा अभयारण्य...

गौताळा अभयारण्य... गौताळा अभयारण्यबद्दल यापूर्वी माझे बरेच लेख प्रसिद्ध झाले आहे,परंतु पावसाळा आता काही दिवसांवर आला आहे,ट्रेकर्स सज्ज झाले आहे...खूप दिवस ट्रॅव्हल बॅग घरात एका कोपऱ्यात स्वस्थ पडून होती अन् ती आपल्याला आता पुन्हा ट्रेकिंग जाण्यासाठी खुणावते आहे.घरोघरी यावर्षी पावसाळ्यात कुठे फिरायला जायचे हा विषय घेऊन चर्चा होत आहेत तर तुमच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून माझा हा तुमच्यासाठी माहितीपर लेख लिहण्याचा एक प्रयत्न... त्यानिमित्ताने माझ्या माध्यमातून गौताळा अभयारण्याची पुन्हा एकदा आपल्याला ओळख होईल... तर मित्र/मैत्रणींनो गौताळा अभायरण्य हे मराठवाड्यातील सर्वाधिक मोठे अभयारण्य आहे.थोडक्यात या ठिकाणी आल्यावर तुमची कुठलीही निराशा होणार नाही कारण एकाच तालुक्यात तुम्हाला  ट्रेकिंग करण्यासाठी खूप मोठे अभयारण्य आहे,अनेक व्हिव पॉइंट,विविधतेने नटलेली वृक्ष,वेली संपदा, धबधबे,धरणे,किल्ले,लेणी अन् विविध दर्शनीय मंदिर हे आपल्याला काही 40 ते 50 किलोमीटर आतील अंतरात बघण्यास मिळेल... येणार कसे - रेल्वेने आलात तर - चाळीसगाव रेल्वस्थानकापासून पुढे बसेसने 20 कि.मी. विमानाने आलात...

#TitanicinfoBLS.

The wreck of the Titanic is protected by UNESCO from 15 April 2012 onwards.... The UNESCO 2001 Convention on the Protection of the Underwater Cultural Heritage applies to all traces of human existence having a cultural, historical or archaeological character which have been under water for at least 100 years. Thus, 15 April 2012 marks the moment from which on the Titanic wreckage is protected under the Convention. RMS Titanic was a British passenger ship that sank in the North Atlantic Ocean on 15 April 1912 at 2.20 am after colliding with an iceberg. Its sinking caused the deaths of 1,514 people. Its wreckage was discovered on September 1, 1985, during a joint French/U.S. expedition lead by Jean-Luis Michel of the French Research Institution for the Exploration of the Seas (IFREMER) and Robert Ballard. It was found approximately 340 nautical miles off the coast of Newfoundland, Canada 3,800 meters beneath the surface. The Titanic disaster led to major improvements in m...

हरवलेलं मन...

तुमच्या भटकण्यावर दोन-तीन कविता झाल्या,तिच्या आठवणीत दोन तीन लेख झाले,या सर्वांच्या विचारात माझी रात्रही ढळून गेली...दिवसही उगवून सकाळची दुपार झाली आहे,काय साध्य झालं ?  याचं उत्तर नाहीचे... फक्त इतकं आहे की,सद्या वेळ आहे ती कारणी  लागली आहे... वेळेचे गणित जर इतके सोप्पे झाले असेल तर खरच माझं भविष्य अंधारात दिसतंय व ते काही दूर नाहीये,बस इतकंच बाकी विचार करायचा नाहीचे सध्या... कारण विचारांना विचारांचे हात भेटले की त्यांना मोकळीक भेटत असते,मग ते या झळाया तुटणाऱ्या उन्हात आकाशात मुक्तपणे विहार करायला लागतात त्या काल्पनिक पंखांना शरीरास जोडते करून... काय हवे ? काय करतोय ?  याला उत्तरे नाहीचे सध्या ती शोधायची पण नाहीये... कारण कैफात मग,मन पुन्हा कल्पनेच्या जगात फिरून येतं मग मला भूतकाळ आठवतो... Written by, Bharat Sonwane...

हरवलेलं गावपण अन् आठवणीतले शहर...

हरवलेलं गावपण अन् आठवणीतले शहर... सांजेच्या प्रहरी रामाबाबा आपली बैलगाडी अन् दुधाची क्याटली घेऊन वावरातून निघाला,रस्त्यात गुरांसाठी काढून ठेवलेला हिरवा घास,मक्काची बारीक केलेली कुट्टी घेऊन तो ती बैलगाडीत टाकून तो रस्त्याला लागला. रस्त्यात सुमनबाई,शैली अन् सुमनबाईची नवी सूनबाई त्याला दिसल्या त्यांनाही त्याने बैलगाडीत बसवुन घेतले... रस्त्यात चहूकडे बैलांच्या खुराने उडणारी धूळ,त्यात लालभडक दिसणारा मावळता सुर्य मी बघत होतो...पायी चालत असल्याने एरवी रामाबाबा माझ्यापुढे निघून गेला हुता. बोडक्या टेकडीवर भिलाबाबाच्या दावणीला असलेल्या बक्र्या म्या... म्या... करीत ओरडत होत्या,भिलाबाबा तांब्या घेऊन बकरीचं दूध काढत बसला होता,मला बघून त्यानं शीळ फुंकली अन् मला त्याच्याकडे यायला खुणावू लागला मी हातवारे करून सांगितले येतुया... मी ठोकरा खात कसातरी भिलाबाबाच्या झोपडी पर्यंत पोचलो,अंगणात उभी केलेली खाट त्याने आडवी केली व मला बसायला लावले,मी बसलो...त्याने त्याच्या लेकीला राणुबाईला बकरीच्या दुधाची तीन कप चहा ठेवायला सांगितली अन् तो बकऱ्या बांधू लागला व मला बोलूही लागला... मग काय छोटे सरकार आज...

अनुत्तरित राहिलेले प्रश्न...

अनुत्तरित राहिलेले प्रश्न... अनुत्तरित आहे काही प्रश्न उत्तराविना अजूनही,प्रश्नच होते कुठे ते मागं सोडून दिलेल्या अडचणीच त्या...! प्रश्न उत्तरांचा खेळ जुळवून येतो बळजबरीचाच रोजचा, टीचभर पोटासाठी धंदा मांडलाय वेशीवर गरीबांच्या इज्जतीचा...! शब्दांना मुभा आहे फक्त जित्यापणी मागत्या हाताने मागण्याची,बाकी हात आमचे तेव्हाच कलंक झाले जेव्हा सत्याची ओढ त्यांना लागली...! प्रश्न उत्तरांच्या या खेळात रोज हरण्याशी मुक्काम आमचा,उत्तरे मिळालेल्या निःशब्द त्या भावनांना...! प्रश्र्नच किती ते आमचे उत्तरे शोधत  उत्तरांनाच तुम्ही प्रश्न निर्माण केली,त्या जीवाला आता नव्या पद्धतीने मागायची सवय वेगळी फक्त तुम्ही ती लावून दिली...! सावरा तुम्हीच आता प्रश्न आणि उत्तरांना,फक्त जगण्यासाठी लागणाऱ्या गरजेवर भागवुन घेऊ आम्ही नका बोलवू पुन्हा कधी आम्हा गरीबांना...! Written by, Bharat Sonawane...

आठवणीतले बालपण....

खिडकीतून वळवाच्या पावसाच्या सरी पडतांना दिसायच्या,अलीकडे त्यांना खिडकीतून टिपणे हे एकच काम मी करत असायचो... घराच्या बाजूला चहूकडे लाल मातीची जमीन जिथवर नजर जाईल तिथवर दिसायची,मध्येच कुठेतरी काळ्या खडकांचा समुह समुद्रात असणाय्रा एकाकी बेटांप्रमाणे भासायचा... पडता पाऊस या लाल मातीत शिंतोड्याच्या रुपात जाऊन उताराच्या दिशेनं वाहू लागायचा,वाहणारे सर्व पाणी परिसरात असलेल्या छोट्याश्या धरणरुपी तलावात जाऊन स्थिर होत असायचे. वळवाचाच पाऊस तो फार फार पंधरा वीस मिनिटे चालायचा अन् मग उघडुन जायचा मग उगवुन येणारं ते सप्तरंगी इंद्रधनुष्य हे सर्व डोळ्यांचे पारणं फेडणारं असायचं... त्याला बघण्यासाठी आणि पावसाने ओल्या झालेल्या जमिनीतून येणाऱ्या सुगंधाला,खळखळ वाहणार्या पाण्याला अनुभवण्यासाठी आम्ही सर्व कॉलनीतील दहा-बारा मुलं घरा बाहेर निघायचो... घरातून हाफ चड्डी,फुल बाह्यांचा ड्रेस सावरत निघालो की,छोट्या छोट्या तयार झालेल्या नैसर्गिक नाल्यांमधून वाहणारे पाणी लाल चिखल,दगड,गोटे यांनी आडवत बसायचो...हे सर्व करतांना अनवाणी पायाला लागणारा मऊ चिखल खूप आनंद देऊन जायचा,भटकत भटकत धरणाच्या पाळेवरून जातांनी...