मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Smart City - Aurangabad.!

Smart city - Aurangabad..! १९८५ साली औरंगाबाद येथे बजाज कंपनीचा प्लांट उभारण्यात आला आणि औरंगाबाद शहराला एक नवीन ओळख मिळण्यास सुरुवात झाली.यापूर्वी औरंगाबाद पर्यटन क्षेत्रात "पर्यटन राजधानी" म्हणून आपले स्थान कायम ठेवून होतेच.परंतु आता नव्याने होणारी "ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल हब सिटी" ही औरंगाबाद शहराची ओळख झाली होती...! नव्वदीच्या दशकात औरंगाबाद शहराची बऱ्यापैकी अर्थव्यवस्था ही औद्योगिक वसाहतीत नव्याने निर्माण झालेल्या कंपन्यांनवर अवलंबून होती.यात मुख्यत्वे बजाज कंपनी ही त्यावेळी औरंगाबाद शहरासाठी खूप महत्त्वाची कंपनी होती ती आजही आहे,आता तिच्या सोबतीने शेकडो कंपन्या आजमितीला शहराच्या चहूबाजूने औद्योगिक वसाहतीत उभारल्या गेल्या आहे..! औरंगाबाद शहरातील काही जुने लोकं आजही म्हणतात की,दिवाळीच्या दिवसांमध्ये जोवर बजाज कंपनीतील कामगारांना बोनस मिळत नाही तोवर शहराची बाजारपेठ ही थंडावलेली असायची अन् ज्या दिवशी दिवाळीचा बोनस कंपनीतून कामगारांना मिळत असायचा त्या दिवशी बाजारपेठ बघण्यासारखी फुललेली असायची..! अर्थात औरंगाबाद शहराचे अर्थकारण हे या कंपनीच्या ...

औद्योगिक वसाहतीत भटकत असलेला मी भटक्या..!

औद्योगिक वसाहतीत भटकत असलेला मी भटक्या..! अलीकडे पहाटेची उन्हं अंगावर यायला लागली आहे काहीच करावेसे वाटत नाही,हातपाय गळून जातात.फक्त मनसोक्त झोपून रहावं,नाहीतर पुस्तकं वाचत निपचित पडून राहावं असं वाटतं.कधी तंद्री लागलीच तर हातात पेन घेऊन किंवा ब्लॉगवर काहीतरी टाईप करत बसावे वाटते,या दिवसातली सकाळ खूप कंटाळवाणी,उदास वाटणारी अन् काहीही करायला नकोसं वाटणारी असते..! पण काही दिवसांना पर्याय नसतो,मग अंगातला आळस झटकून पुढच्या कामाला लागावेच लागते.इतकं सर्व असूनही माझ्या मनात जेव्हा औद्योगिक वसाहतीत भटकंती करायला जायचं आहे हा विचार मनात आला की मी लगेच तयार होवून औद्योगिक वसाहतीच्या भरदुपारी काहिलीच्या ऊन्हात,सूनसान वाटणाऱ्या वाटांना भटकंती करायला निघून जातो..! मला या वाटांशी का इतका लगाव आहे किंवा का मला इतकी जवळीक त्यांच्याबद्दल वाटते हे मला आजवर कळले नाहीये.काहीही साध्य करायचं नसतांना फक्त भटकंती करायची म्हणून कित्येक दिवस मी या अवाढव्य शहराच्या सभोवताली असलेल्या औद्योगिक वसाहतीत पायीपायी भटकंती करत आडमार्गे भटकत राहिलो आहे..! उन्हाळ्याच्या या दिवसात असच वाळलेल्या,भुरक्या पांढऱ्य...

पुस्तक-तीन शिल्पकार. लेखक-अरुण कुलकर्णी.

पुस्तक-तीन शिल्पकार. लेखक-अरुण कुलकर्णी. आज पहाटे एक छोटंसं पुस्तक वाचून संपवलं,पुस्तक जितकं छोटंसं होतं तितकंच सुंदर अन् थोडक्यात खूप काही सांगून जाणारं आणि हवंहवंसं वाटणारं असं हे पुस्तक होतं..! "अरुण कुलकर्णी" लिखित "तीन शिल्पकार" हे "६५" पानांचं छोटंसं पुस्तक आज वेळ भेटेल तेव्हा वाचून संपवलं.म्हणजे सलग वाचत बसले तर तासाभरात हे पुस्तक पूर्ण होईल असं हे पुस्तक आहे..! सर्वप्रथम सांगायला आवडेल की जी चित्रकार लोकं आहेत त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं..! ज्याप्रमाणे लेखक कुठेही गेला की त्यांच अंतरमन त्याला नेहमीच सभोवताली दिसणाऱ्या निसर्गाबद्दल,त्याच्या सभोवताली घडणाऱ्या घटनांबद्दल आपल्या लेखणीत काही कैद करून ते शब्दरुपात उतरवता येईल का हा विचार करायला लावत असतं.अगदी त्याचप्रमाणे चित्रकारसुद्धा असाच विचार करत असतो की माझ्या अंतरमनात चित्राची मी तयार केलेली जीवंत फ्रेम मला कुठे भेटेल का अन् मी स्टॅण्ड लावून केव्हा ती जीवंत फ्रेम मला भेटल्यावर तिला मी केव्हा कॅनव्हासवरती उतरवेल..! तर अश्या चार चित्रकारांची परंतु त्यातील एकाच चित्रकाराची कथा स...

सांध्यपर्वाचा कवी कवी.ग्रेस..!

सांध्यपर्वाचा कवी कवी.ग्रेस..! आज सांध्यपर्वाचा कवी,कविवर्य ग्रेस यांचा स्मृतिदिन..! दिवसभर त्यांच्या आयुष्यावर केलेले लेख विविध माध्यमातून वाचनात आले अन् मन दुःखात,एकांतात जाणवणाऱ्या एकटेपणात बुडत गेले.... काय बोलावं कवी ग्रेस यांच्याविषयी खरच अनोखं रसायन आहे,एक असं रसायन जे आजवर त्यांच्या अनोख्या शैलीतून मराठी साहित्याला,काव्य लिखानाला एक वेगळं वळण देणारे ठरलं आहे...  खरं तर आपल्या सारख्या सामान्य माणसानं काय बोलावं या साहित्यातील ध्रुव ताऱ्याबद्दल,हो ध्रुव ताराच भासतात ते मला मराठी साहित्य विश्वातील. कारण,मराठी साहित्यात ध्रुव तार्यासारखं त्यांच स्थान अढळ व त्या एक ठीकांणच आहे,जिथवर कुणीही जाऊ शकत नाही अन् कुणी जाणारही नाही.कारण त्यांनी ते आपल्या अनोख्या कवितेच्या लिखाणातून, व्यक्त करण्याच्या धाटनितून ते मिळवलं आहे .... १९६० नंतरच्या कालखंडात आपल्या अनोख्या बहारदार काव्यशैलीने हा कालखंड ज्या प्रतिभासंपन्न कवीने उजाळुन टाकला ते कवी म्हणजेच कविवर्य कवी ग्रेस. या काळात अनेक कवी होऊन गेले,परंतु कविवर्य ग्रेस हे नेहमीच उजवे अन् अनोखे ठरत राहिले.त्यांच्या कवितांमधून एका आग...

माझी सायंकाळ..!

माझी सायंकाळ..! सायंकाळची वेळ पावलं या छोट्या छोट्या टेकड्यांकडे कुच करतात,मनात असंख्य प्रश्न असतात,रस्त्यानं अनेक अनोळखी चेहरे दिसत असतात.कधीतरी मनात विचार येऊन जातो की या अनोळखी व्यक्तींशी आपल्या मनातल्या भावना व्यक्त कराव्या,बोलतं व्हावं त्यांच्याशी.परंतु पुढच्या क्षणाला हे ही कळून चुकते की,जितका सहज आपण विचार करतो तितकं सहज हे जग नाही,या जगाची अन् जगण्याची येथील माणसांची रित खूप वेगळी आहे..! मग कित्येकदा आपल्याच मनाच्या प्रश्नांना आपणच उत्तर द्यावी,वेड्या मनाला समजूत घालावी अन् आजची सायंकाळ,आजच आपलं संपू्ण जाणं उद्यावर येऊन ठेपल्या जातं इतकंच.छान असतं हे आपल्या विश्वात आपण रममाण राहून आपली प्रश्न सोडवणे.अस्ताला जाणारा सूर्य जसजसा अस्ताला जात असतो तसेतसे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत जातो अन् काळोखात आपल्या आयुष्यात उद्याची कोवळी किरणं आजच्या सांजेला येऊ बघतात..! इतकंच..! मनाची असलेली अवस्था लिखाणात कैद करणं फार अवघड म्हणून अलीकडे त्या अवस्थेला घेऊन लिहने टाळतो. छान आहे अस्ताला जाणारा सूर्य,सांजेच्या वेळी आसमंतात घिरट्या घालणारे पक्षी,दूरवर आपल्या विचारात मग्न राहून...

पहाटेच्या उदासवाण्या वेळेचे गणित..!

पहाटेच्या उदासवाण्या वेळेचे गणित..! सकाळच्या उदासवाण्या वेळेत पहाटेच उठून आवरून सावरून बसलं की   जसजसा उन्हाचा पारा चढत जातो तसतसे शरीरात मरगळ येत जाते,दिवस नकोसा वाटतो,झोप हवीहवीशी वाटते मग पुन्हा कितीक वेळ निपचित त्राण गेल्यासारखे कॉटवर पडून असतो..! उन्हं अंगावर यायला लागले की पुन्हा जाग येते,संथपणे वाहणारा कोरडा शुष्क वारा नकोसा वाटतो.मी खूप जीवावर करून एखादं अधुरं वाचनाचं पुस्तक हातात घेतलं,तसं आता हातच्याला असलेली सर्वच पुस्तके वाचून संपवली आहे नवीन घेतले किंवा भेटले तर ते वाचूनच मी पूर्ण थांबतो म्हणून वाचन करावं किंवा वाटावं असं सध्यातरी घरात काही नाही,मग जे मिळेल ते वाचत बसतो..! जशी राक्षसाला खाण्याची भूक असते तशी मला अलीकडे अर्थपूर्ण वाचनाची भूक लागली आहे,जी दिवसेंदिवस वाढत आहे.सध्या आयुष्यात बराच निवांतपणा आहे त्यामुळं असावं कदाचित.पुढे चालून व्यस्थतेच्या काळात सुद्धा ही भूक अशीच वाढत राहील असे वाटते आहे,शरीराला मनाला ती सवय लावून घ्यायची आहे..! माझी ईच्छा इतकीच आहे आपण इतकी पुस्तके वाचावी,घरात संग्रही करावी की घरात आपल्या वाचनाने समाजातील माहित नाही पण आप...

वास्तव्य समुद्र किनारचे..!

वास्तव्य समुद्र किनारचे..! भर सकाळची वेळ कोवळी उन्हं अंगावर येतात,घराच्या सभोवताली असलेल्या पाडांच्या झाडावर गळतीस आलेल्या,वाळलेल्या झावळ्यांचा आवाज झोपल्या ठिकाणी येतो.वाऱ्याचा सुरसुर करणारा आवाज अन त्याच्या लगोलग असलेला समुद्रकिनारी घर असल्यानं पहाटे-पहाटे समुद्राच्या गाजेचा येणारा आवाज झोपेत हे सर्वच संगीत ऐकत मी निपचित पडलेलो असतो..! समुद्र किनाऱ्याशी समीप असलेल्या,झोपडीवजा घरं असलेल्या घरातील किंवा ऐसपेस बंगले असलेल्या घरांची पहाट काही हळुवारच होत असते.त्यांच्या आयुष्यात एक हळुवारपण आलेलं असतं,समुद्राला घेऊन एक आपलेपण असतं,रोजचं भटकणं असो किंवा आयुष्याला घेऊन आयुष्याचे स्वगत करताना आपसूकच समुद्र अन त्याच्या सानिध्यात घातलेली सकाळ असो किंवा सायंकाळ हवीहवीशी वाटणारी असते..! मला नेहमीच समुद्र किनारी असलेल्या सभोवतालच्या परिसरात काळोख अधिकच गडद असल्याची अनामिक जाणीव होत असते,जी सभोवताली असलेल्या महादेवाच्या देऊळात अजूनच प्रकर्षाने जाणवते.एक प्रकारचं दमट वातावरण,देऊळाच्या सभोवताली वाहणारा गोड्या पाण्याचा झरा असं काही मनात समुद्र किनारा आला की त्याच्या लागून माझ्या मनात येणा...