हृदयात वाजे Something..! सारे जग वाटे Happening..! कदाचित पुढील पंधरा मिनिटांच्या आत जोरदार पाऊस येईल असं वाटत आहे.मी खिडकीत बसून काचेच्या पलीकडं असलेलं हे मनमोहक दृश्य न्याहाळत बसलो आहे... इमारतीच्या आठव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमधून मी हे सर्व बघत असतांना दूरवरून येणाऱ्या पावसाच्या सरी क्षणाक्षणाला जवळ येत असल्याचा भास होतो आहे. काही वेळापूर्वी हिरवाईने नटलेला शहराच्या चहूबाजूंनी असलेला डोंगररांगेचा परिसर आता मात्र जिथवर नजर जाईल तिथवर पावसाने न्हाऊन निघाला आहे.इमारतीच्या खाली असलेली माणसे त्यांची कामे आवरती घेत आपलं बाडबिस्तर झाकूनपाकून ठेवत आहे. सिक्युरिटी गार्ड सोसायटीच्या आवारात अस्तव्यस्त गाड्यांना पार्कींगमध्ये नीट लावायला सांगतो आहे.इतक्या उंचावरून तो हातवारे करत जे काही लोकांना सांगत आहे,त्यावरून तो रोजच या माणसांना सांगून कंटाळला असल्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर जसे दिसत असतील तसे माझे नजरेसमोर येऊन गेले आहेत. हॉलीबाॅल खेळणारी मुलं खेळाच्या मैदानावरून घराच्या दिशेने सायकली घेऊन निघाली आहे.त्यातील एकाच्या सायकलची कदाचित चैन उतरली असावी,त्यामुळं तो सायकल...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!