मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग -४

वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग -४ पहाटेच्या चारला रानातली लाईन येणार अन् रानात गव्हाला पाणी भरायला म्हणून गावातील लोकं उठून रानाच्या दिशेनं आपलं आवरून सावरून निघाली होती. गावाच्या जवळ असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारे गावची तरुण पोरंही सहा वाजता गावच्या फाट्यावर येणारी बस अन् तिचा अंदाज घेत गावच्या सडकीनं निघाली होती. गावातली काही शेतकरी पहाटेच वावरातला अख्खर साफ करायला, दूध काढायला म्हणून जातांना सडकीने दिसत होती. कोंबड्याच्या बांगेसरशी सूर्योदय झाला अन् तांबडा पिवळसर सूर्याचा कोवळा प्रकाश साऱ्या पंचक्रोशीवर आला तसे गावाला सोनेरी लकेरीत मडवावे तसं गाव चमचम करू लागले होते. गावातली लगबग सुरू झाली तसं, गावातली म्हातारी माणसं आपलं सकाळचे अंघोळपाणी करून सावता माळ्याच्या देवळात दर्शन करायला म्हणून देवळाकडे निघाले होते. रामा कुंडूरसुद्धा कोंबड्याच्या बांगेसरशी उठला शिवनामायच्या पात्रात जाऊन अंघोळ करून देवपूजा करून तो लक्षी आईच्या पिंपळ पारावर येऊन बसला संतू अण्णा तलाठी अजून झोपलेले पाहून त्यांना उठवत रामा कुंडूर लक्षी आईच्या पिंपळ पार झाडून घेऊ लागला.  पस्तीशीत असलेला ...

कंत्राटी कामगारांचं ओसाड वर्तमान ..!

कंत्राटी कामगारांचं ओसाड वर्तमान ..! भर दुपारची वेळ भर उन्हात दीड वाजता सेकंड शिफ्टसाठी जाण्याची तयारी करतोय. इतक्या कडक उन्हात पातळ, पतली भाजी खायला नको वाटते अन् कोरडी भाजी असली की जसं जोमाने दीड-दोन पोळ्या नरड्याच्या आत कोंबल्या जातात तसे काही करून जेवण आवरते घेऊन, मळकटलेल्या चादरीच्या कॉटवर पडून राहीलो आहे. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांच्या आयुष्याचं गणित खूप सोप्पं असतं. कारण त्यांच्या आयुष्यात फार काही बदल होत नसतात. घड्याळीच्या काट्यावर फर्स्ट, सेकंड, थर्ड करत त्यांचं आयुष्य चालू असतं. सगळं व्यवस्थित चालू असलं की कसं बाईचं पाळी चक्र दर महिन्याला फिरत राहते अन् काही घडवून यायचं, आणायचं असलं की नऊ महिने नऊ दिवस एक जीव पोटात वाढवला जातो. तसंच काहीसं सगळं जुळून आलं की नऊ महिने कंत्राटी पद्धतीने ही कामगार माणसं एका कंपनीत काम करत राहतात. मग जसं बाई मोकळी होते, तसं पुन्हा मोकळं व्हायचं. दोन महिने परत याच्या खाली त्याच्या खाली करत काम मिळवायचं. दोन महिने झाले की पुन्हा नऊ महिने, सहा महिने हे चक्र चालू असतं. जोवर हातपाय काम करत असतात किंवा तसं सुपरवायझरला वाटत असतं...

कंत्राटी कामगारांचा आयुष्य संघर्ष ..!

कंत्राटी कामगारांचा आयुष्य संघर्ष..! आजची सुट्टी होती, कालची थर्ड शिफ्ट करून आल्यामुळे आजचा अर्धा अधिक दिवस झोपेतच निघून गेला. दुपारची उन्हं खिडकीच्या तावदनातून आत डोळ्यावर आली तसं; झोप उघडली अन् मी अंथरुणावर उठून बसलो.  फ्लॅटमध्ये पाच कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणारे आम्ही कामगार मित्र असल्यानं, आठवडाभर एका फ्लॅटमध्ये असूनही एकमेकांना भेटायला वेळ नसते. आज तिघे लोळत पडलो होतो अन् दोघे पहाटेच उठून टपरीवर चहा सिगरेट प्यायला म्हणून निघून गेली होती. कॉटवर पडल्या पडल्या मी शरीराला आळोखे-पिळोखे देत लोळत पडलो होतो, आज सगळेच रूमवर असल्यानं रूममध्ये दीड किलोचे पाच सेफ्टी शूजचे जोड होते. त्याचे आठवडाभर उन्हाळ्यात पायाला घाम येतो म्हणून साचलेले दहा सोक्सचे जोड मी झोपलो त्याच्या बाजूलाच पडले होते. वाऱ्याच्या झुळकेसरशी तो सोक्सचा आंबट वास माझ्यापर्यंत आला अन् मी ताडकन उठून माझ्या फ्लॅट पार्टनरच्या आई बहिणींचा उद्दार केला. भेंचोद आजची पहाट किरकिरीने सुरू झाली होती. उठलो तसा सॉक्स निरम्यात भीजू घातले अन् मी अंघोळीला निघून गेलो. पाच रुपयांची गरम पाण्याची बकेट परवडत नाही म्हणून हटकून...

दरवळ..!

दरवळ..! हल्ली रोजची सायंकाळ अन् कधी मनाला वाटलं तर भर दुपारही अश्या धावण्याने होत आहे. का धावतो ? कश्यासाठी ? धावून काय भेटते ? या प्रश्नांना उत्तरं नाहीये. पण; एकदा धावायला लागलो की आठ-दहा किमी फक्त धावतच राहतो. हल्ली धावण्यात एक अनामिक सूख वाटायला लागलं आहे, धावणे माझ्यासाठी एक व्यसन झालं आहे. जेव्हा मनाचा आदेश येतो की आता धावायचं चल तेव्हा मी धावायला सुरुवात करतो. अन् ; जोवर मनाला वाटत नाही की, आता थांबायला हवं तोपर्यंत मी धावतच राहतो. धावण्यासाठी काही ठराविक मार्ग करून घेतले आहे. मग वेळेनुसार तर कधी मनाला योग्य वाटेल त्या मार्गानं धावतो.  काल असच पाच वाजता धावायला सुरुवात केली. गौताळा अभयारण्याचा परिसर मी राहतो त्या शहराला लागून असल्यानं नेहमी या अभयारण्याच्या हद्दीत मी धावत असतो. कधीतरी डोंगरदऱ्या असलेल्या रस्त्याला तर कधी अभयारण्याच्या आतून जाणाऱ्या डांबरी रस्त्याला. काल पहिला साडेचार किमीचा टप्पा पार झाला अन्  अभयारण्याच्या गेटवर थांबलो. कितीही धावलो किंवा नाही धावलो तरी इथे मी नकळत थांबून घेतो. कारण इथे मला माझ्या भविष्यातील हालचाली खुणावतात, सगळं सोयीस्कर ...

पदव्युत्तर शिक्षणासाठी तरुणांचा ओघ व्यवसाय प्रशासन, व्यवस्थापन (M.B.A) या शाखेशाखेकडे ..!

पदव्युत्तर शिक्षणासाठी तरुणांचा ओघ व्यवसाय प्रशासन, व्यवस्थापन (M.B.A) या शाखेकडे..! २०२० नंतर सुरू झालेल्या दशकात शिक्षण क्षेत्राचा विचार केला असता बहुतेक पदवी प्राप्त तरुणांचा कल किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात तरुणांची पसंती ही व्यवसाय प्रशासन, व्यवस्थापन (एम.बी.ए) या शाखेला मिळताना दिसत आहे. बहुतेक तरुण आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापन शाखेत आपल्याला योग्य तो अभ्यासक्रम घेऊन आपल्या भविष्यासाठी बघितलेली स्वप्ने, करिअर दृष्टिकोनातून लवकर यशस्वी, सेटल्ड होण्यासाठी तरुण पिढी इकडे वळतांना दिसत आहेत. तरुण या शिक्षणाकडे वळण्यासाठी अनेक कारणे आहेत. जसे की, पदवीपर्यंत शिक्षण घेतलं की अनेक तरुणांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे. कुणाला आपल्या आवडीनुसार प्रायव्हेट क्षेत्रात आपलं नशीब आजमावायचे आहे. ज्यामध्ये मोठ मोठाल्या कंपन्यांसाठी, फर्मसाठी त्या तरुणांना नोकरीत स्थिर व्हायचं आहे. आजच्या काळात सर्वांना उच्चस्तरीय कंपन्यामध्ये म्हणजेच मल्टिनॅशनल कंपनी देशांतर्गत कंपनीमध्ये एमबीए प्रोफेशनल ची खूप मागणी आहे. एमबीए शाखेचे पदव्युत्तर शिक्षण घे...

प्रवासवर्णने आयुष्यातून सुटलेल्या क्षणांची..!

प्रवासवर्णने आयुष्यातून सुटलेल्या क्षणांची..! रात्रीच्या साडे दहाच्या परतीच्या ट्रेनमध्ये बसलो. ट्रेन पुणे स्टेशनवर आली तस्सं ट्रेनच्या दिशेनं ट्रेनची वाट बघणारे सर्व प्रवासी ट्रेनमध्ये एक एक बोगी करून आत घुसू लागले. हळू हळू सर्व ट्रेन फुल झाली अन् माझी स्लीपरची तिकीट असूनही मला नाईलाजास्तव जनरलच्या डब्ब्यात बसावं लागलं. पर्यायही नव्हता, रात्रभर येणारी दुसरी ट्रेनही नव्हती. मनाची समजूत घातली अन् आज जनरल डब्ब्याचा प्रवास अनुभवू म्हणून मी ही मग जनरल डब्ब्यात घुसलो. डब्ब्यात घुसलो तसे युपी बिहारचे काही माणसं बाथरूमच्या दाराजवळ बसून प्रवास करत होते. आत पूर्ण डब्बा प्रवाश्यानी भरलेला असल्यानं मध्येही जागा नव्हती.  युपी बिहारच्या त्या सात-आठ मित्रांशी गप्पा करत मी उभाच प्रवास करू लागलो, तेही अडचणीत दाटीवाटी करून बसलेले होते. थंडी, वाऱ्यापासून अडोसा असं काहीही नव्हतं अन् अश्या वातावरणात ते मागील सहा तासांपासून प्रवास करत होते. त्या एकमेव जनरल डब्ब्यात एकमेव बाथरूम असल्यानं बाथरूमला येणारी जाणारी स्त्री पुरुष सर्व तिथून जात. त्या बाथरूमच्या ओल्या चपला त्यांना ओलांडून पुन्हा डब्...

पुस्तक: बारबाला. लेखिका वैशाली हळदणकर.

पुस्तक:बारबाला. लेखिका: वैशाली हळदणकर.