मुख्य सामग्रीवर वगळा

पदव्युत्तर शिक्षणासाठी तरुणांचा ओघ व्यवसाय प्रशासन, व्यवस्थापन (M.B.A) या शाखेशाखेकडे ..!

पदव्युत्तर शिक्षणासाठी तरुणांचा ओघ व्यवसाय प्रशासन, व्यवस्थापन (M.B.A) या शाखेकडे..!



२०२० नंतर सुरू झालेल्या दशकात शिक्षण क्षेत्राचा विचार केला असता बहुतेक पदवी प्राप्त तरुणांचा कल किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात तरुणांची पसंती ही व्यवसाय प्रशासन, व्यवस्थापन (एम.बी.ए) या शाखेला मिळताना दिसत आहे.
बहुतेक तरुण आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापन शाखेत आपल्याला योग्य तो अभ्यासक्रम घेऊन आपल्या भविष्यासाठी बघितलेली स्वप्ने, करिअर दृष्टिकोनातून लवकर यशस्वी, सेटल्ड होण्यासाठी तरुण पिढी इकडे वळतांना दिसत आहेत.

तरुण या शिक्षणाकडे वळण्यासाठी अनेक कारणे आहेत. जसे की, पदवीपर्यंत शिक्षण घेतलं की अनेक तरुणांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे. कुणाला आपल्या आवडीनुसार प्रायव्हेट क्षेत्रात आपलं नशीब आजमावायचे आहे. ज्यामध्ये मोठ मोठाल्या कंपन्यांसाठी, फर्मसाठी त्या तरुणांना नोकरीत स्थिर व्हायचं आहे.

आजच्या काळात सर्वांना उच्चस्तरीय कंपन्यामध्ये म्हणजेच मल्टिनॅशनल कंपनी देशांतर्गत कंपनीमध्ये एमबीए प्रोफेशनल ची खूप मागणी आहे. एमबीए शाखेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले की या अश्या संधी उपलब्ध होतात. या संधीच्या माध्यमातून या शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेला तरुण काही वर्ष अनुभव घेऊन मोठ्या पदावर काम करू शकतो. हे सगळं तो आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करत असताना नोकरीत हळू हळू आपले पाय रोवत करत असतो. 

प्रायव्हेट क्षेत्रात काम करतांना यशस्वी होण्यासाठी प्रॉडक्शन्स प्लॅनिंग, ऑपरेशन विभाग, फायनान्स विभाग आणि मार्केटिंग यां गोष्टींचा समतोल जुळून येणे खूप महत्त्वाचे असते. व्यवसाय प्रशासन, व्यवस्थापन (एम.बी.ए.) या पदव्युत्तर शिक्षणात आपण कुठल्याही एका आपल्या आवडत्या विषयात पदव्युत्तर शिक्षण करू शकतो. ज्यामध्ये की या सर्व गोष्टींना आपल्या अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. आपल्या आवडीनुसार एम.बी.एच्या द्वितीय वर्षात Specialization निवडून त्यात शिक्षण घेत आपलं करिअर या माध्यमातून सेट करू शकतो.

या शिक्षणात आपल्या आवडीप्रमाणे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने तरुणांचा कल या शिक्षणाच्या दिशेनं आहेच. ज्यात करिअरचा विचार केला असता यशस्वी होण्याचे चांन्सेस मोठ्या प्रमाणात आहे.

ग्रॅज्युएशन झाल्यानंतरचांगला जॉब मिळवण्या करिता आणि ज्यांना बिझनेस मॅनेजमेंट मध्ये आपले करिअर करायचे असते असे विद्यार्थी एमबीएला प्रवेश घेतात. पण आपल्याला माहिती आहे काय एमबीए म्हणजे काय होते..? एम बी ए चा फुल फॉर्म काय आहे..? एम बी ए चा मिनिंग इन मराठी मध्ये काय होतो..? आजच्या या पोस्टमध्ये आपण एमबीए काय आहे. एम बी ए चा फुल फॉर्म काय आहे..? एम बी ए केल्याने काय फायदे आहे..? एमबीए कोण करू शकते..? यामध्ये करिअर कसे करायचे या सर्व विषयाबद्दल प्रत्येकांच्या मनात प्रश्न असतात. 
तर चला एमबीए बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

थोडक्यात जाणून घेऊया व्यवसाय प्रशासन, व्यवस्थापन (एम.बी.ए.) (मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन) शाखेबद्दल. 

एम.बी.ए. साठी पात्रता काय ..?
जर तुमचे ग्रॅज्युएशन पुर्ण झालेले असेल आणि तुम्ही तुमची पदवी ५०% पेक्षा जास्त एकुण गुण मिळवुन उत्तीर्ण झाला आहात तर तुम्ही एमबीएसाठी पात्र आहात. एमबीएसाठी सायन्स, कॉमर्स आणि आर्टस् कोणत्याही शाखेमधुन तुम्ही ग्रॅज्युएशन केलेले असले तर तुम्ही प्रवेश घेण्यासाठी पात्र आहात.

एम.बी.ए. साठी द्याव्या लागणाऱ्या काही प्रवेश परीक्षा
महाराष्ट्रामध्ये कोणत्या ही कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही MAH-MBA/MMS CET ही प्रवेश परिक्षा देणे गरजेचे आहे. काही कॉलेज त्यांची वेगळी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतात. एमबीए प्रवेश परिक्षेची खालीलप्रमाणे नावे आहेत. MAH CET, CAT, SNAP,XAT,CMAT
जर तुम्ही महाराष्ट्रात एखादया कॉलेज मध्ये प्रवेश घेत आहात, तर MAH-MBA/MMS CET हया परिक्षेची मी शिफारस करतो. कारण महाराष्ट्रातले जवळ जवळ सर्व कॉलेज ह्या परिक्षेच्या आधारे प्रवेश स्वीकारतात.

1) Full Time MBA: फुल टाईम एम.बी.ए हे दोन वर्षांचे पदव्युत्तर शिक्षण आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी या प्रकारे एम. बी. ए करण्यास प्राधान्य देतात. 
2) Part time MBA: जर आपल्याला जॉब सोबत एमबीए करायची असेल तर आपण हा कोर्स करू शकता.
3) Evening MBA: हा पण एक फुल टाइम एमबीए कोर्स आहे. पण यामध्ये फरक एवढा आहे की कॉलेज दिवसांऐवजी संध्याकाळला घेण्यात येते.
4) Executive MBA: हा कोर्स करण्यासाठी आपल्याला एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये तीन ते पाच वर्ष काम केल्याचा अनुभव असणे गरजेचे आहे. यामध्ये आपल्याला बिझनेस इंडस्ट्रि या बद्दल माहिती असणे गरजेचे आहे. Executive MBA करण्यासाठी एक ते दोन वर्षाचा कालावधी लागतो.

एम.बी.ए करत असताना प्रथम वर्षात आपल्याला फक्त व्यवसाय अन् संबंधित विविध माहिती हे प्राथमिक टप्प्यात दिली जाते, जो की या शिक्षणाचा पाय ठरतो. एम.बी.ए करत असताना द्वितीय वर्षात आपल्याला आपल्या आवडीनुसार Specialization निवडता येते, ज्या माध्यमातून आपला नोकरीचा मार्ग खूप सहज होतो.
द्वितीय वर्षाला असताना आपण खालीलपैकी आपल्या आवडीनुसार Specialization निवडू शकतो.

1)Marketing Management.
2)Finance Management.
3)(HR) Human Resources Management.
4)(IT) Information Technology Management.
5)Production Management.
6)Operation Management.
7)International business Management.
8)Healthcare management.

एम.बी.ए. नंतर नोकरीच्या संधी पुढील लेखात.
क्रमशः 
Written by,
Bharat Sonawane.
MBA : (Production & Operation Management).
SYCET, Aurangabad.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...