मुख्य सामग्रीवर वगळा

गॉईंग ग्लोकल..! लेखक: दत्ता जोशी.

गॉईंग ग्लोकल..!
लेखक: दत्ता जोशी.


"लोकल" उद्यमींच्या "ग्लोबल" गुणवत्तेच्या यशोकथा सांगणारं हे पुस्तक. साधारण दोन महिन्यांपूर्वी पुस्तकाचे लेखक व मुक्त पत्रकार श्री. दत्त जोशी सर यांच्याकडून छ.संभाजी नगर येथे त्यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत भेट मिळाले.

या पुस्तकाबद्दल लिहण्यापूर्वी सरांशी झालेली ओळख कशी झाली हे सांगायला आवडेल. दोन-अडीच महिन्यांपूर्वी सर आमच्या कन्नड येथील व मराठवाड्यातील सर्वाधिक मोठ्या वाचनालयात म्हणजेच " विकास महर्षी बाळासाहेब पवार वाचनालय,कन्नड " येथे व्याख्यानास आले होते.

तरुण युवक, युवतींसाठी हे व्याख्यान खूप महत्वपूर्ण होते. नव्यानं उभारणारे उद्योग, त्या उद्योग उभारणीसाठी येणाऱ्या असंख्य अडचणी अन् या सगळ्या गोष्टींना तोंड देऊन शून्यातून आपलं विश्व निर्माण करत कित्येकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उद्योजकाचा हा सर्व प्रवास. आजची तरुण पिढी उद्योगधंदा, नोकरी या गोष्टींकडे कोणत्या नजरेतून बघते, त्यांचे मते काय.
अश्या अनेक विषयांवर हे व्याख्यान होतं.

व्याख्यानाचा हा सर्व विषय माझा आवडतीचा अन् जवळचा असल्यानं व औद्योगिक वसाहतीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांवर मी नियमित लेखन करत असल्यानं हे सगळं मला ओळखीचं होतं. पण; मला या व्याख्यानातून ते अजून खोलात जाऊन जाणून घेता आलं, समजून घेता आलं. हे सगळं समजून घेण्यासाठी मी व्याख्यानाला गेलो अन् मलाही व्याख्यान आवडले.

सवयीप्रमाणे व्याख्यान आवडले म्हणून सरांना फेसबूकवर मॅसेज केला. पुढे सरांनी माझ्या ब्लॉगवर माझं काही लेखन वाचलं अन् भेटण्याची इच्छा दर्शविली. काही दिवसांनी माझ्या छ.संभाजी नगरच्या दौऱ्यात सरांची भेट झाली.

मग असंख्य विषय कंत्राटी कामगार, नव उद्योजक, नव्याने उभारणारे उद्योग, ऑरिक सिटी,शेंद्रा औद्योगिक वसाहत माध्यमातून शहरात येणारे नवीन प्रकल्प, माझ्या ओळखीत असलेले काही उद्योजक यांच्या यशकथा सरांना बोलण्यातून सांगण्यात आल्या. सरांचा पत्रकारितेचा अन् एकूण सर्व जीवन प्रवास सरांनी माझ्याशी शेअर केला अन् भरघोस गप्पा त्या भेटीत झाल्या. यावेळी सरांनी मला हे पुस्तक भेट दिलं.

थोडक्यात पुस्तकाबद्दल:
काही दिवसांच्या व्यस्थतेच्या दिनक्रमात पुस्तक वाचायचं राहून गेलं.बजे काल सायंकाळी हातात घेतलं अन् आज दुपारपर्यंत वाचून संपवलं. पुस्तकाबद्दल थोडक्यात सांगायचं तर नव उद्यमींच्या यशोकथा सांगणारं हे पुस्तक आहे. ज्या पुस्तकात लिखाणाच्या माध्यमातून सरांनी २७ नव उद्योजकांच्या यशकथा सांगितल्या आहेत.

"गॉईंग ग्लोकल" "लोकल" उद्यमींच्या "ग्लोबल" गुणवत्तेची यशकथा सांगणारं हे पुस्तक "द कॅटलिस्ट" प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.एकूण २७० पृष्ठ संख्या असलेलं हे पुस्तक आहे.

नोकऱ्या माग्ण्यापेक्षा नोकऱ्या देण्याची जिद्द बाळगून ज्यांनी यशस्वीपणे आपले उद्योग उभारले त्यांच्या जिद्दीचा एकूण सर्व प्रवास मांडणारे हे पुस्तक आहे. दत्ता जोशी सरांनी आजवर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील लहान मोठ्या ७५० उद्योगांना भेट दिली, त्या उद्योजकांचा सर्व प्रवास ते आज देश विदेशात त्या उद्योजकांच्या उद्योगाचे सुरू असलेले युनिट्स, देश विदेशातून त्यांच्या प्रॉडक्ट्सना असलेली मागणी हा सर्व प्रवास सरांनी "पोलादी माणसे" या पुस्तक मालिकेतून मांडला आहे.
त्यातीलच २७ नव उद्योजकांच्या यशकथा सांगणारे हे पुस्तक आहे.
पुस्तकाच्या माध्यमातून उत्पादन क्षेत्र (Manafacturing Industry ) व सेवा क्षेत्र (Service Industry) अश्या दोन प्रकारात उभारलेल्या उद्योजकांच्या उद्योगाच्या यशकथा या पुस्तकातून सांगितल्या आहेत.

उत्पादन क्षेत्र (Manafacturing Industry ) या क्षेत्रात आपला उद्योग उभारणारे सुनील रायठठ्ठा (विनोदराय इंजिनीअर्स प्रा. लि ), शंतनु देशपांडे (स्पेशालिटी पोलिफिल्म्स), डॉ. प्रमोद बजाज (स्पर्म प्रोसेसर्स), सुरेश तोडकर (एस.एस कंट्रोल), रवींद वतनी टेक्नोएड असोसिएट्स प्रा. लि व इतर उद्योजकांचा सर्व प्रवास मांडला आहे.

सेवा क्षेत्र (Service Industry) या क्षेत्रात मानसिंह पवार (रत्नप्रभा मोटर्स), प्रशांत देशपांडे (एक्स्पर्ट ग्लोबल), राजेंद्र मालशेटवार (मालशेटवार ऑप्टिकल्स), अजय कुलकर्णी (इंटरफेस डिझायनर्स), राहुल खिंवसरा, विकास बापट (झीकॉन सोल्युशन्स प्रा.लि.), शिरीष खंडारे, महेश शहा (हायटेक ग्रुप/सेलवेल प्रा.लि.) व इतर उद्योजकांच्या यशकथा या पुस्तकातून मांडल्या आहेत.

सरांनी प्रयोजन माध्यमातून जे काही लिहले आहे, त्यातून  पुस्तक खूप सहज उलगडून आपल्या समोर येते. त्यामुळं त्यातील काही ओळी देतो आणि थांबतो.

हे पुस्तक कशासाठी? कुणासाठी?
खरे उत्तर आहे, हे पुस्तक 'उद्योगविश्वात प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी' आहे. उत्पादन आणि सेवा असे उद्योग जगताचे दोन प्रमुख प्रकार म्हणता येईल. या दोन्ही विभागांसाठी स्वतंत्र व्यवसाय कौशल्य लागतात. दोन्हींसाठीच्या गुणवत्ता वेगवेगळी लागते. पण सर्वात महत्त्वाची असते ती अंत: स्फूर्ती. हृदयात चेतलेला अग्नी प्रदीप्त असेल तोवर कुणीही, अगदी कुणीही उद्योजक होऊ शकतो. हे ठामपणे सांगायचे, तर काही उदाहरणे मांडावी लागतील. ही २७ उदाहरणे म्हणजे हे पुस्तक.

ही माणसे कुठे काम करताहेत यापेक्षा ती कुठे पोहचली आहेत, ते अधिक महत्त्वाचे आहे. गुणवत्तेला फक्त 'मेगासिटीज' मध्येच चालना मिळते असे नाही... ग्रामीण भागातून पुढे येत विश्वाला गवसणी घालता येऊ शकते, हे अधिक महत्त्वाचे हे सांगू बघणारे हे पुस्तक आहे.
 
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...