अलीकडे एक विचार सहज मनात येऊन जातो की,वेळेनुसार सर्व काही बदलत गेले माणसे बदलले,सोबतीने राहणीमान,आवडीनिवडी सर्वच बदलले.वेळेनुसार होणारे बदल स्वीकारणे हे खूप महत्त्वाचे असते पण काही गोष्टींच्या बाबतीत आपण वेळेनुसार बदलूनही त्या बाबतीत आपण आपल्या आवडीनिवडी जपवायला हव्या असे वेळोवेळी मला वाटते. अलीकडे शहरात कधीतरी नकळत फेरफटका मारतांना जुन्या इमारतींना न्याहाळत बघत राहणे,त्यातील झालेला बदल लक्षात घेऊन ती इमारत पूर्वी कशी होती अन् आता कशी,शहरातील जुनी कामे ज्यांच्या बाबतीत त्यावेळी माझ्या मनात एक गोष्ट पक्की झाली होती की ही कामे असेच राहतील पुढे बरीच वर्ष बिनकामाचे खंडहर बनुन.मग ते त्यांना कल्पनेत कथा रुपात सांगणे कसे असेल हे कल्पनेत उत्रवणे मला खूप आवडते... साधारण बारा-तेरा वर्षापूर्वी साऱ्या शहरात मुक्तपणे फिरत राहणारा मी गेलं दशक शहरात फक्त गरजेच्या ठिकाणी कामानिमित्त फिरलो असेल.अलीकडे जेव्हा रिकामपणात शहराकडे बारकाईने किंवा बदल होणे,झालेला बदल या नजरेतून बघितलं जातं तेव्हा आश्चर्य वाटायला लागते... कौलाची ती मोडकळीस आलेली घरे उभ्या हयातीत परिस्थितीमूळे बदलणार नाही असे वाटायचे...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!