मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Industrial Revolution..!

Industrial Revolution..! माणसं जोडायला हवी आहे, माणसांच्या सहवासात आयुष्य जगण्याची कला एकदा एकसंध आयुष्य जगणाऱ्या माणसाला लाभली की तो आयुष्यभर विचारांनी भटकत न राहता स्थिर होत असतो. मला आठवते माझं एक्कलकोंडी अवस्थेत आयुष्य जगणं जरी मनाला समाधान देणारे होते. तरीही माणसांच्या सहवासात आले की, माझी होणारी अवस्था ही त्या लहानग्या पोरांनी भर वस्तीतून एखाद्या कुत्र्याच्या पेकाटात लाथा, दगडं हाणून त्याला भर वस्तीतून हाकलून लावावं. ते कुत्रं जसं भेदरलेल्या अवस्थेत या वस्तीतून त्या वस्तीत भाकर, कुटका भेटल या कारणाने घाबरत घाबरत भटकत रहायचं तशी होऊन जायची. कामगार चौकात माझ्या सुरुवातीच्या काळातील दिवसांमध्ये मी ही असाच भटकत राहिलो. माझं गाव शिक्षण खूप झाल्यानं आता माझं पोट भरवू शकत नव्हतं, अन् मलाही इथली भिक्कार जिंदगी नको होती. आयुष्यात काही बदल हवे होते, म्हणून मी ही भाकरीच्या तुकड्याच्या शोधार्थ या वस्ती जवळ केल्या. शहरात राहणाऱ्या प्रत्येक त्या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारास त्याचा भाकरीसाठीचा संघर्ष विचारा. सुरुवातीचे काही दिवस नावाला असलेल्या कॉट बेसीस हॉस्टेल कम एक मोठ...

आयुष्य आणि गणितं..!

आयुष्य आणि गणितं..! पहाटेच्या वेळी जितकं गाव रहाटीचं जग बोलकं असतं त्याच्या कैक पट सकाळच्या प्रहरी शहरात चालू असलेल्या घडामोडी बोलक्या असतात डोळ्यांना समजून घेण्याची कुवत असली, मनात त्याबद्दल विचार करण्याची अन् दृश्य निरीक्षण करून समजून घेण्याची कुवत असली की ; मग आपण आपले रोजचे कामधंदे सोडून व्यस्थ असलेल्या या लोकांच्या लाईफ स्टाईलचा भाग न होता शहरातील ही कॉर्पोरेट विश्र्वात जगणारी माणसं आणि गाव रहाटीचं जगणं जगणारी माणसं यांच्यामधील एक दुवा बनून जातो. या मधल्या माणसांची आयुष्यभर फरफट होत असते. तो धड शहराचा नसतो की धड खेड्यातला अन् कदाचित त्यामुळेच तो दोघांपेक्षा अधिकच सहनशील झालेला असतो अश्यावेळी. असो...! असच काहीसं आयुष्य मला लाभलं असल्यानं, माझी तारेवरची होणारी कसरत अन् आयुष्यात क्षणिक सुखाचा सोहळा करणं आता मला बऱ्यापैकी जमायला लागलं आहे. यासाठी मला कुठली किंमत मोजावी लागत नाही की, कोणाशी बोलावं लागत नाही. हो इतकं मात्र करावं लागतं की, खूप भटकंती करून हे क्षण साधावे लागतात. हल्ली शहर काही दिवसांपूर्वी मागे सुटले, त्यामुळे आता शहराची तेथील माणसांचं मला असलेलं आकर्षण प्रकर्...

life lessons..!

Life Lessons..!  आयुष्याकडे फार काही अपेक्षा न ठेवताच जगण्यात स्वार्थ आहे असं अलीकडे वाटू लागलं. विचार केला तर आयुष्यात अन् मनात एकाचवेळी असंख्य वादळे उठले आहे. त्यांना सावरतांना वेळोवेळी पण हळूहळू आयुष्य देऊ करणारे तडाखे, एक दिवस आयुष्यातून उठून जायला कारणी ठरतील असे दिसू लागलं आहे. नॉर्मल माणसांच्या आयुष्यात जसं सांज सरली की काळोख दाटून येतो. तसं माझ्या बाबतीत नाही माझ्या आयुष्यात सदैव काळोख दाटून आलेला  भासतो किंवा आहे. भर दिवसा शहरात कारण नसतांना अनवाणी भटकत राहतो, तितकंच रात्रीच्या गाढ झोपेतही. शहरं ओळखीची वाटू लागतात अन् दिवसा असलेला शहरातील हा प्रकाश गाढ झोपेतही डोळे दिपवून टाकतो. अलीकडे आयुष्य का जगतो किंवा जगण्याला कारण शोधत आहे. बऱ्याच गोष्टी नॉर्मल माणसांच्या आयुष्यासारखे एका सरळ रेषेत राहून आणि आयुष्याने समोर जे वाढून ठेवलं आहे ते स्वीकारून जगलो तर सगळं नॉर्मल आहे पण अश्या गोष्टीत मला स्वारस्य नाही. मी आयुष्याला घेऊन आखून ठेवलेले काही माईलस्टोन आहे अन् ती सर करत आयुष्य जगण्याची मनाला अन् शरीराला दोघांनाही सवय झाली आहे. त्यामुळं काही माईलस्टोन सर करत असत...

इंडस्ट्रिअल विश्व..!

इंडस्ट्रिअल विश्व..! आज एका अश्याच मीटिंगला उपस्थित होतो. दिवसेंदिवस शहरं वाढत चालली आहे, जसजशी शहरं वाढीस लागली तसतशी शहरात रोजंदारी उपलब्ध होण्यासाठी विविध कंपन्या, मॉल्स, छोटे-मोठे उद्योग समूह निर्माण झाले. शहरात बऱ्यापैकी रोजगार उपलब्ध झाला. सुरुवातीला जवळच्या चार-दोन तालुक्यातील अन् आता हळूहळू जवळच्या तीन-चार जिल्ह्यातील, कामगार वर्ग औरंगाबाद शहर आणि शहराला लागून असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करायला शहरात येऊ लागला. पाच दशकं पूर्ण होऊन गेली शहरातील बऱ्याच घरातील दोन पिढ्यांची हयात या कंत्राटी पद्धतीने काम करणारा कामगार वर्ग म्हणून निघून गेली.  वेळोवेळी अनेक सोयी-सुविधा त्यांना उपलब्ध झाल्या अन् अनेकदा त्यांच्यावर अन्याय झाला. अनेकवेळा त्यांनी कामगार वर्गाची युनियन स्थापन करून प्रश्न मार्गी लावण्याचा विचार केला ; पण हे सर्व प्रश्न तितक्याच मर्यादित काळासाठी सुटले अन् पुन्हा जैसे थे अवस्था झाली. मी काही कंत्राटी पद्धतीने काम करणारा कामगार नाही ; आयुष्यात हे जगणं फक्त तीन महिने जगलो आहे. परंतु या माझ्या कामगार बांधवांचे खडतर आयुष्य मी जवळून बघितल...

द्विधा मनाचे गुलमोहर..!

द्विधा मनाचे गुलमोहर..! माणसांच्या गर्दीत जेव्हा एकटं वाटायला लागतं, तेव्हा प्रत्येक त्या माणसाच्या आत मनाचा तळ गाठून त्याला भेटणं होतं. त्याचा चेहरा न्याहाळला जातो अन् असं पारखून मग आपल्याला हवासा माणूस आपल्या जवळ केला जातो. अश्या जवळ केलेल्या माणसाने आपल्याला नाकारले की मग आयुष्याची बिनकामी फरफट होते. मग गर्दीतही आपण एकटे राहून जातो. मग मात्र माणसांच्या सहवासातसुद्धा आपल्याला एकाकी वाटायला लागतं. अशी माणसं एकटे कधीच नसतात, जेव्हा एकटे असतात तेव्हाही ते त्यांना स्वतःला घेऊन आपल्या आयुष्यात आलेल्या जवळच्या माणसांना घेऊन विचार करत असतात. त्यामुळं ती एकटी अशी कधीच नसतात, जरीही वास्तव अवस्थेने मात्र ती एकटी दिसत असल. हे सर्व अश्या काळोखाच्या राती अजूनच स्पष्ट जाणवते. काही गोष्टींची खूप सहज न यावी इतकी सहज मग आठवण येऊ लागते. स्ट्रीट लाईटच्या उजेडाखाली सायकलवरून खाली जमिनीवर पडलेले वृत्तपत्र मी अंधारातच जमा करत आहे पण ; मला कोणी बघितले नाही. ही खूप दिवसांपूर्वीची दिलासा देणारी आठवण मला अश्या काळोखात खूप सहज अन् नेहमी येऊन जाते. सध्या स्थिर असलेल्या आयुष्याला घेऊन मग मला आपलीच कि...

पोलीस भरती अन् बरच काही ..!

पोलीस भरती अन् बरच काही..! मला माहितीये हा लेख कुठलेही वृत्तपत्र प्रसिध्द करणार नाही, त्यामुळे इथे देतोय. एक आवाहन सरकारला..! काल सायंकाळची गोष्ट खूप दिवसानंतर माझ्या तालुक्याच्या गावाला गेलो असल्यानं माझ्या जून्या मित्रांची भेट झाली. हल्ली शहरात माझ्या वयाच्या मुलांमध्ये साधारण तीन-चार वर्षानंतर आलेल्या पोलीस भरती, अग्निपथ योजनेतून अग्नीवीर भरतीतून भारतीय सैन्य दलात भरती, केंद्रीय,राज्य पातळीवर निम लष्करी दलातून होणारी भरती आणि महाराष्ट्र वनविभागात वनरक्षक भरती होण्याच्या ध्येयाने शहरातील बहुतांश मुलं भरतीच्या तयारीला लागली आहे.  जसजशी भरती जवळ येत आहे, तसतसे तरुणांची ही संख्या वाढत आहे. शहरातील सर्व छोटी-मोठी मैदाने तरुणांच्या गर्दीने फुलून गेली आहे. सर्वजण जीव तोडून सराव करता आहेत. पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत १८,००० जागांसाठी जवळजवळ वीस लाख फॉर्म मुलांनी भरले आहे. त्यामुळं यावर्षी इतक्या मोठ्या पदांची भरती असूनही चांगलीच स्पर्धा असणार आहे. याऊपर खेडे गावातील मुलांची अवस्था तर खूप वाईट अशी आहे. खूप संघर्ष त्यांना भरती होण्यासाठी करावा लागत आहे. आज गावी येत असताना रस्त्य...

Reading बुक्स..!

Reading बुक्स..! माझा प्रवास वाचनाचा...! साधारण चार वर्षांपासून माझा लिखाणाचा प्रवास सुरू झाला. चार वर्षांच्या या काळात असंख्य कथा, कविता, ललित लेखन आणि इतर अश्या अनेक विषयांवर लेखन केलं. परंतु चार वर्षांच्या या प्रवासात अलीकडे कुठेतरी मला वाटायला लागलं होतं की, आपल्या लिखाणात कुठेतरी तोचतोचपणा येतोय आणि एक ठराविक मर्यादपर्यंतच आपण लेखन करतोय.  यात प्रगती होण्यासाठी आपल्या लिखाणाला आपल्याला योग्य तो आयाम देऊन. आपल्या मनाला जे लेखन हवं आहे ; जे वाचक वर्गाच्या मनावर भूरळ घालणारे ठरेल, अश्या लिखाणासाठी मला माझं एकूण जे थोडेफार वाचन आहे, ते मोठ्या प्रमाणात वाढवावं लागेल असा विचार मनात येऊन गेला.  जेणेकरून मी या माझ्या मर्यादित लिखाणाच्या पलीकडे जाऊन काहीतरी एक वेगळं साहित्य माझ्या हातून निर्माण होईल. जे मराठी वाचकांच्या मनाशी रुंजी घालू बघणारं अन् त्याना हवंहवंसं वाटू लागेल. सोबतच समाजातील अनेक प्रश्न, घडामोडी, अश्या अनेक विषयांना घेऊन केलेलं लेखन मी वाचेल आणि या वाचनाच्या माध्यामतून चिंतन करेल. ज्यामुळे माझे विचार अजून प्रगल्भ होतील‌‌. अश्या या आणि अनेक विचारांना घेऊन...