Life Lessons..!
आयुष्याकडे फार काही अपेक्षा न ठेवताच जगण्यात स्वार्थ आहे असं अलीकडे वाटू लागलं. विचार केला तर आयुष्यात अन् मनात एकाचवेळी असंख्य वादळे उठले आहे. त्यांना सावरतांना वेळोवेळी पण हळूहळू आयुष्य देऊ करणारे तडाखे, एक दिवस आयुष्यातून उठून जायला कारणी ठरतील असे दिसू लागलं आहे.
नॉर्मल माणसांच्या आयुष्यात जसं सांज सरली की काळोख दाटून येतो. तसं माझ्या बाबतीत नाही माझ्या आयुष्यात सदैव काळोख दाटून आलेला भासतो किंवा आहे. भर दिवसा शहरात कारण नसतांना अनवाणी भटकत राहतो, तितकंच रात्रीच्या गाढ झोपेतही.
शहरं ओळखीची वाटू लागतात अन् दिवसा असलेला शहरातील हा प्रकाश गाढ झोपेतही डोळे दिपवून टाकतो.
अलीकडे आयुष्य का जगतो किंवा जगण्याला कारण शोधत आहे. बऱ्याच गोष्टी नॉर्मल माणसांच्या आयुष्यासारखे एका सरळ रेषेत राहून आणि आयुष्याने समोर जे वाढून ठेवलं आहे ते स्वीकारून जगलो तर सगळं नॉर्मल आहे पण अश्या गोष्टीत मला स्वारस्य नाही.
मी आयुष्याला घेऊन आखून ठेवलेले काही माईलस्टोन आहे अन् ती सर करत आयुष्य जगण्याची मनाला अन् शरीराला दोघांनाही सवय झाली आहे. त्यामुळं काही माईलस्टोन सर करत असतांना आयुष्याची अन् माझी होणारी फरफट दिसून येत आहे.
अलीकडे जे माझ्यासाठी सर्वच खूप सहज होतं ते खूप अवघड होऊन बसलं आहे ; अन् खूप प्रयत्न करूनही आता वाटतं की थांबायला हवं एकतर आपल्या आपण निवडलेल्या आयुष्य जगण्याच्या वाटेवरून.
एका सरळ रेषेत आयुष्य जगायला शिकून घ्यावं ; पण तिथे मला जे हवं किंवा मला आयुष्यात जे काही साद्य करायचं आहे, ते साद्य होणार नाही. त्यामुळे ही फरफट अजून पुढे जितकी वर्ष चालेल तितकी वर्ष स्वीकारून चालत रहायचं आहे.
जगण्याला जर कारणच नाही भेटलं अन् आयुष्याच्या या मार्गावर येणारे अनेक माईलस्टोन सर नाहीच करता आली तर मग तिथच थांबून ही फरफट अनुभवत रहायची आहे,जोवर शक्य होईल तोवर.
जितकं सहज आयुष्य थांबलं आहे, तितकंच सहज आता व्यक्त होणं थांबेल.
Bharat Sonwane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा