द्विधा मनाचे गुलमोहर..!
माणसांच्या गर्दीत जेव्हा एकटं वाटायला लागतं, तेव्हा प्रत्येक त्या माणसाच्या आत मनाचा तळ गाठून त्याला भेटणं होतं. त्याचा चेहरा न्याहाळला जातो अन् असं पारखून मग आपल्याला हवासा माणूस आपल्या जवळ केला जातो.
अश्या जवळ केलेल्या माणसाने आपल्याला नाकारले की मग आयुष्याची बिनकामी फरफट होते. मग गर्दीतही आपण एकटे राहून जातो. मग मात्र माणसांच्या सहवासातसुद्धा आपल्याला एकाकी वाटायला लागतं.
अशी माणसं एकटे कधीच नसतात, जेव्हा एकटे असतात तेव्हाही ते त्यांना स्वतःला घेऊन आपल्या आयुष्यात आलेल्या जवळच्या माणसांना घेऊन विचार करत असतात. त्यामुळं ती एकटी अशी कधीच नसतात, जरीही वास्तव अवस्थेने मात्र ती एकटी दिसत असल.
हे सर्व अश्या काळोखाच्या राती अजूनच स्पष्ट जाणवते. काही गोष्टींची खूप सहज न यावी इतकी सहज मग आठवण येऊ लागते. स्ट्रीट लाईटच्या उजेडाखाली सायकलवरून खाली जमिनीवर पडलेले वृत्तपत्र मी अंधारातच जमा करत आहे पण ; मला कोणी बघितले नाही. ही खूप दिवसांपूर्वीची दिलासा देणारी आठवण मला अश्या काळोखात खूप सहज अन् नेहमी येऊन जाते.
सध्या स्थिर असलेल्या आयुष्याला घेऊन मग मला आपलीच कित्येक प्रश्न करून होतात. काय हवं, कश्याशाठी, महत्त्वाचं म्हणजे मी का इतका वेळ घेतो आहे आयुष्यात स्थिर व्हायला..? किंवा कुठला तो एक निर्णय घ्यायला..? जिथं सध्या आयुष्याची दोन टोकांवर आयुष्य जगण्याची माझी इतकी फरफट होत आहे तरीही.
कधीतरी मला माझं सुखद भविष्य खुणावते. कधीतर वेळी-अवेळी भविष्यासाठी घेतलेले जे निर्णय आहे ते चुकले आहे.
अश्यावेळी जेव्हा स्पष्टच याची जाणीव होते, तेव्हा मात्र आजच मला माझ्या आयुष्यातील, भविष्यातील माझी होणारी फरफट दिसून येते अन् मी आधिकचाच बेचैन होतो. तितकाच जितका पहाटे उजेडल्यावर माझे सायकलवरचे पेपर काही दहा वर्षांपूर्वी भर वस्तीत रस्त्यावर अस्थ-व्यस्थ पडले होते अन् मी ते भांबावल्यासारखे जमा करत होतो.
अश्यावेळी बऱ्याच जुन्या गोष्टी आठवतात अन् काही काळ का होईना मला माझ्या भविष्याची चिंता सतावत नाही. त्यामुळं अलीकडे नेहमीच वाटतं की गर्दीतला तो प्रत्येक माणूस ओळखीचा असावा, ओळखीचा वाटावा.
पहाटेच साडेपाचला शिकवणीसाठी गेलं की गुलमोहराच्या झाडाखाली मॅडमनी माझी घेतलेली सहाची शिकवणी. मॅडमची त्यांच्या नवऱ्याला नवीन ड्युटीवर लागल्याने त्यांना सकाळीच ड्युटीसाठी डब्बा करून देणे,त्यांचे आवरून देणे, माझ्याकडे बघणे यात त्यांची होणारी फरफट आठवते.
अन् मी तेव्हाही माझ्या भविष्याची काळजी म्हणून त्यांच्याकडे लावलेली शिकवणी.
माझ्या आयुष्यात अजूनही काही गणितं सुटले नाही. माझी काही प्रश्नांना घेऊन अजूनही फरफट चालू आहे,असं एकाकीच स्ट्रीट लाईटच्या उजेडाखली बसलं की आधिकच जाणवते.
मी असो किंवा मॅडम असो किंवा माणसांच्या गर्दीत ओळखीचे वाटणारे चेहरे असो या सगळ्यांच्या आयुष्याची गणितं, प्रश्न सुटायला हवी.
नाहीतर जगण्याची अन् सोबत आपली होणारी फरफट खूप वाईट आहे.
मग अश्यावेळी काळोखात असलेला रस्ता, स्ट्रीट लाईटचा उजेड, रस्त्यावर एकांगाला एकाकी टाकलेले एकाकी बाकडे यांचं आयुष्यात असणं जवळचं वाटायला लागतं. माणसांच्या सहवासापेक्षा एकांत जवळचा वाटायला लागतो,माणसांची भिती वाटायला लागते.
निर्जीव वस्तूंवर प्रेम व्हायला लागते, त्यांच्याशी जवळीक करायला अन् तासंतास त्यांच्याशी बोलत रहायला त्यांच्या सानिध्यात विचार करायला आवडतं. असो, जगण्याची गणितं सुटले की, हे असं आयुष्य जगणं थांबेल, तोवर आयुष्याची फरफट अन् निर्जीव वस्तू जवळ करायच्या.
Written by,
Bharat Sonwane
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा