मुख्य सामग्रीवर वगळा

आयुष्य आणि गणितं..!

आयुष्य आणि गणितं..!

पहाटेच्या वेळी जितकं गाव रहाटीचं जग बोलकं असतं त्याच्या कैक पट सकाळच्या प्रहरी शहरात चालू असलेल्या घडामोडी बोलक्या असतात डोळ्यांना समजून घेण्याची कुवत असली, मनात त्याबद्दल विचार करण्याची अन् दृश्य निरीक्षण करून समजून घेण्याची कुवत असली की ; मग आपण आपले रोजचे कामधंदे सोडून व्यस्थ असलेल्या या लोकांच्या लाईफ स्टाईलचा भाग न होता शहरातील ही कॉर्पोरेट विश्र्वात जगणारी माणसं आणि गाव रहाटीचं जगणं जगणारी माणसं यांच्यामधील एक दुवा बनून जातो.

या मधल्या माणसांची आयुष्यभर फरफट होत असते. तो धड शहराचा नसतो की धड खेड्यातला अन् कदाचित त्यामुळेच तो दोघांपेक्षा अधिकच सहनशील झालेला असतो अश्यावेळी.

असो...!

असच काहीसं आयुष्य मला लाभलं असल्यानं, माझी तारेवरची होणारी कसरत अन् आयुष्यात क्षणिक सुखाचा सोहळा करणं आता मला बऱ्यापैकी जमायला लागलं आहे. यासाठी मला कुठली किंमत मोजावी लागत नाही की, कोणाशी बोलावं लागत नाही. हो इतकं मात्र करावं लागतं की, खूप भटकंती करून हे क्षण साधावे लागतात. हल्ली शहर काही दिवसांपूर्वी मागे सुटले, त्यामुळे आता शहराची तेथील माणसांचं मला असलेलं आकर्षण प्रकर्षानं जाणवू लागलं आहे.

कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणं, कॉर्पोरेट क्षेत्रातील नियमांच्या आधीन राहून काम करणं असं एक छोटं स्वप्न आहे माझं. अनेकदा हे सर्व अनुभवलं अन् अनेकदा हे सर्व हुलकावणी देऊन आयुष्यात फरफट होणे काय असतं याचासुद्धा अनुभव देऊन गेलं. तर या मधल्या माणसांची आयुष्यभर असलेली फरफट त्याला प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने निरीक्षण करायला शिकवते.

पहाट झाली की शहरं आपल्याशी बोलू लागतात. शहराच्या लोकांना मात्र वेळ नसतो कुणाशी बोलायला. पहाटेच फ्रेश मूडमध्ये लोकांची आपलं ऑफीस जवळ करण्याची धावपळ चालू असते. अन् मला रिकामटेकड्यासारखं फिरत या लोकांना न्याहाळत रहायला आवडतं.

मी माझ्या गाडीचं पेट्रोल खर्च करून,नाहीतर कधीतरी ती ही सोबत नसेल तर दोन-चार सिग्नल पाईच फिरून या लोकांची हे रोजची पहाट मनात भरून घेतो. मला असं जग न्याहाळत रहायला खूप आवडतं.
कामे सगळ्यांना आहे पण आपलं रिकामपण सेलिब्रेट करता यायला हवं ; अन् ते मी असं रोज पहाटे सिग्नलवर भटकत कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांचं वेलसेटल्ड आयुष्य न्याहाळत साजरं करत असतो. 

अनेकांना हे विचित्र वगैरे वाटेल, कारण असं आयुष्य जगणारी लोकं शहरात एका हातावर मोजता येईल इतकीच असावी कदाचित, ती ही नसावी अशी शंका आहे. माझ्यासारखी देशभरात, जगभरात ही अवस्था लिहणारीसुद्धा काही दहा-वीस माणसच असावी. 

कारण रिकामपण कोणाला आहे अन् ज्यांना आहे त्यांना असं शहर न्याहाळणे किंवा इतकं संवेदनशील मनाचं होवून जगणं शक्य नाही. हे मी आजवर पारखलेला माणसांचा स्वभाव यावरून लक्षात येतय. ज्याप्रमाणे माणूस माणूसकी हरवून बसला आहे,त्याच्या कैक पटीने माणसांचं संवेदनशील असणं आता हरवलं आहे. नाहीतर पूर्वी चौका-चौकात अन् सिग्नल-सिग्नलवर अशी माणसं भेटायची.

काही वर्षांपूर्वी म्हणजे चार-पाच झाली असेल तेव्हा मी शहरात नवखाच होतो. असाच शहर न्याहळणारा पण आपल्या आयुष्यात यशाचं शिखर गाठलेला एक पस्तिशितील तरुण मला भेटला होता. मी विशीत होतो असंच एक दिवस सिग्नलवर छानपैकी तयार होवून बाईकवर शहर न्याहाळत पुढे-पुढे चालत होतो.

लोकं काय करता, लोकांच्या हालचाली अन् मनात काय चालू असेल, सभोवतालचा परिसर असं सगळं न्याहाळत होतो अन् ते मनात ठेवून माझं निरीक्षण करत होतो. अशी माणसं खूप कमी पण आपल्या पठडीतला माणूस त्यांना भेटला की ती आपसूकच सहज ओळखता एकमेकांना.

तर हा पस्तिशितील तरुण असंच त्याच्या होंडा सिटीमधून हे जगणं अनुभवत असताना त्याला मी दिसलो. त्याने साधारण पाच-दहा मिनिट माझा पाटलाग करून मला थांबवलं, या अनोळखी शहरात तेव्हा इतक्या मोठ्या गाडीमधून मला आवाज देवून थांबवणारा तोच पहिला.
ब्लेझर, टाय, ब्लॅक शूज घातलेला, उंचपुरा, गोरा सडसडीत बांधा असलेला हा तरुण बघितला तर पंचविशीचा वाटेल इतका छान दिसायचा.
मी थांबलो, जुजबी बोलणं झालं सामान्य माणसं जो प्रश्न करता तो प्रश्न आम्ही एकमेकांना केला अन् आमची तार जुळली.

मग माझी बाईक एक ठिकाणी पार्क करून आम्ही एका कॉफी कॅफेवर गेलो. पंधरा-वीस मिनिटांच्या गप्पा झाल्या अन् त्यात बोलण्यातून कळून चुकलं की, त्याचा जॉब गेला आहे.

यामुळे तो गेले काही दिवस डिप्रेशनमध्ये आहे अन् हा डोक्यातील त्रास, येणारे असंख्य निगेटिव्ह विचार कमी करण्यासाठी तो पहाटे असं त्याच्या होंडा सिटीमधून फिरत असतो.
कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारा तरुण भासावा असं जगत लोकांना न्याहाळत, विचार करत, शहराचे त्याला असलेले प्रचंड आकर्षण अन् सर्वात महत्त्वाचं ब्लेझर, सूट, टाय, ब्लॅक शूज घालून त्याचं या आलिशान गाडीमधून फिरणं इतक्यासाठीच होतं की या लोकांना तो बेरोजगार युवक आहे अन् असं वेडखुळ डोक्यात घेऊन भटकत असतो हे कळू नये इतकंच.

पुढे वीस-पंचवीस दिवस पहाटे एक दीड-तास आम्ही असच भटकत राहायचो, पहाटे ठरल्या जागी तो मला घ्यायला यायचा. अन् आम्ही बसथांबे,सिग्नल,उड्डाण पुलावरून खाली दिसणारी ट्रॅफीक, त्यांच्या आयुष्यात व्यस्थ असलेली माणसे न्याहाळत हे सगळं आमच्या नजरेत कैद करून घ्यायचो. पुढे दिवसभर तो त्याच्या बंद खोलीत या विषयावर लॅपटॉपमध्ये काहीतरी टायपत बसायचा हे त्यानं मला सांगितलं होतं.

असच एक दिवस तो पहाटे भेटला अन् सांगून गेला उद्यापासून आपलं असं भेटणं होणार नाही. कारण पुण्यासारख्या शहरात त्याला कॉर्पोरेट क्षेत्राचं असलेलं त्याला आकर्षण अन् त्याच क्षेत्रात त्याला एका कंपनीत एका खूप मोठ्या पदावर भेटलेली नोकरी.
आम्ही त्याचं यश सेलिब्रेट केलं अन् त्यानंतर कधी भेटलो नाही, मी आजही चार वर्षानंतर हे सगळं जगणं सातत्याने अनुभवत आहे. पुढे मला त्याची कधी आठवण आली नाही, कारण त्याच्या माझ्यासारखी ही माणसं अशीच असतात त्यांना एकतर माणसांचा सहवास नकोसा वाटतो.

अन् आपल्या आयुष्यात कुणी आलं की कधी एकदा ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते असं या माणसांना होतं. त्यामुळं मला त्याचं जाणं त्याला माझं जाणं याबद्दल आम्हाला एकमेकांना काही सोयरसुतक नव्हतंच हे माझ्यासाठी सांगतो अन् कदाचित त्यालाही नसेल.

कधीतरी लिहल आम्ही शहरात भटकंती करून नेमकं काय करायचो ते सविस्तर..!

Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...