मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

कथा - झांबेरी..!

कथा - झांबेरी..! सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या एका झांबेरी नावाच्या गावात भटकंती करत भटकतो आहे. तो कुठला तांडा, वस्ती, पाडा आहे हे कळायला मार्ग नाहीये. ठरवून असं सह्याद्रीच्या कुशीत आठ दहा कि.मी पायी भटकंती केली की मग मला अशी माझ्या ओळखीची माणसं भेटायला लागतात. पहाटे आठ पासून या डोंगरदर्यात भटकतो आहे. का भटकतो याला कारण नाहीये. पण; मनाला क्षणिक सुखाचा आनंद या अश्या भटकण्यातून भेटत असतो. म्हणून; हे असं भटकणं होत असतं अधूनमधून. झांबेरी तांडा, वस्ती, पाडा बघून आता या भर उन्हात माळावर येऊन बसलोय. इथे आलं की माझ्या डोळ्यांना गावच्या,गावातल्या कथा दिसू लागतात अन् मी त्यांना वाचू लागतो. दूरवर वाऱ्याची झुळूक तुटत असताना दिसत आहे, दूरवर जिथवर नजर जाईल तिथवर लाल माती, मुरूम, दगडामातीचं हे रान डोळ्यांना नजरी पडत आहे.  डोंगरात हिरवं गवत म्हणून जनावरांना चारायला काहीही नसल्यानं माळावर माझ्याखेरीच दुसरं कुणी नाहीये. दूरवर डोळ्यांना ओसाड दिसणारं माळरान, अंगाची लाहीलाही होऊन निघावी असा गरम शुष्क वारा अंगाला झोंबत आहे. वाळलेलं गवत, मोहरच्या तोंडाला काटा असलेला भासावा असं कुसळ या रानात आहे. ते अगदी स...

वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग - ६ ते १०

वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग - ६ ते १० इकडे रामा कुंडुर सावत्या माळ्याच्या देवळा मोहरे असलेल्या त्याच्या झोपडीवजा घरी आला. त्याची मायसुद्धा पहाटेची न्याहारी करून हिवताप आल्यानं काही बरं लागत नसल्यानं झोपून होती.  तो तिला दोन चार शबुद बोलला,अंग चापललं अन् झोपडीच्या एकांगाला त्यानं केलेल्या बागेत तो विरंगुळा म्हणून तिची मशागत करू लागला, तिला बघू लागला. जवळपासच्या दोन-चार घरांना रामा कुंडुरची ही बाग खूप खूप प्रिय होती. कारण ती सगळ्यांना भाजीपाला द्यायची तिच्यामध्ये कारले, गीलके, दोडके, चक्की, डांगर अश्या अनेक वेली रामा कुंडुरने मांडव करून लावली होती. त्या मांडवात दुपारच्या भर उन्हात गारवा मिळायचा म्हणून शेजारची रामा कुंडुरच्या आईच्या वयाची लोकं तिथं येऊन बसायची. वेलींना पाणी घालायची, तिथली साफसफाई करायची. पडत्या पावसाळ्यात बियाणे धरायला हवं म्हणून रामा कुंडुर वेलींच्या मांडवात फिरून मोठे झालेले गीलके, कारले, दोडके यांचे बियाणे काढून वाळवायला ठेऊन, बागेची मशागत करू लागला. तितक्यात त्याचा जोडीदार त्याला दुरूनच हाक देऊ लागला ओ सरकार याकी इकडे उन्हातान्हात काय आंबदायला..! रामा कुंडुर डो...

रेल लाईन अन् प्रवास..!

रेल लाईन अन् प्रवास..! पुणे मागं पडलं अन् झेलम एक्सप्रेस तिच्या मर्यादित वेगानं चालू लागली, आता आठ तास मी निवांत होतो. रात्रीचे दहा वाजले होते, दौंडच्या जवळपास रेल्वे रुळावर चालत होती. वेळीच तिकीट काढलं असल्याने, जनरलचं तिकीट खिश्यात घेऊन मी स्लीपर कोचमध्ये मला जागा शोधत होतो. म्हटलं नशीब आजमावून बघूया भेटली जागा तर प्रवास सुखाचा होईल पण; तसले काही चिन्हं दिसत नव्हते. अन् मी काही तोंडानं जागा द्या..! असं प्रवाश्यांना म्हणणार नव्हतो, जरी रेल्वे संपूर्ण मोकळी होती. मलाही कारण हवं होतं. शेवटी दोन डब्ब्यांना जोडणाऱ्या जागेमध्ये मी डब्याच्या दरवाच्याजवळ बसून प्रवास सुरू केला. छान वातावरण होतं, झेलम एक्सप्रेस मला आवडण्याचं कारण होतं की ती माणसाला तिच्या धावण्याचं जीवावर येईल इतकीही जोरात धावत नाही. की, इतकंही हळुवार चालत नाही की आपण झोप येऊन तिथेच पेंगुळलेल्या अवस्थेत झोपून राहू. ती तिचं चालत होती ठरलेल्या स्टेशनवर प्रवाश्यांना तिच्या आत भरून घेत होती. अधून मधून चहा, जेवणाचे कंटेनर, इतर तत्सम पदार्थ, वॉटर बॉटल विकणारे विक्रेते येत होते. रेल्वेचा प्रवास नवा असला तरी आता बरीच ओळख य...

अस्वस्थ मनाची न सुटलेली गणितं अन् भटकंती..!

अस्वस्थ मनाची न सुटलेली गणितं अन् भटकंती..! दौंड कोर्ड लाईन स्टेशन मला नेहमीच गूढ वाटत आलं आहे. काही वेळापूर्वी तिथून महाराष्ट्र एक्सप्रेसने घराच्या दिशेनं निघालो आहे. ही वेळ मोजली तर या स्टेशनवरून तिसऱ्यांदा घरी निघालो आहे. आज जरा फावला वेळ जास्त असल्यामुळे सायंकाळी सहा वाजताच स्टेशनला आलेलो होतो. आलेलो म्हणजे, खूप भटकंती करत आलेलो होतो. मला वाटलेले चाळीसगांव ट्रेन दौंडचं शहरातील स्टेशन आहे तिथून असावी म्हणून पायी तिथपर्यंत गेलो. तिथं कळलं की, इथे ट्रेन लागत नाही. मग मोबाईलवर गुगल मॅप चालू केलं चार साडेचार की.मी अंतर गुगल मॅप दाखवत होतं. मग काय पायीच जायचं ठरवलं. दिवसभर भटकलो ते एकूण अंतर १३ की.मी झालं होतं. नवीन शहर म्हंटले की मला फारसे अर्जंट असेल तरच मी तेथील स्थानिक साधनांनी प्रवास करतो. नाहीतर माझा कल असतो की पायीच फिरून इथली लोकं, हा परिसर ओळखीचा करून घ्यावा, नजरेखाली घालून घ्यावा. म्हणजे पुढे कधी आलं तर कुठलेही प्रॉब्लेम्स येत नाही. असंच साधारण महिन्याभरापूर्वी पुणे स्टेशनवर जाताना केलेलं अन् दिवसभर जेव्हा मोबाईलवर किती फिरलो हे चेक केलं तर १९ की.मी मी या अनोळखी शहर...

"परका" - "अवधूत डोंगरे"

"परका" - "अवधूत डोंगरे" गेले चार पाच दिवस वेळ भेटेल तसं "आल्बेर काम्यू" यांच्या "द आऊटसायडर" या कादंबरीचा "अवधूत डोंगरे" यांनी केलेला मराठी अनुवाद "परका" वाचत होतो.  खूप सुंदर अन् लेखकाचं आयुष्याला गूढ वलय प्राप्त असल्यासारखं आयुष्य, त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना सामान्य लोकांना रोजच्या व्यवहारात जन्म, मृत्यू या गोष्टींचं असलेलं सोयरसूतुक अन् लेखकाला या गोष्टींचं कुठलंही नसलेलं आकर्षण यामुळं आल्बेर काम्यू पहिल्या काही समासातच जवळचा वाटला अन् हे पुस्तकही जवळचं वाटलं.  आल्बेर काम्यूसारखं एक वेगळं आयुष्य जगणारे माणसं पृथ्वीतलावर विरळच असतील. त्यांनी आयुष्यात काय केलं, किंवा लोकं काय म्हणतील हा प्रश्न त्यांना कधी पडत नाही. एकाकी राहून आयुष्य जगणं, एक आगळेवेगळे नकळत आयुष्याला वळण देऊन आयुष्य जगणं यात सुखून आहे. अन् हे गेली काही वर्ष मी अनुभवतो आहे, त्यामुळं आल्बेर काम्यूचं हे जगणं अन् त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मला खूप पसंतीस पडला. आपल्या कमाईमधून आपण आईला खुश नाही ठेऊ शकत म्हणून तिला वृद्ध आश्रमात ठेवणारा, ...

औद्योगिक वसाहत आणि भविष्यकाळासाठीची तडजोड..!

औद्योगिक वसाहत आणि भविष्यकाळासाठीची तडजोड..! साडे अकरा झाले तसं, औद्योगिक वसाहतीमध्ये असलेले भोंगे दुसरी शिफ्ट संपल्याच सुचवीत होती. अन् ; मी या भोंग्याच्या आवाजासरशी कंपनीच्या आतील गेटवर येऊन उभा राहिलो. भर काळोखात ढग दाटून आल्याचं दिसून येत होतं. आता लवकरात लवकर रूम जवळ करावी असं वाटून गेलं, कारण चमकत्या ताऱ्यासरशी कधी एकदाचा पाऊस पडायला सुरुवात होईल याची गॅरंटी नाहीये. आज कंपनीत ए टाईप केल्यानं अंडरवेअरपासून सगळे कपडे ओले झाले होते. तरी जेवणाच्या वेळी एकदा अन् नंतर एकदा असा कंपनीचा ड्रेस बदलून झाला होता. पण; ओलं होणं चुकणारं नव्हतं हे ही माहित होतं अन् अखेर झालोच. ए टाईप म्हंटल की दिवसभर घरातली दिवाळीची भांडे घासायला काढावी तशी, आम्ही काम करत असलेल्या मशीनची एक एक पार्ट धुवायला काढायची. धुवून, पुसून, स्वच्छ करून ती पुन्हा फिटिंग करायची. एकूण औद्योगिक वसाहतीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करायचं म्हटलं की या कामात हौस होते अन् कधी एकदा रूमवर जाऊन पडेल अन् झोपल असे होते. एकदाचे साडे अकरा झाले सुपरवायझरने काही इंस्ट्रक्शन दिल्या कितपत कळल्या अन् कितपत नाही, खरंतर कळलं नाही. अन्...

जगण्याची गणितं सुटलेला अवलिया..!

जगण्याची गणितं सुटलेला अवलिया..! भर दुपारच्या या रणरणत्या उन्हात अस्वस्थतेच्या नोंदी मनाशी आधिकच वाढत जाता. आजचा दिवस मनाच्या या अवस्थांचा विचार केला की रोजच्या दिवसांसारखा नॉर्मल नाही याची प्रचिती येते. अश्या दिवसाची सुरुवातच काही करावसं वाटत नाही या कारणाने होते अन् मी निरुद्देश फक्त भटकंती करत राहतो. अश्या वाटांवरून जिथून क्वचितच माणसे जात असतील. भटकत असतो दिवसभर या चौकातून त्या चौकात, मनाशी काही मनाचे थांबे ठरवून. अश्यावेळी इतकं भटकूनही भूक लागत नाही. फक्त हे भटकणं चालू राहतं. भर उन्हाच्या झळांना सोसत मी चालत राहतो. अवाढव्य वाढलेल्या चकमकीत वाढलेल्या शहराच्या एकांगाला असलेल्या बाभळीच्या रानांनी.  काय हवं आहे..? का भटकत आहे..? याला उत्तरही नसतं ; पण मी भटकत राहतो जोवर थकत नाही तोवर. या भटकंतीत एखाद्या पॉश वस्तीला लागून गेलो की मला तेथील पॉश आयुष्य जगणारी माणसं भंगार गोळा करणारा मुलगाही समजत असतील, नव्हे तर समजतातच. कारण एक दोन वेळा त्यांचे बोल खाल्यावर हे कळूनही आलं होतं. पण मला याचं अखेर सायंकाळी फ्लॅटवर पोहचल्यावर विचार केला तर काहीसं वाईटही वाटलं नाही. भर दुपारच्य...