मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मृगजळ कवितांचं...

#मृगजळ_कवितांचं... अवांतर न बोलायचे हल्ली पाळतो मी, सल्लेच एरवी इतरांचे घेणं टाळतो मी..! माझाच भ्रमनिरास होतो वर्तमानात माझ्या, तुर्ताच तरी भविष्यावर बोलायचे टाळतो मी..! हल्ली स्वप्नांचे ओझे मानगुटीवर घेऊन वाहत नाही मी, कल्पनेत रमणाऱ्या स्वप्नांकडे हिशोब उद्याचा मागत नाही मी..! रास्त आहे हिशोब बळजबरीच जिंदगीचा सुखाशी लावणे आता, दुःखात सुख शोधायचे जिंदगीशी केलेला करार हा खोटा टाळतो मी..! हरवली आहे जगण्यात असलेली इतरांकडून अपेक्षा, त्यांनाच शोधण्या अलीकडे भूतकाळात रमतो मी..! नित्याचीच कविता माझी बहरत जावी, म्हणूनच हल्ली खोट्या जीवन प्रवासात कवितेलाच टाळतो मी..! Written by, Bharat Sonwane...

तिचा फुलनारा संसार...

#परसदारच्या_अंगणातला_फुलणारा_तिचा_संसार.... नेहमीप्रमाणेच सांजवेळ झालेली आकाशात ढगांची गर्दी होऊ बघत आहे... काही वेळातच पाऊस येणार याची चिन्हे दिसू लागतात,पाऊस येऊ लागतो. परसदारच्या अंगणात असलेल्या जाईच्या वेलाची फुले सोसाट्याचं सुटलेलं वावधन,पावसामुळे जमिनीवर बरसु लागतात व आपलं फुलणारं बाळसं तिथेच सोडवून देतात... पावसाचा अंदाज घेऊन तो ही वेताची केलेली छोटीशी कुरकुली घेऊन,परसदारी असलेल्या जाईच्या वेलावरील फुलणाऱ्या फुलांना सकाळी पुजेत देवाला वाहण्यासाठी तोडून आणायला गेला... हल्ली तीच फुले पावसात पडून मातीत खराब होऊन जातात,त्यामुळे हे सर्व ही एकच भावना त्या फुलांना तोडण्यामागची त्याची असते... ऐरवी सांज ढळुन काळोख पसरलेला,पाऊसही आता बऱ्यापैकी बरसू लागलेला असतो. सांजवेळी आईने हातपाय धुवून,डोक्यातील केसांचा अंबाडा घालुन देव्हाऱ्यात दिवा लावावा. तसे घरात प्रसन्नमय वातावरण निर्माण होते अन् अलिकडे आजारी असलेली आई यावेळी चेहर्यावर तेजस्विता असलेली,प्रसन्नमय दिसु लागते... जसजसा ढगांचा काळोख,प्रसन्न दिव्यांचा उजेड घरात पसरु लागतो आणि घरातली सायंकाळची कामं सुरू होतात... सर्व स्वयं...

लेखक आणि मित्र

#प्रत्येकाच्या_आयुष्यात_असावा_असाही_एक_मित्र..! रात्रीचे जेवण झाले की नेहमीप्रमाणे शतपावली करण्यासाठी मी बाहेर फिरायला म्हणजे घराच्या आसपास असलेल्या परिसरात फिरायला जात असायचो. काही दिवसांपासून कोरोना आला आणि माझे सांजवेळी फिरायला जाणेही मी बंद केले... सांजवेळी फिरायला जाणे कसले ते एक निमित्तमात्र असायचे त्या एका मित्राला भेटायला जाण्यासाठीचे... एक वेळ होती जेव्हा आयुष्य म्हणजे मित्र आणि मित्र म्हणजे आयुष्य इतकीच काय ती जीवनाची व्याख्या केलेली,त्यामुळे असंख्य मित्र केलेली होती. सर्वांना वेळ देणे,त्यांच्या सानिध्यात राहणे यातच दिवस कसे निघून जायचे समजायचे नाही. आपण जसे म्हणतो की,आयुष्यात काही चढउतार येतात आणि आपण आयुष्याकडे एका वेगळ्या नजरेने बघू लागतो तसेच काही दिवस माझ्याही आयुष्यात आले. हे दिवस विचार केला तर फार लवकर माझ्या आयुष्यात आले,ते स्वीकारून आयुष्यात येणाऱ्या अडचणींना तोंड देत आयुष्य जगायचे होते. यात झाले काय की नकळत का होईना किंवा कामाच्या व्यापात हे सर्व मित्र मी सोडून दिले किंवा बळजबरी सोडावे लागले,पण आज जेव्हा आयुष्याच्या या टप्प्यावर येऊन मागे बघतोना तेव्हा वाट...

आठवणीतली पाऊलवाट...

#आठवणीतल्या_पाऊलवाटा...! आज दिवसभर अंगावर ब्लँकेट घेऊन खिडकीतून संथपणे पडणारा पाऊस बघत बसलो होतो. पावसात कुठलाही जोर नव्हताच आता श्रावण महिन्यातील पावसाचे वेध लागले आहे. निसर्ग पूर्णपणे त्याच्या सौंदर्याची मुक्तपणे उधळण करतोय नदी,नाले,बऱ्यापैकी भरल्यामुळे पाणी वाहते झाले आहे. अभयारण्यातील झरेही कुठेकुठे वाहू लागले आहे,श्रावणात ते पूर्णपणे रौद्ररूप धारण करणार याची जाणीव अलिकडे काही दिवस होतेय... श्रावणाची चाहूल लागली म्हणजे मग आठवण येते भद्रा मारुती पायी दर्शन दिंडी सोहळ्याची,दर शुक्रवारप्रमाणे चारही शुक्रवार कन्नड ते भद्रा मारुती पायी दर्शन मी अनुभवत असतो...यावर्षी कोरोना असल्यामुळे हे दर्शन अनुभवता येणार नाहीये आणि सोबत वेरूळ लेणी डोंगर ते शासकीय विश्रामगृह परिसरात रात्रीच्या दीड ते अडीच यावेळेत केलेला ट्रॅक,सोबतीला निसर्गाचे स्वर्गरूपही यावेळी अनुभवायला मिळणार नाही याचेही दुःख आहे... तर चला आज या स्वर्गरूप अनुभवायला देणाऱ्या प्रवासाबद्दल थोडक्यात लिहण्याचा प्रयत्न करतो... दर सालाबादाप्रमाणे पायी चालत रात्रीच्या एक-सव्वा दरम्यान मी वेरूळ लेणीच्या पायथ्याशी असलेल्या गेटव...

माझा साहित्य प्रवास....

आषाढी एकादशीची वारी पूर्णत्वास आली की,वारकरी मायबाप विठ्ठल रखुमाईचे आशीर्वाद घेऊन घराच्या ओढीने पुन्हा एकदा परतीच्या मार्गाला लागतात... वारकरी मायमाऊली घरी येते व तिच्या नित्याच्या कामात व्यस्त होऊन जाते. दिवसभर काबाडकष्ट आणि सांजेच्या प्रहरी शिवना काठावर असलेल्या सावता माळ्याच्या देऊळात माऊलीच्या भक्तीरसात गुंग होऊन सर्व माऊली भक्तांनी केलेला हरिपाठ,भजन दिवसभराचा थकवा आणि संसारातील तडजोडी यांना विसरायला लावणारा असतो... इतके सर्व करूनही माझा वारकरी या दिवसात काहीतरी चिंतेत असलेला मला भासतो... कारण त्याला वारीतील एक-एक क्षण आठवत असतो अन् या निमित्ताने त्याला मायबाप विठ्ठल रखुमाईची आठवण येत असते... एरवी निसर्ग हिरवीशाल अंगावर घेऊन त्याच्या सौंदर्याची मुक्तपणे उधळण करत असतो. पावसाने नदी,नाले पूर्णपणे भरलेली असतात,श्रावणाची जसजशी चाहुल लागते तसतशी झाडांना नव्याने पालवी फुटू लागते, सुगंधित फुलांची आरास निसर्गात सर्वदूर पसरू लागते... या काळात घरात भर दुपारी शांतता असते अन् नकळत मलाही जाणीव होते की,माझ्या साहित्य क्षेत्रातील वाटचालीस सुरुवात याच दिवसांमध्ये लहानपणी आजोबांनी केलेल...

Henry David Thoreau....

तो मला आज भेटला, ऐकुन खूप होतो त्याच्याबद्दल पण कधी वाचले नव्हते त्याला आज जेव्हा त्याच्या जन्मदिनी सर्वच एका पेक्षा एक सरस लेख त्याच्यासाठी लिहत होते, तेव्हा मी काहीच  लिहू शकत नाही... नाही... खरेतर हे शक्यच नाही, पण मग सूरवात कुठून करायची हे सुचत नाहिये म्हणजे त्यांच्याबद्दल, त्यांना वाचण्यात लोकांच्या उभ्या हयाती गेल्या त्यांना मी आज एक दिवसात कसे ओळखू  शकतो... दिवसभर त्याच्याविषयी जे हातात पडल ते अधाश्यासारखे वाचून संपवत होतो... इतक्यात ते मला उलगडलेले पूर्णपणे की मीच त्यांना जाणून घेण्यात विचाराने अपूर्ण आहे याचे उत्तर मलाच माहीत नाही, किंवा मलाही कळाले नाही अजुन तरी... आज जे भेटलं ते सरसर वाचून मोकळे होऊन जायचे आहे, मग बऱ्याच आकृती मनात येईल त्या जश्या वाटेल तश्या एका कॅनव्हासवर उतरवायच्या आहे... तो राग आहे की आनंद माहीत नाही कदाचित आज खूप काही भेटलं आहे, हाती लागले आहे त्याचं गणित उलगडत नाहीये, म्हणून असलेली विचित्र Excitement असेल पण ती उलगडणारी नाहीये. म्हणूनच आज कॅनव्हासवर खूप काही मनातले उतरवणार आहे,ते चित्ररूपात मी किती सरसपणे उतरवू शकेल माहीत नाही प...

अस्वस्थता....

#हो_हल्ली_अंधारच_दिसतो_मला... काय आहे या फोटोत ? हाच फोटो Pinterest वर जेव्हा मी बघितला तब्बल दोन तास त्याच्या वर्तुळात असलेल्या सर्व फोटोज् ला मी बघत बसलोय.... कुठेतरी भूतकाळात घेऊन जातो हा,जिथे सर्वच ब्लॅक आहे जे व्हाइट होऊ बघत आहे.. माझच लिखाण हल्ली मला भीतीदायक वाटू लागले आहे म्हणून वाचण्याचे,वाचणाऱ्या सर्वांचे मार्ग मी बदलून टाकले आहे...विचार बदलले,लिखाणाची वैचारिक पातळी बदलली की काहीतरी मागे राहिल्या सारखे वाटते,कुठेतरी काहीतरी हरवलंय अन् अलिकडे तेच शोधतोय.... विचारांच ब्लेंक होणं माणसाला खूप काही शिकवत असतं,एकाच वेळी काय हवंय,कोणासाठी,कश्याला,अन् का ही प्रश्न पडली की त्याला उत्तर द्यायला नाही जमत... काय आहे फोटोत ? अंधार आहे,जेव्हा डोळ्यांना फक्त अंधारच दिसतो त्यावेळी त्यांना फक्त अंधारच दिसणार आहे.त्यांना उजेड नाही दिसला,त्यांना ब्लॅक अँड व्हाईट असलेलं एका माणसाचे चित्र नाही दिसले,जो खूप उंच आहे केस वाढले, ब्लेझर घातलेले आहे त्याने इतके सर्व नाही दिसले... बरे हे सर्व ज्याच्या त्याच्या ठिकाणी ठेऊन देऊ,फोटोत सकाळच्या प्रहरी पडणारे कोवळे ऊन जे त्या व्यक्तीच्या...

शब्द संपले आहे माझे...

शब्द संपले आहे माझे... शब्द संपले आहे माझे, कवितेला विकण्या पर्याय शोधायचा आहे... विकले गेले शब्द माझे, कवितेला जगण्या पर्याय मिळाला आहे... हल्ली कवितांची भाषा मला उमगत नाही,सुचल्या त्या कविता कोठे, मागे सोडून दिलेल्या अडचणीच त्या... शब्द माझे फक्त माध्यम ते जगण्याच्या गुज गाण्याशी आहे, मैफिल रोज सजते इथे पण ती अपुरी कवितांशिवाय आहे.... पर्याय शोधले शिवाय कवितेच्या अनेक मी आहे,मार्गच तो चालण्याचा कविते शिवाय जीवन व्यर्थ आहे... कविता हल्ली रचली जात नाही रुजवली जाते माझ्या आत आहे, विकली कविता जेव्हा माझी विकले मला जात आहे.... नाव:भारत सोनवणे

मनावर स्वार झालेला एकांत....

मनावर स्वार झालेला एकांत आणि अंधारलेल्या वाटा,अंधारून आलेलं काळंभोर आकाश. पुन्हा तेच सांगतो अंधारलेल्या वाटा,अंधारून आलेलं काळंभोर आकाश आणि मनावर स्वार झालेला एकांत... घरातून नजर कल्पनेतल्या टेकडीवर असलेल्या काळ्या खडकात फिरत आहे,काळ्याभोर आकाशासोबत सोसाट्याचा घराच्या दिशेने वाहणारा वारा... काल सांगितलेली स्ट्रीट लाईट बंद चालू करायची सवय.हो तीच सवय 24 तास उलटून गेले आणि अजूनही तोच विचार चालू आहे का ? तर हो..हाच तर असतो मनावर स्वार झालेला एकांत अन् कायमचा शांत झालेलो मी,आकाश ढगाने भरले असल्यामुळे आजूबाजूला चहूकडे प्रकाश नाहीचे.तरीपण काल एक दोघे म्हणाले की प्रकाश असावा आसपास,मग आपलीच आपल्याला काळजी असते आणि आपण त्या दिशेने मार्गक्रमण करतो. सर्वच अंधार दिसत असला तर बळजबरीने प्रकाश बघायचा का अंधारात..? Bharat Sonwane