गाफील..! मराठी साहित्य विश्वात कल्पित साहित्य हा प्रकार आहे,यात बऱ्यापैकी लेखन अनेक लेखकांनी केलेलं आहे.जे कल्पनेतून आपल्याला वास्तव जीवनाकडे घेऊन जाते किंवा वास्तव जीवन कसे जगावे हे शिकवते तर कधी हेच कल्पित साहित्य आपलं अनुकरण करते.... मराठी साहित्य विश्वात कल्पित साहित्य या प्रकारात बऱ्यापैकी लेखन केलेले "सुहास शिरवळकर" यांचे "गाफील" हे पुस्तक काल वाचले.एकूण "२९१" पानांचे असलेले हे पुस्तक आपल्याला पुस्तकाचा नायक फिरोजसोबत अनेक वळणांवर फिरून आणते... "सुहास शिरवळकर" यांनी कल्पित साहित्य प्रकारात लिहलेले हे खूप उंचीचे अन् प्रत्येकाने "सुहास शिरवळकर" यांचे समग्र साहित्य वाचताना आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे जे की आपण एकदा पुस्तक वाचायला घेतले की शेवटपर्यंत बसल्याजागी बसून ठेवते... फिरोज इराणी नावाचं पात्र किंवा या पुस्तकाचा नायक या पुस्तकातील तीन कथा किंवा त्यांच्या आयुष्यात नसत्या लफड्यात पडल्यामुळे आलेली ही तीन वळणे आहे,जी प्रत्येकवेळा पुस्तकाच्या नावाप्रमाणे "गाफील" राहिल्यामुळे नेहमीच झालेली त्याची फसगत आणि सग...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!