मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य...

आठवणींतील हमारा बजाज अन् औरंगाबादकरांची दिवाळी..!

आठवणींतील हमारा बजाज अन् औरंगाबादकरांची दिवाळी..! आठवणींतील हमारा बजाज अन् औरंगाबादकरांची दिवाळी..! १९८५ साली औरंगाबाद येथे बजाज कंपनीचा प्लांट उभारण्यात आला आणि औरंगाबाद शहराला एक नवीन ओळख मिळण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून बजाज उद्योग समूहाचा जेव्हा-जेव्हा विचार केला जातो तेव्हा-तेव्हा अनावधानाने औरंगाबाद शहराचे नाव येतेच. इतकं जवळचं नातं हे बजाज उद्योग समूह अन् औरंगाबादकरांचे आहे. बजाज उद्योग समूहाने औरंगाबाद शहराचा विकास असो किंवा, वाईट राजकारण असो किंवा वाईट अर्थकारण, शहराचा वाईट काळ हे सगळे दिवस पाहिले. परंतु या अश्या वाईट काळातही बजाज कंपनी सामान्य औरंगाबादकरांच्या सोबतीनेच होती. औरंगाबाद शहर पर्यटन क्षेत्रात "पर्यटन राजधानी" म्हणून आपले स्थान कायम ठेवून होतीच. परंतु आता नव्याने "ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल हब सिटी" ही औरंगाबाद शहराची वेगळी ओळख झाली होती.   तिला कारणीभूत औरंगाबाद शहराच्या लगत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये बजाज, व्हिडिओकॉन, लुपिन लिमिटेड, गरवारे, कॉस्मोफिल्म, फायझर, वोखार्डट, कोलगेट, जॉन्सन अँड जॉन्सन अश्या अनेक कंपन्या ज्या त्या काळात औ...

अनायसे शहराचे आकर्षण ..!

अनायसे शहराचे आकर्षण..! अनायसे शहराचे आकर्षण वाटते अन् मग नकळत शहरं जवळ केली जातात.एक दिवस,दोन दिवस,तीन दिवस अन् मग याही वेळी सोय झाली नाही,म्हणून किती दिवस शहराच्या वाटा भटकत रहायचं ; म्हणून गावाकडच्या परतीच्या वाटेला प्रवास सुरू होतो पुन्हा एकदा..! जेव्हा हा प्रवास सुरू होतो तेव्हा मनात एकच प्रश्न असतो,अजून किती दिवस माझं हे असे गाव शहर,गाव शहर हेलपाटे चालू राहणार..? छान वाटतं खरंच इथलं हे जग,कॉर्पोरेट विश्व असो की गुळगुळीत रस्ते,मान वर करून बघत रहाव्या अश्या उंचउंच इमारती..! एखाद्या जागी आपली आयुष्याची जागा फिक्स होईल असं एकही स्थान का आपल्याला या शहरात इतकं भटकुनही भेटत नाहीये..!  हा विचार मग मनात असंख्य प्रश्न निर्माण करून जातो..! कधीतरी वाटतं की आपली कुवतच नसावी हे असं चकचकीत शहर बघायची,तिथं वास्तव्य करायची.हल्ली परतीच्या वाटेला लागलं की काहीवेळ पुन्हा बस थांब्यावर थांबून कुठलीशी जाहिरात माझे डोळे शोधत असतात..! माझ्यासारख्याच कुण्या बेरोजगाराने एक दिवसाचा रोजगार मिळाला म्हणून ती जाहिरात लावलेली असते..! जाहिरात अशी असते की कमवा महिन्याला १५०००-१८००० रुपये,काम काय त...

रूम पार्टनर..!

रूम पार्टनर..! काल रात्री साडे अकराला कामाची शिफ्ट सुटली,कंपनीच्या गेटवर आलो तेव्हा जमिनीला साधळा लागेल असा पाऊस चालू होता.पुन्हा पाऊस वाढेल म्हणून अंधारातच धपाधप पावलं टाकत,जवळजवळ पळतच रस्त्यानं कामगार नगराच्या अन् माझ्या रुमच्या दिशेनं निघालो.एरवी हे रोजचं आहे,त्यामुळे याचं मला कुठलं सोयरसुतक नाही..! दोन-अडीच कीमीची धावपळ करून अखेर रूमवर पोहचलो,अंगावर शर्ट घामाने की हळूवार पडणाऱ्या पावसाने ओलाचिंब झाला हे काही समजलं नाही.मित्र तिसऱ्या शिफ्टसाठी कंपनीत निघून गेला होता,दरवाज्याला घातलेली कडी खोलली आणि आल्या-आल्या कॉटवर पडलो..! जीव दिवसभराच्या कामानंतर पार थकून गेला होता,पडल्या पडल्याच एका पायाने दुसऱ्या पायातील बुटाशी खेळ करून दोघांना काढले अन् पायानेच कॉटखाली लोटून दिले.सोक्स हाताने काढून गादीखाली खोचुन दिले अन् काही अर्धा तास निपचित पडून राहिलो,डोळे लावून शांत-शांत..! खिडकीच्या तावदनातून हळूवार निवांत गार वारा वाहत माझ्यापर्यंत येत होता अन् निपचित पडल्या जागी अंगाला गारवा झोंबत होता.गारव्याने अंगावर शहारे येऊ लागले होते,काही पंधरा-वीस मिनिटांनी जरासे ताजेतवाने वाटले..! अन...

झूल्या आई..! भाग-तीन

झूल्या आई ..! भाग - तीन  पहाटेची उन्हं मी बसल्याठीकाणी माझ्या डोळ्यावर येऊ लागली होती. शिवनामायच्या वाहत्या पाण्यात ती सूर्यकिरणं पडत अन् तीही आरश्याप्रमाणे डोळ्यावर चमकू लागली होती.  सोन्याबाबा माझ्याजवळ बसल्याजागी फराळाचं करून, खरगटे झालेले भांडे चुल्हीतल्या राखूंड्यानं नारळाच्या काथीनं खसाखस घासत होता. झोल्याआई दूरवर असलेल्या बांबूच्या वनात पोसलेल्या बांबूना खाटकासारखं तिच्या हातात असलेल्या धारदार कत्तीनं बांबूचे खांडं करत होती. एकनाथ बाबा टूपातून नदीच्या थडीला येऊन आपलं जाळं ओढीत अन् त्यात आलेल्या मासोळ्या,मांगुर मासे,खेकडे डालग्यात टाकत होता. मध्येच जाळ्यात एखादा छोटा साप जाळ्यात अडकून येऊन जायचा मग एकनाथ बाबा त्याची शेपटी धरून जोरात जमीनीवर दोन-तीन वेळा आपटत दुसऱ्या क्षणाला साप मरुन गेलेला असायचा. मी बसल्या जागेवरून त्यांचं हे चालू असलेलं काम न्याहाळत होतो. अधूनमधून वाऱ्याची झुळूक माझ्या दिशेनं येऊन जायची अन् क्षणिक सुखाचा गारवा मला देऊन जायची. सोमवार असल्यानं गावातल्या बायका,पुरुष मंडळी महादेवाच्या पिंडीवर पाणी घालायला येत होते. मनोभावे पाणी घालून,बेल पान वा...

झूल्या आई..! भाग-एक

झूल्या आई..! भाग-एक  पहाट सरायला तसं मी गावच्या एकांगाला असलेल्या महादेवाच्या देऊळात दर्शनाला म्हणून शिवनामायच्या अंगाला असलेली वाट जवळ करू लागलो. गावातली माय-बाप वडील माणसं पहाटेच काकड्याला म्हणून मंदिराची वाट जवळ करतात.मी बऱ्याच दिवसांच्या उपर गावाला आल्यानं आज देऊळात जावं म्हणून देऊळाच्या वाटेला लागलो..! गावाला यंदाच्या सालाला चांगलीच बरसाद होवून गेली होती,म्हणून शिवना माय दुथडी भरून वाहू लागली होती.शिवना मायच्या दोन्ही अंगाला बेसरमाची झाडं डोक्यावरून फिरली होती,त्यात अधून मधून सापाची पिल्ल खेळतांना दिसायची,गावची लहानगी मुलं सलगी करून पुलावरून त्यांचा हा खेळ बघत बसलेली असायची..! गावचा सगळ्यात वयस्कर सोन्या बाबा अजूनही बारा महिने नदीच्या पात्रात नहानं करतो,जोवर तो गावात हाय,जिंदा हाय तोवर गावाला दुष्काळ नाय असं गावची जुनी माणसं,बुडीबापुडे लोकं म्हणतात..! कारण विचारलं तर म्हणतात की सोन्या बाबा म्हशीच्या डोहात उभे राहून दररोज बारा महिने सूर्याला पूर्वेस तोंड करून अर्ध्य देतो,म्हणून सूर्यदेवाची आपल्या गावावर कृपा हायसा.गावला रोगराई नाय की दुष्काळ नाय..! मी अनवाणी पायानं ...

झूल्या आई..! भाग दोन

झूल्या आई..! भाग - दोन यंदाच्या सालाला गावात मोप पाऊस पडून गेल्यामुळे शिवना माय दुथडी भरून परंतु संथपणाने वाहत होती. शिवना मायच्या तीरावर यशवंतराव चव्हाण दादा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी असंख्य दगडी पूल बांधलेली होती. आजही ती चांगल्या स्थितीत होती. आता गावच्या बायका तिथं रोजचं धुणे घेऊन धुवायला यायच्या, त्यांच्या पारगभर चालणाऱ्या गप्पा. गप्पा कसल्या आपल्याच बालपणीच्या आठवणी, माहेरच्या आठवणी एकमेकींना त्या सांगायच्या अन् घटकाभर तितकंच आपल्या कष्टाळू जगण्याचा त्यांना मग त्यातून विसर पडायचा. मी महादेवाच्या देउळातून नदीचं संथपणे वाहणं, बायकांच्या गप्पा, रघुनाना कोळी यांचं टूपात बसून नधडीत मासं पकडणं न्याहाळत बसलो होतो. सोन्या बाबाला आज एकादस असल्यानं तो मंदिराच्या एकांगाला असलेल्या त्याच्या खोलीत शाबूदाना करायचा म्हणून चुल्हंगन पेटीत बसला होता. नदिच्या थडीला एकांगाला बांबूच्या बेटाचं दाट वन होतं. नदीला मोप पाणी असल्यानं बांबूचे बेटं मोप पोसले होते, दोन्ही हाताच्या तळव्यात बसणार नाही अशी काही बांबू त्यात झाली होती. या बांबूच्या वनाची अन् गावच्या एकुलत्या एक टोपले करणाऱ्या झ...

कंत्राटी कामगार अन् आयुष्य..!

कंत्राटी कामगार अन् आयुष्य..! कंपनीच्या फर्स्ट शिफ्टच्या कामावर जायचं म्हणून सगळे शहर शांत झोपलेले असताना रूम पार्टनर पहाटे साडे चारलाच उठला. मी रात्री सेकंड शिफ्ट करून आलो असल्याने, वापरलेलं निरोध ज्यात आपलाच अंश असतो. जो एक जीव निर्माण करू शकतो,त्याला जसं माणसं काम झाल्यावर कचराकुंडीत फेकून देतात. तसा मी कंपनीत दिवसभराच्या कामात इतका वापरून घेतला जातो की, जसं त्या निरोधात वीर्यरूपाने एक जीवाची सुटका करून त्याला सोडून दिलं जातं, तसं मला काही तासांसाठी कंपनीतून सोडून दिलं होतं. फरक इतकाच होता की तो कायमचा सुटला जातो अन् मी तेरा-चौदा तासांसाठी.  कॉटवर महिन्याभरापासून पडलेलं मॅक्झिम गोर्कीचं 'मदर' हा बिघडेल मित्र रात्री चारला उठून वाचतोय, हे बघून मी अवाक झालो. हे पुस्तक वाचायला घेतलं की तो झपाटल्यासारखे घंटाभर तीस - चाळीस पाने वाचून घेतो अन् आठ दिवस त्या पुस्तकाला पहातसुद्धा नाही. साहजिक तो पट्टीचा वाचणारा नाही पण हे पुस्तक त्याला का कुणास ठाऊक इतकं का पसंतीस उतरले. वाचतांना एका हातात सिगारेट अन् कॉटवर पालथा पडून तो पुस्तक वाचत राहतो. अश्यावेळी मात्र  फॉगच्या बाटलीचे...

इंडस्ट्रिअल विश्व अन् कंत्राटी कामगार..!

इंडस्ट्रिअल विश्व अन् कंत्राटी कामगार..! चार वर्षांपूर्वीचा कंपनीतला पहिला दिवस आजही आठवला की आपसूकच अंगावर काटा येऊन जातो. कुठल्याही फार्मा कंपनीत लागायचं म्हंटले की साधं कॅजूअल वर्कर म्हणून लागायचं असेल तरीही अनेक गोष्टी पार पाडाव्या लागतात. डॉक्युमेंट्स, एक्साम, मेडिकल अन् मग डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अश्या सगळ्या गोष्टी पार करून झाल्या. मी पास झालो अन् अखेर एका कंपनीत 'कॅजूअल वर्कर' म्हणून सहा महिन्यांची कंत्राटी पद्धतीने नोकरी लागली. पहिल्याच दिवशी सेकंड शिफ्टसाठी कामावर बोलावले. तालुक्याच्या गावात पूर्वी खूप कामं केली होती, पण इतक्या मोठ्या ठिकाणी पहिलेच. त्यामुळे एक अनामिक दडपण वाटायचं, छातीत धडधड व्हायची. पहिला दिवस कंपनीच्या गेटमधून सुरू होणारी कित्येक नियमांची अंमलबजावणी करत अखेर मी कामावर आलो. नियम साधे पण पाळणे आवश्यक असे होते. मग ते गळ्यात आयडी कार्ड असणे, सेफ्टी शूज असणे, दाढी, कटिंग, हाताची नखे व्यवस्थित असणे, आयडी कार्ड रजिस्टर असणे, ते नसेल तर मग कामाला घ्यायचे नाही. अजून खूप नियम असायचे काम कमी अन् या नियमात राहून तिथे काम करणे,यातच माझ्यासारख्या न...

'प्रांजल'आणि 'शरणागत् प्रपत्ती'

'प्रांजल'आणि 'शरणागत् प्रपत्ती' - डॉ.रमेश सुर्यवंशी. गेले बरेच दिवस 'प्रांजल'आणि 'शरणागत् प्रपत्ती' या दोन कादंबऱ्या वाचण्याच्या विचारात होतो पण योग काही जुळून येत नव्हता. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात या दोन्ही कादंबरींबद्दल थोडक्यात सारांश कळाला. मग या दोन्ही कादंबरी वाचण्याची उत्सुकता, आतुरता अजूनच वाढली. दोन दिवसांपूर्वी अखेर या दोन्ही कादंबरी मिळवल्या आणि यासोबतच अजून एक कादंबरी असे एकुण तीन कादंबऱ्या तीन दिवसात वाचून संपवल्या. दोन्ही कादंबऱ्या फार अश्या मोठ्या नाहीत, एकूण १२५-१२५ पानांच्या या दोन्ही कादंबऱ्या आहेत. त्यामुळे आपण सहज वाचून संपवतो. कादंबरीच्या आतील लेखन त्यातील घटनाक्रम हे सर्व लिखाणात कैद करणारे लेखक 'डाॅ.रमेश सुर्यवंशी सर' ओळखीचे,जवळचे असल्याने हे सगळं वेळोवेळी त्यांच्याशी झालेल्या गप्पांच्या माध्यमातून ऐकून होतोच आणि त्यामुळे एक अनामिक उत्सुकता लागून होतीच. काल सायंकाळी या दोन्ही कादंबऱ्या वाचून संपवल्या अन् मनात वाटून गेलं की याबद्दल आपण लिहायला हवं आहे. तर 'प्रांजल' ही १२५ पानांची कादंबरी आपल्याला ...