मुख्य सामग्रीवर वगळा

झूल्या आई..! भाग दोन

झूल्या आई..! भाग - दोन


यंदाच्या सालाला गावात मोप पाऊस पडून गेल्यामुळे शिवना माय दुथडी भरून परंतु संथपणाने वाहत होती. शिवना मायच्या तीरावर यशवंतराव चव्हाण दादा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी असंख्य दगडी पूल बांधलेली होती. आजही ती चांगल्या स्थितीत होती.

आता गावच्या बायका तिथं रोजचं धुणे घेऊन धुवायला यायच्या, त्यांच्या पारगभर चालणाऱ्या गप्पा. गप्पा कसल्या आपल्याच बालपणीच्या आठवणी, माहेरच्या आठवणी एकमेकींना त्या सांगायच्या अन् घटकाभर तितकंच आपल्या कष्टाळू जगण्याचा त्यांना मग त्यातून विसर पडायचा.

मी महादेवाच्या देउळातून नदीचं संथपणे वाहणं, बायकांच्या गप्पा, रघुनाना कोळी यांचं टूपात बसून नधडीत मासं पकडणं न्याहाळत बसलो होतो. सोन्या बाबाला आज एकादस असल्यानं तो मंदिराच्या एकांगाला असलेल्या त्याच्या खोलीत शाबूदाना करायचा म्हणून चुल्हंगन पेटीत बसला होता.

नदिच्या थडीला एकांगाला बांबूच्या बेटाचं दाट वन होतं. नदीला मोप पाणी असल्यानं बांबूचे बेटं मोप पोसले होते, दोन्ही हाताच्या तळव्यात बसणार नाही अशी काही बांबू त्यात झाली होती.

या बांबूच्या वनाची अन् गावच्या एकुलत्या एक टोपले करणाऱ्या झूल्या आईची एक कथा होती. मी बाकावर बसल्याजागी तिचा विचार करत होतो, तितक्यात रानवाटेनं केकटीची झाडं हुडकीत-हुडकित ती या बांबूच्या वनाकडे येताना मला दिसली. मी बसल्याजागी झूल्या आईला आवाज दिला.

"ऐ झूल्या आय एकादसचतं तुझं हे खाटकावानी बांबू तोडायचं काम बंद ठीव,इतकं काम करुन क्का मरतीया क्का काय !
मी बऱ्याच दिवसांच्या अंतराने गावाला आलो असल्यानं,पडत्या सावलीनं दुरून ओझरते दिसत असल्यानं तिने मला ओळखलं नव्हतं कदाचित. मग ती माझ्या बसल्याजागी माझ्याकडे येऊ लागली. 
 
कपाळावर मोठ्ठाच बुक्का लावलेली,मोकळं-ढाकळं लुगडं नेसलेली,अंगात जरिच्या खणाची चोळी घातलेली, तिनं लुगड्याचा शेला पार गुडघ्यापहूर वर ओढून कंबरात खोसून घेतला होता. पिकलेल्या केसांचा बुचडा बांधून त्याला केकटीच्या सालीनं तिनं बांधून घेतलं होतं. पायात दोन्ही वाहना घातलेल्या होत्या,ओळख पटावी म्हणून तिनं त्या दोन्ही वाहनांना चींदुक बांधून घेतलेलं होतं.

हातात तिच्या कामाची कत्ती,विळा घेऊन ती माझ्या दिशेनं आली, आणि तिनं मला प्रश्न केला कोणरं लका..? , कुणाचा हायसा तू..?
मी मला सावरत बसलो अन् तिला म्हंटले ये ग आज्जे बस घडीभर.

झूल्या आई बाकावर येऊन बसली,सोन्या बापूने एरवी चुल्हंगन पेटवून उपासाची जिन्नस शिजायला टाकून दिली होती. तो ही माझ्या मोहरे उक्खड बसून बिड्या ओढीत होता. मग माझी ओळख सांगायला त्यानच सुरुवात केली. 

अगं झूल्या बाय त्यो वरल्या बेटातल्या कौश्या बाय हाईत का,जगन नानाची मधली सूनबाय तिचा धाकला लेवूक हाय. तुझी जोडीदारीन नाय का झुंब्र्या आई तिचा नातू हायसा.

शहराला शिकायला हाय दोन-चार महिन्याला येतूया गावाला,गावची त्याला मोप ओढ हाय, आला की साऱ्या गावच्या लोकांना भेटून जातया पोरगं.

तितक्यात झूल्या आई ओळख पोहचल्यासारखी माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागली अन् तिच्या डोक्याजवळ लावून बोटं मोडू लागली. अरे देवा माझ्या कर्मा तू झुंब्र्या आईचा नातू हायसा का..!

कित्ती मोठ्ठा झालासा पोरा,लहान होता तेव्हा झुंब्र्या आईच्या कड्यावर बसून यायचा माझ्या घरला,तुझी आज्जी लई चांगली म्हातारी होती पोरा. साऱ्या गावच्या मंदिराला येढा घालायची पहाटे, देवाचं भलतं येड तिला. चार साल झाले तेव्हा बरसदीच्या दिवसात इथं देउळात आली पहाटेच सहाच्याला..!

काय झालं,महादेवाच्या पिंडीवर पाणी घालायला म्हणून नदीत पाणी घ्यायला आली का काय माहित, शेवाळल्या दगडावरुन तिचा पाय सरकला अन् शिवनामायच्या पाण्यात गेली वाहून.

पुढं सावळ्या नानाच्या वावराच्या मोहरे असलेल्या केटित आडकली, तूवर खूप उशीर झाला हुता ती देवाचं करतच देवाची झाली....
असं बोलत बोलत झूल्या आई डोळ्याला पदर लावून डोळे पुशीत होती, मलाही माझ्या आज्जीची आठवण झाली अन् मी ही शून्यात बघत बसलो.

त्या दिवशी असच काहीसं माझ्या आज्जी संगत झालं होतं, सोन्या बाबा तिच्या मोप आठवणी सांगत होता मी ऐकत होतो, शिवनामायच्या  पात्रात शून्यात नजर लावून बघत होतो..!

क्रमशः

Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...