मुख्य सामग्रीवर वगळा

झूल्या आई..! भाग-एक

झूल्या आई..! भाग-एक 

पहाट सरायला तसं मी गावच्या एकांगाला असलेल्या महादेवाच्या देऊळात दर्शनाला म्हणून शिवनामायच्या अंगाला असलेली वाट जवळ करू लागलो.

गावातली माय-बाप वडील माणसं पहाटेच काकड्याला म्हणून मंदिराची वाट जवळ करतात.मी बऱ्याच दिवसांच्या उपर गावाला आल्यानं आज देऊळात जावं म्हणून देऊळाच्या वाटेला लागलो..!

गावाला यंदाच्या सालाला चांगलीच बरसाद होवून गेली होती,म्हणून शिवना माय दुथडी भरून वाहू लागली होती.शिवना मायच्या दोन्ही अंगाला बेसरमाची झाडं डोक्यावरून फिरली होती,त्यात अधून मधून सापाची पिल्ल खेळतांना दिसायची,गावची लहानगी मुलं सलगी करून पुलावरून त्यांचा हा खेळ बघत बसलेली असायची..!

गावचा सगळ्यात वयस्कर सोन्या बाबा अजूनही बारा महिने नदीच्या पात्रात नहानं करतो,जोवर तो गावात हाय,जिंदा हाय तोवर गावाला दुष्काळ नाय असं गावची जुनी माणसं,बुडीबापुडे लोकं म्हणतात..!

कारण विचारलं तर म्हणतात की सोन्या बाबा म्हशीच्या डोहात उभे राहून दररोज बारा महिने सूर्याला पूर्वेस तोंड करून अर्ध्य देतो,म्हणून सूर्यदेवाची आपल्या गावावर कृपा हायसा.गावला रोगराई नाय की दुष्काळ नाय..!

मी अनवाणी पायानं देऊळाची वाट जवळ करत होतो.तितक्यात सोंग्या आक्काचा मुंज्याजवळ येत नाही तोच मला सडकीच्या वाटेनं जयवंता नाना आमचे गावचे पाटील येतांना दिसले.त्यांनी मला हात वर करत थांबायला सांगितले अन् मी थांबलो..!

काय छोटे सरकार कशे हायसा..? अन् कव्हशीक आलासा गावाला..? 
( त्यांनी मला विचारलं..! )
काय नाय संमध मजीत हायसा बघा नाना,काल आलो सांच्याला आठच्या महामंडळाच्या लाल डब्यानं..!

तुम्ही कशे हायसा नाना,तब्येत भलतीच खराब केलीसा..! (मी नानाला म्हंटले)
काय करतू लका पिवळा कऊळ होवून गेलासा बघा पंधरधी सरली तेव्हा,पार पोटात शिरला होता.
मग काय चुना खाय,कात खाय,गावचे वैद सोमा नानाकडून कऊळ उतरून घे,अंगारे धुपारे कर असं करून उतरून घेतलासा कऊळ लका..!
आता बरा लागून राहिला पण तब्येत बहेकली,ती बहेकलीच लेका.काही केल्या तालावर येईना झाली हायसा..!

चालतासा का देऊळाला (मी विचारलं)
नगो बाबा,आमचं काय रोजचं हाय,ये तू जावून..! म्हणत जयवंता नाना पंचायतीच्या ओट्यावर गप्पा झोडायला गेले.
मी सोंग्या आक्काच्या मुंज्याचे पाय पडून देउळाच्या वाटेनं निघालो..!

पुलावरून तीतर-बितर नजरेने बघणारी लहानगी मुलं एरवी लंगडी खेळत,पळत खूप पुढे निघून गेली होती.सोन्याबाबा म्हशीच्या डोहातून त्यांच नहानं आवरून एका हातात तांब्या अन् एका हातात धोतराचा सोंगा धरून मंदिराच्या दिशेनं जातांना दुरूनच मला दिसत होते..!

चार साल झाले तसा म्या शिक्षणाकरता गाव सोडला तो सोडलाच.दोन तीन महिन्याला आलो की मग सगळा गाव भटकून घेतो,डोळ्यात साठवून घेतो.मायच्या हातचं कोड्यास,भाकर मन भरून खावून घेतो,गावच्या जुन्या लोकांच्या गप्पा पोटभर ऐकून घेतो तेव्हाच शहराची वाट जवळ करतो..!

मी माझ्या विचारात तळपत्या उन्हात,गुलमोहराच्या झाडांच्या सावलीनं वाटेनं चालत-चालत महादेवाच्या देऊळात आलो.सोन्याबाबाचे दर्शन घेतले,त्यांच्याकडे असलेला पितळीचा तांब्या घेऊन शिवना मायमधून पाणी आणलं अन् महादेवाच्या पिंडीवर टाकून दर्शन घेतले.
देऊळाला लागूनच भामासाद महाराजांची समाधी आहे तिचे पाय पडले अन् डोळे बंद करून ध्यानस्थ अवस्थेत कितीवेळ बसून राहिलो..! 

काही वेळाने शिवना मायच्या अंगाला करून असलेल्या बाकड्यावर बसून मी शिवना मायला न्याहाळत होतो,तिचं निरंतर वाहणं डोळ्यात साठवून घेत होतो.
बाजूला असलेल्या लिंभाऱ्यावर चिमण्यांचा चिवचिवाट चालू होता तो ऐकत बसलो होतो,शिवनामायच्या तीरावर पहाटेच बायकांची धुणे धुवायला म्हणून रीघ लागलेली असत,त्यांच्या गप्पा बसल्याजागी माझ्या कानावर येऊ लागल्या होत्या..!

क्रमशः

Written by
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...