मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिवनामायच्या कथा..! भाग - १

शिवनामायच्या कथा..! भाग - १ पहाट सरायला, तसं मी गावच्या एकांगाला असलेल्या, महादेवाच्या देऊळात दर्शनाला म्हणून शिवनामायच्या अंगाला असलेली वाट जवळ करू लागलो. गावातली माय-बाप वडील माणसं पहाटेच काकड्याला म्हणून मंदिराची वाट जवळ करतात. मी बऱ्याच दिवसांच्या उपर गावाला आल्यानं आज देऊळात जावं, म्हणून देऊळाच्या वाटेला लागलो.   गावाला यंदाच्या सालाला चांगलीच बरसाद होवून गेली होती, म्हणून शिवनामाय दुथडी भरून वाहू लागली होती. शिवनामायच्या दोन्ही अंगाला बेसरमाची झाडं डोक्यावरून फिरली होती. त्यात अधूनमधून सापाची पिल्ल खेळतांना दिसायची. गावची लहानगी मुलं सलगी करून पुलावरून त्यांचा हा खेळ बघत बसलेली असायची. गावचा सगळ्यात वयस्कर आजोबा सोन्या बाबा अजूनही बारा महिने नदीच्या पात्रात नहानं करतो. जोवर तो गावात हाय, जिंदा हाय तोवर गावाला दुष्काळ नाय असं गावची जुनी माणसं, बुडीबापुडे लोकं म्हणतात.  कारण विचारलं तर म्हणतात की, सोन्या बाबा म्हशीच्या डोहात उभे राहून दररोज बारा महिने सूर्याला पूर्वेस तोंड करून अर्ध्य देतो, म्हणून सूर्यदेवाची आपल्या गावावर किरपा हायसा. गावला रोगराई नाय की दुष्काळ नाय. अश्य...

शिवनमायच्या कथा..! भाग-दोन

शिवनमायच्या कथा..! भाग-दोन मी महादेवाच्या देऊळातून नदीचं संथपणे वाहणं, बायकांच्या गप्पा, रघुनाना कोळी यांचं टूपात बसून नधडीत मासं पकडणं न्याहाळत बसलो होतो. सोन्या बाबाला आज एकादस असल्यानं तो मंदिराच्या एकांगाला असलेल्या त्याच्या खोलीत शाबूदाना करायचा म्हणून चुल्हंगन पेटीत बसला होता. नदिच्या थडीला एकांगाला बांबूच्या बेटाचं दाट वन होतं. नदीला मोप पाणी असल्यानं बांबूचे बेटं मोप पोसले होते. दोन्ही हाताच्या तळव्यात बसणार नाही, अशी काही बांबू त्यात झाली होती. या बांबूच्या वनाची अन् गावच्या एकुलत्या एक टोपले करणाऱ्या झूल्या आईची एक कथा होती. मी बाकावर बसल्याजागी तिचा विचार करत होतो. तितक्यात रानवाटेनं केकटीची झाडं हुडकीत-हुडकित ती या बांबूच्या वनाकडे येताना मला दिसली. मी बसल्याजागी झूल्या आईला आवाज दिला.   "ऐ झूल्या आय, एकादसचतं तुझं हे खाटकावानी बांबू तोडायचं काम बंद ठीव, इतकं काम करुन क्का मरतीया क्का काय..!'' मी बऱ्याच दिवसांच्या अंतराने गावाला आलो असल्यानं,आणि चेहऱ्यावर पडत्या सावलीनं दुरून ओझरते दिसत असल्यानं तिने मला ओळखलं नव्हतं. मग ती माझ्या बसल्याजागी माझ्याकडे येऊ लागली...

शिवनामायच्या कथा..! भाग-तीन

शिवनामायच्या कथा..! भाग-तीन   मी होकारार्थी मान हलविली अन् काथीने आवळलेले दोन बांबू ओढीतओढीत झोल्याआईच्या झोपडी पहूर घेऊन आलो. ती पण तीन बांबू ओढीतओढीत माझ्यामागून आली. बांबू अंगणात टाकून मी उभा राहिलो होतो, तितक्यात तिनं मला तिच्या झोपडीतून आवाज दिला..!   ऊ छोटे सरकार या वजेस झोपडी मई..! मी आपल्याला कोरा चहा करतीसू..!   झोपडीची चौकट माझ्या खांध्याइतकी उंच असल्यानं मी वाकून झोपडीत आलो. झोल्याआईनं चुल्हांग्नात राकील ओतून चुल्हीला जाळ लावला, एका पितळी पातील्यात तुटक्या कानाच्या तीन कपांचा अंदाज घेत चहा ठेवला.   मी झोपडी न्याहाळत होतो. झोल्याआईच्या एव्हढ्याश्या झोपडीत एक पिवळा बल्ब चालू होता, एका घडोंचीवर पाच-सहा गोधड्यांची वळकटी करून त्या गोधड्या व्यवस्थित रचून ठेवलेल्या होत्या. चार माठांची उथळण रचलेली होती. एका झोपडीला आधार म्हणून असलेल्या लाकडाला जर्मलची कॅटली टांगलेली होती, एक छोटासा देव्हारा होता अन् त्यात दोन-चार फुटू होते.   चहाला उकळी आली होती तिचा सुगंध माझ्या बसल्याजागी मला येत होता. झोल्याआई तिला सांडशीत ते पातेलं धरून त्याला जाळावर हलवीत होती, तसतस चहा ...

शिवना मायच्या कथा..! भाग-४

शिवना मायच्या कथा..! भाग-४   मी एका हातात दूरडी घेऊन घराच्या वाटेला लागलो. थंडीचे दिवस असल्यानं गावात चौका-चौकात शेकोट्या पेटल्या होत्या. एखाद - दुसऱ्या गल्लीतून घराकडे जाताना एखाद्या घरातून काळ्या व्हरवंट्यावर वाटून केलेल्या भाजीला फोडणी देतानाचा येणारा तो सुगंध येत होता. अन् पोटाला लागलेली भूक अजून वाढत होती. गावच्या पिंपळ पारावर आलो तसं गावची बापूडी लोकं धरणीला धरून बसली होती. समोर शेकोटी पेटवलेली, तिच्या धुराचे लोट आसमंतात मिळत होते. इतकी मोठी शेकोटी होती की, सांजेला म्हसनात पेटलेलं एखादं मड आता निखाऱ्यात येईल.त्याच्या चहूबाजूंनी गावातली म्हातारी गावातल्या गप्पा हानीत बसली होती. गप्पा तरी काय त्यांच्या अमक्याच्या शेतात हे झालं तमक्याच्या शेतात ते झालं, या मालाला बाजारपेठ नाही, यंदाच्या उन्हाळ्यात पोरीचं लग्न करून टाकू, जावई चांगले आहे. शहराला नोकरी करत्यात, मोप जमीन हाय अश्या ठराविक विषयांच्या चौफेर त्यांच्या गप्पा असायच्या.मी जरावेळ गप्पा हाणल्या अन् तिथून काढता पाय घेतला.   मी गेल्यामुळे तिथं झोल्याआईचा विषय निघला अन् पुढं तो विषय बराचवेळ लोकं चघळत बसली. कारण झोल्याआई का...

शिवना मायच्या कथा..! भाग -५

शिवना मायच्या कथा..! भाग -५ काही केल्या डोळे लागना झाले होते, रात भरीच भरून आली होती. अन् मी दिवसभराचा माझा फिरस्तीचा रिकामा उद्योग आठवत निपचितच विचार करत अंथरुणावर पडलो होतो. परसदारच्या अंगाला असलेल्या पिंपळाच्या झाडाचे पानं वाऱ्याच्या झोताने फडफड वाजत पानांशीच गप्पा करीत बसलं होतं. त्याचा आवाज झोपल्या जागी माझ्यापर्यंत येत होता. तितक्यात काळोखात शिवनामायच्या थडीला असलेलं स्मशान चिरशांत, भयावह भासावं असंही डोळ्यांसमोर येऊन गेलं. स्मशानाला लागून असलेल्या नदीच्या थडीला वाळू माफीयांनी केलेल्या खोल खड्यांमध्ये कुत्रे थंडीच्या या दिवसात रातभर विसाव्याला तिथेच थांबली होती. कुणी लोळत पडलं होतं; तर कुणी उभ्या मोठ्यानं गावच्या दिशेनं तोंड करून इवळत होतं. तो इवळण्याचा आवाज माझ्यापर्यंत सहज येत होता. सारं गाव आतापर्यंत निपचित पडला असावं असं वाटत होतं. अधूनमधून कुंभाराच्या आळीत राहणारा दगडु आज्जा खोकल्याची उबळ आली की मोठ्यानं खोकलायचा. अगदी तासनतास तो खाटेवर खोकलत अंथरुणात अंगावर गोधडी घेऊन बसलेला असायचा. त्यानं तोंडातून फेकलेला बेडका पट्टदेशी आवाज करत जमिनीवर पडायचा. जसं आकाशातून सलगीच्या उन्हाळ...

शिवना मायच्या कथा..! भाग-सहा

शिवना मायच्या कथा भाग-सहा  आज एकादस असल्यानं पहाटेच नेहमीप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या पालखीची फेरी गावातून निघाली होती. विठ्ठल रखुमाईच्या नामस्मरणात तल्लीन होऊन गावकरी, लहानगी पोरं पालखीच्या पुढे फेर धरून पावल्या घेत होती.  एकादशीच्या दिवशी गावात एक जिवंतपणा असल्याची आगळी वेगळी जाणीव होत असते,जी आज होत होती. नाही तर एरवी पहाटेच्या दहाच्या सुमारास सारा गाव रानात कामाधंद्याला निघून गेलेला असतो. अन् गावची म्हातारी माणसं गावच्या पारावर गप्पा झोडीत बसलेले असतात. गावातल्या म्हाताऱ्या आज्या घराच्या मोहरे असलेल्या ओट्यावर दळणदाना करत बसलेल्या असतात. सकाळ दुपारच्या पाराकडे कलली की, मग गावच्या सरकारी झेडपीच्या शाळेतली लहानगी पोरं घराच्या दिशेने गावच्या मधल्या गल्लीने पळतच सुटतात. इतक्यावेळ निपचित पडलेलं गाव या लहानग्यांच्या आवाजाने अजून जिवंत होतं. भर दुपारच्यावेळी नदी संथपणे वाहत राहते. गावात नव्यानं आलेल्या सूना डोक्यावरचा पदर सावरत धुणे घेऊन महादेवाच्या देऊळाजवळ नदी थडीला केलेल्या दगडी पुलावर धुणे धुवत बसतात. हाच काय त्यांना हक्काचा वेळ मग माहेरच्या आठवणींना उजाळा दिला जातो. भरघोस गप्प...

शिवना मायच्या कथा. भाग - ७

शिवना मायच्या कथा. भाग - ७ तवल्यागडचा डोंगूर आम्ही अर्धानिर्धा चढला अन् मला एकाकी धाप लागल्यासारखे झाले. शहराला गेलो तसं कष्टाची कामं कमी झाली अन् श्रम करण्याची सवय मोडल्या कारणाने  माझी ही अशी अवस्था झालेली होती. आम्ही डोंगराच्या माथ्यावर पोहोचलो तिथून पत्र्याचा, कौलाच्या झोपडीच्या आकारांच्या घरांचा सारा गाव नजरीस पडत होता. गावाच्या जवळपास रानातल्या रानवाटा डोळ्यांना स्पष्ट दिसत होत्या. ज्या वाटांवर नजर फिरली की आमची नजर आपसूकच आम्हाला गावाजवळ, गावच्या वेशीजवळ घेऊन येत होती. भली धाप लागल्याने मी हिरव्या गवतात बोडक्या बाभळीच्या पडसावली खाली लोळत पडलो होतो. सलीम दूरवर दिसणाऱ्या धरणपाळीवर भोळ्या राजूच्या चरणाऱ्या बकऱ्यांना बोटे डोळ्याच्या समोर धरून अनवरला दाखवत होता. ते दोघेही भोळ्या राजूच्या बोलण्याची नक्कल करत एकसोबत हातवारे करत मोठ्यानं हसत होते. सलीम भोळ्या राजूच्या बोलण्यातले नेहमीचे वाक्य मोठ्यानं बोलत होता. जेव्हा जेव्हा त्याच्या बकऱ्या सरळ वाटेला चरायचे सोडून आडवाटेला शेतकऱ्याच्या रानात घुसायची तेव्हा तो जसं बकऱ्याना उद्देशून बोलायचा तसं सलीम बोलत होता. हुरीयो केवढी ये..! माय...

शिवना मायच्या कथा..! भाग - आठ

शिवना मायच्या कथा..! भाग - आठ  रानच्या वाटा दूर करत आम्ही गावच्या वेशीला असलेल्या खोकल्या आईच्या देऊळा जवळ येऊन ठेपलो. भोळ्या राजूच्या बकऱ्या दूरवर रानातून येताना नजरी पडत होत्या. त्यांच्या खुरांची धूर आसमंतात अस्ताला जाणाऱ्या सूर्य किरणात मिसळून तांबूस तपकिरी रंगाची धूळ दिसू लागली होती. या धुळीत आसमंत अंधारून यावं असा दिसू लागला होता. लोकांच्या वावरात रोजानं गेलेल्या बायका डोईवर सरपणाचा भारा घेऊन टोळकीनं गाव जवळ करीत होत्या. गडी माणसं कुणी बैलगाडीत, कुणी सायकलीवर दुधाची कॅटली अटकवून गप्पा झोडीत झोडीत गाव जवळ करत होते.  खोकल्याईचं दर्शन घेऊन मी सईद आणि अन्वर घराच्या वाटेला लागलो. घरं जवळ आली तशी सईद आणि अन्वर मुसलमान मोहल्यात असलेल्या त्यांच्या घराच्या दिशेनं निघून गेली. उद्या भेटूया म्हणून मी ही माझ्या घराच्या दिशेने आलो. भोळ्या राजूच्या बकऱ्या आता गावात शिरल्या होत्या. भोळा राजू त्या बकऱ्या ज्यांनी त्याच्याकडे राखायला म्हणून ठेवल्या होत्या, त्यांच्या दावणीला बांधून घराच्या दिशेनं जात होता. मी ही आता घराजवळ पोहचलो होतो. दिवसभराच्या भटकंती नंतर आता खूप थकल्यासारखे झाले होते म्...

वाटचाल "ब्लॉकचेन सिस्टीम"या नव तंत्रज्ञानाच्या दिशेने..!

वाटचाल "ब्लॉकचेन सिस्टीम" या नव तंत्रज्ञानाच्या दिशेने..! वाटचाल "ब्लॉकचेन सिस्टीम" या नव तंत्रज्ञानाच्या दिशेने..! "ब्लॉकचेन सिस्टीम" हे तंत्रज्ञान अलीकडच्याच दशकात अस्तित्वात आले आहे. २००८ मध्ये सातोशी नाकामोटो म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्यक्तीने (किंवा लोकांच्या गट समूहाने) प्रथम विकेंद्रित ब्लॉकचेनची ही संकल्पना तयार केलेली आहे.  ब्लॉकचेनमध्ये जगभरातील रेकॉर्ड-कीपिंग सिस्टमचा आधार बनण्याची क्षमता आहे, परंतु ती फक्त १५ वर्षांपूर्वीच म्हणजे २००८ मध्येच लॉन्च करण्यात आली होती. तिचा उदय "सातोशी नाकामोटो" या टोपणनावाने बिटकॉइन या ऑनलाइन रोख चलनाच्या मागे अज्ञात व्यक्तींनी ही "ब्लॉकचेन सिस्टीम" तयार केलेली होती. सध्या पंधरा वर्षांनीही हे तंत्रज्ञान अजूनही सुरूवातीच्या टप्प्यात आहे. शिवाय ते वापरू शकणाऱ्या प्रशिक्षितांची संख्याही सध्या मर्यादित अशी आहे. त्यामुळे हा तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यास विलंब होत आहे. मात्र या तंत्रज्ञानाचे फायदे व त्याची क्षमता लक्षात घेऊन अनेक अग्रगण्य संस्थांनी या तंत्रात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली ...

अर्थशास्त्र, अदानी समूह व हिंडेनबर्ग समूहाचा नेमका अहवाल..!

अर्थशास्त्र, अदानी समूह व हिंडेनबर्ग समूहाचा नेमका अहवाल..! अर्थशास्त्र, अदानी समूह व हिंडेनबर्ग समूहाचा नेमका अहवाल..! अदानी समूहासारख्या बलाढ्य कंपन्यांना त्यांचा चालणारा कारभार, आर्थिक उलाढाल यांचा सखोल अभ्यास करून तो जगासमोर आणून अडचणीत आणणारी "हिंडेनबर्ग" सारखी गुंतवणूक संशोधन संस्था नेमकं करते तरी काय ? जाणून घेऊया हिंडेनबर्ग रिसर्च एल.एल.सी बद्दल.  हिंडेनबर्ग रिसर्च एलएलसी ही एक न्यूयॉर्क शहरातील गुंतवणूक संशोधन संस्था आहे. हिंडेनबर्गची स्थापना २०१७ साली अमेरिकन नागरिक व हिंडेनबर्गचे संस्थापक "नाथन अँडरसन" यांनी केली आहे. ही संस्था विविध कंपन्यांच्या शॉर्ट-सेलिंगवर,शेअर मार्केट मधील इतर उलाढाली तसेच कंपनीच्या माध्यमातून होणारे अनेक मोठमोठाले आर्थिक व्यवहार यांवर लक्ष केंद्रित करते. हिंडेनबर्ग रिसर्च कंपनी वरील सर्व बाबींचा अभ्यास करून तिच्या वेबसाइटद्वारे असा सार्वजनिक अहवाल तयार करत असते. ज्यात कॉर्पोरेट घोटाळा आणि गैरप्रकार केल्याचा आरोप समोरच्या कंपन्यांवर होऊ शकतो. हिंडेनबर्ग रिसर्च ही आपल्या लक्ष्यित कंपनीचा सदर तपास अहवाल सहा किंवा अधिक महिन...