अर्थशास्त्र, अदानी समूह व हिंडेनबर्ग समूहाचा नेमका अहवाल..!
अर्थशास्त्र, अदानी समूह व हिंडेनबर्ग समूहाचा नेमका अहवाल..!
अदानी समूहासारख्या बलाढ्य कंपन्यांना त्यांचा चालणारा कारभार, आर्थिक उलाढाल यांचा सखोल अभ्यास करून तो जगासमोर आणून अडचणीत आणणारी "हिंडेनबर्ग" सारखी गुंतवणूक संशोधन संस्था नेमकं करते तरी काय ?
जाणून घेऊया हिंडेनबर्ग रिसर्च एल.एल.सी बद्दल.
हिंडेनबर्ग रिसर्च एलएलसी ही एक न्यूयॉर्क शहरातील गुंतवणूक संशोधन संस्था आहे. हिंडेनबर्गची स्थापना २०१७ साली अमेरिकन नागरिक व हिंडेनबर्गचे संस्थापक "नाथन अँडरसन" यांनी केली आहे. ही संस्था विविध कंपन्यांच्या शॉर्ट-सेलिंगवर,शेअर मार्केट मधील इतर उलाढाली तसेच कंपनीच्या माध्यमातून होणारे अनेक मोठमोठाले आर्थिक व्यवहार यांवर लक्ष केंद्रित करते.
हिंडेनबर्ग रिसर्च कंपनी वरील सर्व बाबींचा अभ्यास करून तिच्या वेबसाइटद्वारे असा सार्वजनिक अहवाल तयार करत असते. ज्यात कॉर्पोरेट घोटाळा आणि गैरप्रकार केल्याचा आरोप समोरच्या कंपन्यांवर होऊ शकतो.
हिंडेनबर्ग रिसर्च ही आपल्या लक्ष्यित कंपनीचा सदर तपास अहवाल सहा किंवा अधिक महिन्यांत तयार करत असते. यासाठी ही कंपनी सदरील कंपन्यांच्या सार्वजनिक नोंदी, अंतर्गत कॉर्पोरेट दस्तऐवज तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांशी बोलून त्याचे विश्लेषण करत असते.
त्यानंतर हा अहवाल हिंडेनबर्गच्या मर्यादित भागीदारांना प्रसारित केला जातो, जे हिंडेनबर्गसह एकत्रितपणे ठरवलेल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करते. ठरवलेल्या कंपनीच्या शेअरची किंमत कमी झाल्यानंतर हिंडेनबर्ग आपला नफा कमवायला सुरुवात करते
अदानी समूह ही पहिली कंपनी नाही जिच्याबाबत हिंडेनबर्गने अहवाल दिला आहे. याआधीही त्यांनी अनेक बड्या कंपन्यांविरोधात असे अहवाल दिले आहेत. ही कंपनी कोणत्याही कंपनीला लक्ष्य करते आणि त्यातील त्रुटी दाखवते. या अहवालामुळे जेव्हा कंपनीचे शेअर्स घसरतात तेव्हा ती खरेदी करून हा नफा कमावते.
हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानीचे शेअर्स २५ टक्क्यांनी घसरले आहेत. अदानी समूहाच्या या अहवालापूर्वीही हिंडेनबर्गने अनेक कंपन्यांविरुद्ध असे अहवाल जारी केले आहेत. २०२० मध्ये असे सुमारे १६ अहवाल प्रसिद्ध करण्यात आले होते. या अहवालांमुळे कंपन्यांचे शेअर्स सरासरी १५ टक्क्यांनी घसरले.
हिंडेनबर्गने Nikola, SCWORX, Genius Brand, Ideanomic, Vince Finance, Genius Brands, SC Wrox, HF Food, Bloom Energy, Aphria, Twitter Ink या कंपन्यांविरुद्ध यापूर्वी अहवाल दाखल केला आहे.
या अहवालांमध्ये सदरील कंपन्यांच्या शॉर्ट-सेलिंगच्या पद्धतीचा बचाव आणि गुंतवणूकदारांचे संरक्षण यावर देखील अभ्यासपूर्ण विश्लेषण केले होते.
हा अहवाल काही ठोस अभ्यासावर आधारित असतो, ज्यात शेअर मार्केटमध्ये काही आर्थिक गैरव्यवहार होत आहे का.? तो कितपत योग्य,अयोग्य पद्धतीने होत आहे किंवा योग्य पद्धतीच्या अडून किती गैरमार्गाने तो होत आहे.? या अश्या वरील नामांकित मोठ्या कंपन्या आपल्या स्वतःच्या फायद्याकरता कंपनीच्या खात्यात चुकीच्या नोंदी किंवा गफलत करत आहेत का.? एखादी कंपनी स्वतःच्या फायद्याकरता शेअर मार्केटमध्ये चुकीच्या दुसऱ्या कंपन्यांच्या शेअर्सची पूर्वनियोजित बोली लावून कोणाचे हेतुपुरस्सर नुकसान तर करत नाही ना.?
अश्या अनेक बाबींचे अभ्यासपूर्ण संशोधन पूर्ण केल्यानंतर 'हिंडेनबर्ग रिसर्च' कंपनी एक सविस्तर अहवाल प्रसिद्ध करते. जो अनेकदा सामान्य जनतेसाठी,तसेच संबंधित कंपनीत आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या छोट्या कंपन्यांसाठी धक्का देणारा असा असतो. अश्यावेळी सरळ मार्गे या कंपनीच्या अहवालाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर दिसून येत असतो. जसा काही दिवसांपूर्वी आपण अदाणी समूहाच्या बाबतीत सादर केलेल्या अहवालानंतर अनुभवला.
Written by,
Bharat Sonawane .
एम.बी.ए (उत्पादन आणि विपणन व्यवस्थापन).
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा