वाटचाल "ब्लॉकचेन सिस्टीम"
या नव तंत्रज्ञानाच्या दिशेने..!
वाटचाल "ब्लॉकचेन सिस्टीम"
या नव तंत्रज्ञानाच्या दिशेने..!
"ब्लॉकचेन सिस्टीम" हे तंत्रज्ञान अलीकडच्याच दशकात अस्तित्वात आले आहे. २००८ मध्ये सातोशी नाकामोटो म्हणून ओळखल्या जाणार्या व्यक्तीने (किंवा लोकांच्या गट समूहाने) प्रथम विकेंद्रित ब्लॉकचेनची ही संकल्पना तयार केलेली आहे.
ब्लॉकचेनमध्ये जगभरातील रेकॉर्ड-कीपिंग सिस्टमचा आधार बनण्याची क्षमता आहे, परंतु ती फक्त १५ वर्षांपूर्वीच म्हणजे २००८ मध्येच लॉन्च करण्यात आली होती. तिचा उदय "सातोशी नाकामोटो" या टोपणनावाने बिटकॉइन या ऑनलाइन रोख चलनाच्या मागे अज्ञात व्यक्तींनी ही "ब्लॉकचेन सिस्टीम" तयार केलेली होती.
सध्या पंधरा वर्षांनीही हे तंत्रज्ञान अजूनही सुरूवातीच्या टप्प्यात आहे. शिवाय ते वापरू शकणाऱ्या प्रशिक्षितांची संख्याही सध्या मर्यादित अशी आहे. त्यामुळे हा तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यास विलंब होत आहे. मात्र या तंत्रज्ञानाचे फायदे व त्याची क्षमता लक्षात घेऊन अनेक अग्रगण्य संस्थांनी या तंत्रात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे,याबद्दल अधिक जाणून घेणं सुरू केलं आहे.
जेथे व्यवहार पडताळणीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष माणसांवर अवलंबून राहूनच करावी लागते व खूप वेळखाऊ असते,तेथे "ब्लॉकचेन सिस्टीम" हे तंत्रज्ञान खूपच उपयुक्त ठरणार आहे. आज अनेक कंपन्या या सिस्टीमचा वापर आणखी कोणकोणत्या कामासाठी करता येईल याच्या जास्तीत जास्त शक्यता जाणून घेण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत आहेत.
सातोशी नाकामोटोने ज्यावेळी २००८ मध्ये ‘बिटकॉइन्स’ या आभासी चलनामागचे तंत्र जगासमोर जाहीर केले. त्यावेळी लोकांचे लक्ष या चलनासाठी वापरलेल्या प्रणालीकडे वेधले गेले होते. "ब्लॉकचेन" या नव्या सिस्टीममध्येही "बिटकॉइन्स"चेच तंत्र वापरलेले आहे.
आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाने (आयएफएससीए) भांडवली बाजार, बँकिंग, विमा आणि आर्थिक सेवांमध्ये कार्यरत असलेल्या संस्थांसाठी "नियामक सँडबॉक्स" फ्रेमवर्क सुरू केला आहे. उपयुक्त डाटा ओळखण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी आणि सरकारी विभागांना जागतिक दर्जाची ब्लॉकचेन सेवा प्रदान करण्यासाठी बंगळुरूमध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानातील उत्कृष्टता केंद्रही (सीओई) सुरू केले गेले आहे.
हे थर्ड-पार्टी क्लाउड-आधारित पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापन म्हणून ब्लॉकचेन-एएस-ए-सर्व्हिस (बीएएएस) प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय माहिती केंद्र (एनआयसी) द्वारे स्थापित केले गेले आहे. इंस्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी (आयडीआरबीटी), रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीसाठी मॉडेल प्लॅटफॉर्मवर मोठे काम करीत आहे. जे की भविष्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरणारे असेल.
समजून घेऊया ब्लॉकचेन तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय..?
प्रत्येक व्यावसायिकाकडे आपली एक खातेवही असते, तशीच "ब्लॉकचेन" ही एक प्रकारची डिजिटल खातेवहीच आहे. यातसुद्धा आर्थिक व्यवहाराच्या नोंदी ठेवल्या जातात. त्यात तुम्ही आपला जमा-खर्च बघू शकता आणि तुमच्या सर्व व्यवहारांची माहिती डिजिटल स्वरुपात एकाच ठिकाणी साठवून ठेवू शकता.
पण "ब्लॉकचेन" म्हणजे प्रत्यक्षातील खातेवहीचे डिजिटल माध्यमात एवढेच त्याचे स्वरूप नाही. सर्व प्रकारच्या व्यवहारांच्या नोंदींची ही एक अत्यंत नावीन्यपूर्ण, अत्याधुनिक पद्धत आहे.
पारंपरिक नोंदी करताना प्रत्येक व्यवहाराची सत्यता तपासून पहावी लागते. पूरक कागदपत्रे जमवून सांभाळून ठेवावी लागतात. ताळेबंद जुळावावा लागतो.पण ‘ब्लॉकचेन सिस्टीम’मधील सर्व व्यवहार त्या सिस्टीमला जोडलेल्या सर्वांना बघता येतात. त्यामुळे सत्यतेची पडताळणी आणि कागदपत्रांची गरज उरत नाही.
"ब्लॉकचेन" या तंत्रज्ञानाची वैशिष्ट्य.
(अमोल दिलीपराव सावंत)
"ब्लॉकचेन सिस्टीम" वर केलेल्या सर्व व्यवहारांवर संपूर्ण जगात अत्यंत सुरक्षित मानली जाणारी डिजिटल स्वाक्षरी असते. त्यामुळे ‘ब्लॉकचेन’मध्ये नोंदलेल्या व्यवहारांमध्ये खोट्या सह्या किंवा खोट्या कागदपत्रांद्वारे फसवाफसवीचा प्रकार होऊच शकत नाही.या सिस्टीममध्ये सुरुवातीपासूनचा प्रत्येक कायमस्वरुपी व्यवहार नोंदविलेला राहातो.
नवा व्यवहार त्या व्यवहारांच्या साखळीतच, पण एक स्वतंत्र व्यवहार म्हणून नोंदविला जातो.
त्या विषयाशी संबंधित प्रत्येक व्यवहार या साखळीचा भाग असलेल्याच्या सार्वजनिक खातेवहीमध्ये प्रसिद्ध होतो. त्यामुळे कुणी फसवणुकीचा प्रयत्न जरी केला, तरी प्रत्येक संबंधिताला ते लगेच समजू शकते व तो व्यवहार थांबवू शकतो.
शिवाय ब्लॉकचेनमुळे सुरुवातीपासूनची मूळ कागदपत्रे व सर्व व्यवहार उपलब्ध असल्याने कागदपत्रांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी मध्यस्थाची गरजही नष्ट होते.
थोडक्यात सांगायचं तर ब्लॉकचेन ही एक विकेंद्रित, वितरित आणि सार्वजनिक डिजिटल खातेवही आहे ज्याचा वापर अनेक संगणकांवरील व्यवहार रेकॉर्ड करण्यासाठी केला जातो. जेणेकरून त्यानंतरच्या सर्व ब्लॉक्समध्ये बदल केल्याशिवाय आणि नेटवर्कच्या सहमतीशिवाय रेकॉर्डमध्ये बदल केला जाऊ शकत नाही.
ब्लॉकचैन तंत्रज्ञानाचा वापर हा आपला डेटा सुरक्षितपणे आणि सुलभपणे साठविण्यासाठी आणि पुन्हा वापर करण्यासाठी करता होतो आहे. भविष्यात आपल्या डेटा ची सुरक्षितता ही सर्वात मोठी समस्या असणार आहे. यावर मात करण्यासाठी ब्लॉकचैन हे तंत्रज्ञान कितपत किफायतशीर असेल हे पुढे चालून आपल्याला वेळच सांगू शकते.
माहिती साभार: गुगल.
माहिती संकलन: भारत लक्ष्मण सोनवणे.
एम.बी.ए : (उत्पादन आणि विपणन व्यवस्थापन.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा