वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग -४ पहाटेच्या चारला रानातली लाईन येणार अन् रानात गव्हाला पाणी भरायला म्हणून गावातील लोकं उठून रानाच्या दिशेनं आपलं आवरून सावरून निघाली होती. गावाच्या जवळ असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारे गावची तरुण पोरंही सहा वाजता गावच्या फाट्यावर येणारी बस अन् तिचा अंदाज घेत गावच्या सडकीनं निघाली होती. गावातली काही शेतकरी पहाटेच वावरातला अख्खर साफ करायला, दूध काढायला म्हणून जातांना सडकीने दिसत होती. कोंबड्याच्या बांगेसरशी सूर्योदय झाला अन् तांबडा पिवळसर सूर्याचा कोवळा प्रकाश साऱ्या पंचक्रोशीवर आला तसे गावाला सोनेरी लकेरीत मडवावे तसं गाव चमचम करू लागले होते. गावातली लगबग सुरू झाली तसं, गावातली म्हातारी माणसं आपलं सकाळचे अंघोळपाणी करून सावता माळ्याच्या देवळात दर्शन करायला म्हणून देवळाकडे निघाले होते. रामा कुंडूरसुद्धा कोंबड्याच्या बांगेसरशी उठला शिवनामायच्या पात्रात जाऊन अंघोळ करून देवपूजा करून तो लक्षी आईच्या पिंपळ पारावर येऊन बसला संतू अण्णा तलाठी अजून झोपलेले पाहून त्यांना उठवत रामा कुंडूर लक्षी आईच्या पिंपळ पार झाडून घेऊ लागला. पस्तीशीत असलेला ...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!