#Aurangabad... एकीकडे औरंगाबादमध्ये उज्ज्वल भविष्याचा विचार करून,नव्याने डीएमआयसी अंतर्गत निर्माण होणारे नवीन प्रकल्प,अलिकडेच पूर्णत्वाच्या टप्प्यावर असलेली ऑरिक औद्योगिक वसाहत आणि शहराला जोडुन असलेल्या चिकलठाणा एमआयडीसी,शेंद्रा एमआयडीसी,वाळूज एमआयडीसी,रेल्वे स्टेशन परिसरात असलेली जुनी एमआयडीसी यांच्या माध्यमातून औरंगाबाद शहराला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल सिटी मिळालेली नवी ओळख... झालेला उपलब्ध रोजगार आणि एकीकडे कोरोनाच्या काळात उद्योग विश्वात झालेला बदल,नवीन रुजु झालेल्या संकल्पना हे सर्व औरंगाबाद शहर आशिया खंडात औद्योगिक क्षेत्रात किती उंचीवरील शहर आहे दाखवून देत आहे... औरंगाबाद हे ऐतिहासिक आणि औद्योगिक शहर म्हणून जगाच्या नकाशावर आधीपासून ओळखले जातेच,त्यामध्ये दिल्ली-मुबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमुळे ऑरिकची नव्याने भर पडली आहे.त्यामुळे येथे उद्योग वाढीला एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झालेले आहे अन् सोबतच अनेक नवीन प्रकल्प या ठिकाणी उभारल्या जात आहे जाणार आहे.इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आल्याने औरंगाबादचा औद्योगिक विकासाचा आलेख हा पुढील पंधरा वर्षात कायम वाढत राहणारा असेल.ऑरिकमध्ये येत्या काळात ३,...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!