सीमांतनी..! हळदीने हात पिवळे झाले,लग्न झाले अन् नवतीचे नऊ दिवस संपले.एकोनिशीची सिमांतीनी आता दिवसभर कामाच्या अन् तिच्या संसाराच्या गराड्यात गुंतून गेली होती.टिपिकल गावाकडल्या साल दोन साल लग्नाला झालेल्या बायकांप्रमाने तीही कामं करू लागली,दिवसभर रोजंदारीने लोकाच्या वावराला खुरपणी,निंदणी करू लागली... ऐन तारुण्यात केलेलं पदार्पण अन् अंगावर संसार नावाच्या एका परंपरेत स्वतःला झोकून देऊन ती दिवसभर काम उपसायची अन् रात्री ऐन तारुण्यात आलेला तिचा दादला तिला घटकेभरचाही उसंत द्यायचा नाही...चार-सहा महिने मागे पडली,ऐन सुगीच्या दिवसात ती तीन महिन्याची पोटुशी असताना तिला कळलं अन् घरात आनंदाचा पारावर उरला नाही... कुणाच्या मनात घटकेभरही हा प्रश्न आला नाही की एकोनिशीची सिमांतीनी या सर्व गोष्टींना सामोरे जाईल का..? तिला इतक्या लहान वयात आलेलं बाळंतपण झेपल का..? , तिचं शेवटच्या काही महिन्यात तिला स्वतःला सावरणे जमल का..? प्रश्न खूप होते पण सर्व प्रश्नांना एकच उत्तर होतं..! ती काही जगाच्या पाठीवर न्यारी नाही,तिच्या मायला जमलं,तिच्या सासुला जमलं अन् आता तिच्या अठरा वर्षाच्या नंदेला जमलं. मग तिला...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!