बाबतीत थोडक्यात अन् माझी Interview Story..! साधारण आठ-दहा दिवसांपूर्वीची गोष्ट असावी.मी एका बड्या कंपनीसाठी ऑनलाईन माध्यमातून इंटर्विव्ह देत होतो,इंटर्विव्ह छान चालू होता. Naukri.com वर असलेला माझा Resume बघत ते मला प्रश्न करत होते,मी ही त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत होतो.अनेकदा काही प्रश्नांचे उत्तरे येत नसल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर दडपण आल्याचे भावही त्यांनी बघितले असेलच. एकूण त्या बड्या कंपनीतील ते एजआर विभागातील तिघेजण महत्त्वाच्या अन् अनुभवी व्यक्ती त्या असाव्या हे त्यांच्या बोलण्यातून सहज कळून जात होते.कारण माझाही तो फायनल राऊंड होता अन् यापूर्वी दोन राऊंड मी सहज सिलेक्ट होवून या राऊंडसाठी माझी निवड झाली होती..! हे सर्व सांगायचं इथे काय कारण आहे..? किंवा का म्हणून मी हे सर्व सांगतो आहे..? तर साधारण पंधरा मिनिटे इंटर्विव्ह झाला असेल अन् त्यांनी मला प्रश्न केला की,तू तुझ्या कामाच्या अनुभवात Freelance & Content Writer म्हणून जे काही लिहले आहे ते काय असतं..? अन् हे काम तर आपल्या फिल्डमध्ये कुठेही येत नाही मग हे काम नेमके काय असते अन् कामाचे स्वर...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!