कसं असते नाही का वयाची साठी ओलांडून गेली की,आयुष्यात कायमचा येऊन जाणारा हळुवारपणा हा आपल्याला भूतकाळातील आठवणींना सोबत करत जगायचा काळ असतो. नेमकं हे तारुण्यात आपल्याला उलगडत असते,म्हातारपणाची जाणीव होत असते,थकलेले शरीर व आठवणीतले विचार घेऊन जगणारे म्हातारपण हे खूप सुंदर एका वलयात राहून हे सर्व अनुभवणे हे खूपच अलवार अशी असलेली ही प्रोसेस आहे. याची प्रचिती काही दिवसांपूर्वी आली,तो क्षण.... पेपर बाबा पेपर... पेपरवाल्याने दोन-तीन वेळा आवाज देऊन तो पेपर त्याने त्या गॅलरीमध्ये फेकून दिला,आणि तो पेपरवाला पुढे चालता झाला.हे सर्व दृश्य ते आजोबा किचनमध्ये जाळीचे तावदान असलेल्या खिडकीतून बघत होते... गॅसवर तुळशीचे पान,आणि गवतीचहाची पाने घातलेला चहा ठेवलेला,सर्व किचनमध्ये त्याचा सुगंध पसरलेला होता.चहा उकळण्याचा आवाज कानावर पडतोय पण किचन ट्रॉलीमध्ये डब्ब्यात ठेवलेले बिस्कीट काही भेटत नव्हते,अखेर बरीच शोधाशोध आणि डब्बे उघडून बघितल्यावर एका डब्ब्यात बिस्कीट सापडले अन् जरासा उशीर झाला असता तर चहा उतू गेला असता हे ही कळाले.गॅस कमी करत चहा हलवून कपात ओतली आणि सुटकेचा श्वास त्यांनी सोडला,हो स...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!