स्वप्न महाराष्ट्र पोलिस होण्याचं..! 💙 मित्रांनो आणि मैत्रिणींनो काही दिवसांपूर्वी इतके दिवस आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो ती गोष्ट म्हणजे "महाराष्ट्र पोलिस दलात" होणारी पोलिस भरती जी की लवकरच होणार आहे. काही दिवसांपूर्वी राज्याच्या गृहमंत्र्यांनी पुढील दोन महिन्यांनी क्रमवारी ७२०० पदांची पोलिस भरती करण्याचे योजिले आहे.पुढील काळात नगरपालिका निवडणुका व इतर कारणे बघता या भरतीसाठी उशीर होवू शकतो किंवा गडचिरोली जिल्ह्यात ज्या पद्धतीने तात्काळ भरती प्रक्रिया सुरू झाली त्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा लवकरच पोलिस भरती होवू शकते. त्यामुळे आपणा सर्व मित्र-मैत्रिणींना पूर्णपणे जोरदार पोलिस भरतीच्या तयारीला लागायचे आहे..! लेखी परीक्षा पहिले होईल की मैदानी चाचणी पहिले होईल हे अजुन निश्चित नाही.परंतु आपण दोन्हींसाठी आता जोमाने तयारीला लागायचं आहे ;या दोन्हीपैकी काहीही असो आपण भरतीसाठी पूर्णपणे तयार रहायचं आहे..! हा लेख लिहण्यामागचे कारण एकच आहे की शहरातील व खेडे गावातील तरुणांना या लेखातून प्रेरणा मिळावी आणि काही महत्त्वाच्या बाबींचा त्यांनी विचार करावा. ...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!