कोल्हाट्याचं पोरं...! "किशोर शांताबाई काळे" यांचे आत्मचरित्र 'कोल्हाट्याचं पोर' आज एका दिवसात वाचुन पूर्ण केले... नृत्य ही कला बाईच्या जीवनातील अडथळे कसे दुर करते,सोबतच वेळोवेळी हीच कला तिच्या जीवनाची कशी फरफट करते हे दुःखद वास्तव 'कोल्हाट्याचं पोर' या आत्मचरित्रातून कोल्हाट्याचं पोर "किशोर शांताबाई काळे" यांनी आपल्या लेखणीतून पुस्तक रुपात लिहले आहे... शाळेत असतांना हजेरीत लावायला बापाचं नाव नाही म्हणून तिथं किशोर आपल्या आईचं नाव लावतो,त्याच मायेचा दुसरा लेक,दीपक आजोबाचं नाव बापाच्या जागी लिहितो..! का तर वंश चालावा अन् आपला वडिलोपार्जित व्यवसाय या नावानं ओळखला जावा म्हणुन... येथे पुरुषमंडळी आयतं बसून खातात-पितात आणि त्यांच्या मायबहिणी त्यांची हौसमौज-खाणंपिणं भागवण्यासाठी नाचगाणं करतात,मन विदीर्ण करून सोडील अशी मायलेकराची करूण कहाणी.... कोल्हाटी समाजातील ती माय जी समजदार असती,तिच्या जीवनाची भविष्यात होणारी आबळ तिला दिसते अन् ती निघून जाते एका सावकारा संगतीनं,मोठ्या मुश्कीलीनं ती या जित्यापणी मरणाला मुकली जाते खरी,परंतु मानलेल्या नवर्याकडे...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!