मनाचे स्वगत..!
दुपार सरून संध्याकाळ येते सूर्याला अस्ताला जातांना बघणे होते, रस्त्यावरची माणसेकम वाहनांची वर्दळही डोळ्यात साठवत राहतो.सध्या खिडकीच्या आत असलेल्या विश्वातील जग अन् खिडकी बाहेर दिसणारं विश्व यातील तफावत जाणवू लागली आहे...
पक्षांच ऊंच आकाशात मुक्तपणे सैर करणं आता अंगावर यायला लागलंय,होय अंगावर यायला लागलंय.कारण आता सर्वच खुप वेगळ्या पध्दतीनं नजरेसमोर दिसु लागलंय,ऐरवी आकाशात मुक्तपणे सैर करणारे पाखरं आपण पिंजय्रात कैद करून ठेवत होतो.पण काळ बदलला अन नियतीनं,निसर्गानं माणसाला त्याची जागा दाखवुन दिली.माणुस चार भिंतीच्या आत स्वत:हुन बंदिस्त झाला अन मानवाने पिंजय्रात ठेवलेली पाखरं मात्र आसमंतात मुक्तपणे सैर करू लागले...
दिवसभर काय करावं..? हा एकच प्रश्न सतावत असतो घरात जे काही आहे ते सर्व वाचुन झालंय,बय्राच गोष्टी शिकण्यासारख्या होत्या त्या शिकुन झाल्या आहेत.दिवसभर नजर रस्त्याला लागुन असते,येणारा जाणारा एक अर्धा ओळखीचा की अनोळखीचा मनाच्या प्रश्नाला उत्तरं देऊन मनही आता थकलं आहे...
गेलेली वेळ पुन्हा येत नसते हे मनाला कळते आहे,तरी हतबल होवुन मनाच्या विरोधात निर्णय घेऊन शांत अन शांत बसून राहतोय.बऱ्याच गोष्टी घडून गेल्या आहेत,ज्या तारुण्यात आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या असतात पण त्याही वेळी मला Move on करायला जमलं नाहीये...
अन् कदाचित अजूनतरी काही महिने ही परिस्थिती बदलणार नाही,हे ही कळून चुकलंय...
सध्या इतकंच करू शकतो आपण स्वतःची काळजी स्वतः घेणं सोबतच आपल्या माणसांची,एकांताशी मैत्री करून मनाला सामोऱ्या परिस्थितीशी दोन हात करायला जमलं की खूप काही जमलं आहे.
गेलेली वेळ ज्याप्रमाणे पुन्हा येणार नाहीये,त्याचप्रमाणे या वाईट काळात आपण आपल्याला जपलं तर भविष्य,भविष्यातील स्वप्न आता आपण वर्तमान काळात बघू शकतो.
पण त्यासाठी आपल्याला तितकेच स्वतःला जपायचे आहे...
हे असं लिहायला हात धजावत नाही पण मनातलं ओठांवर आल्याशिवायही रहाते कुठे...
Written by,
Bharat Sonawane
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा