मुख्य सामग्रीवर वगळा

Book's..!!! जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन..!

Book's..!!!
जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन..!
जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन दरवर्षी २३ एप्रिल रोजी साजरा केला जातो.वर्ल्ड बुक कॅपिटल २०२० मलेशियाची राजधानी असलेलं क्वालालंपूर आहे.युनेस्को आणि त्यासंबंधित संस्था जगभरात जागतिक पुस्तक दिन साजरा करतात,लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दीष्ट आहे.

विल्यम शेक्सपियर, मिगुएल सर्व्हंटिस आणि इंका गार्सिलोसो यांच्यासह जगातील ख्यातनाम व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, युनेस्कोने २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केले.
हा दिवस पहिल्यांदा २३ एप्रिल १९२३ रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला. स्पेनमध्ये मिगेल डे सर्व्हांटिसच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर १९९५ मध्ये पॅरिसमध्ये युनेस्कोची सर्वसाधारण सभा झाली, ज्यात जगभरातील लेखकांना आदर आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पुस्तकांमध्ये रस निर्माण करण्यासाठी जागतिक पुस्तक दिन प्रत्येक वर्षी साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला....

काल जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन होवुन गेला,विविध माध्यमातून,सोशल मीडिया अन् इतर प्ल्याटफॉर्मवरती अनेक अभ्यासपूर्ण लेख लिहले गेले,वाचल्या गेले.मुळात पुस्तक दिन साजरा करणे हे मला न रुचणारे किंवा न पटणारे आहे...

कारण पुस्तकाला कुठलाही एक दिवस नसावा,पुस्तकांसाठी आपला आयुष्यातील प्रत्येक दिवस हा असावा असे मला वाटत.पुस्तके ही प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाची असतात. कारण पुस्तके ही ज्ञानाचा समुद्र आहेत जी आपल्याला ज्ञान देतात.
वरील कारण बघता ते ही योग्य वाटतं,अगदीच की लेखकांचा सन्मान व्हावा कारण की तो फक्त एक पुस्तक लिहत नसतो तर कधीतरी खुप अभ्यास करून किंवा कल्पनेच्या सहायाने तो आपल्या मनातलं,जगातलं भुत,भविष्य,वर्तमान लिखाणात तो कैद करत असतो. ज्यामुळे की एक पिढी घडत असते,सोबतीला एक पुस्तक तयार होत असते जे की पुढील अनेक पिढ्यांना आयुष्याचे संदर्भ लावण्यासाठी,त्या पिढीला घडवण्यासाठी महत्वाचे ठरते...

जागतिक पुस्तक दिनी पुस्तकाच्या,वाचनाच्या अनेक व्याख्या केल्या जातील,जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने आपल्या आयुष्यात आपण पुस्तकाला कुठे स्थान देतो हे स्पष्ट करेल,लिखाणात कैद करेल.

आज विचार केला तर लेखन संस्कृती (कदाचित "लेखन संस्कृती" हा शब्द इथे फोल ठरेल.) ही आपल्याला जगाचा इतिहास दर्शवते,जसजसा माणूस आपल्या बुद्धीने श्रीमंत होत गेला तसतसा लिखाणाचे विषय बदलत गेले,माध्यमे बदलत गेले अन् पुस्तक लिखाण हे नोंदीचे एक महत्त्वपूर्ण दस्तावेज ठरले.

भविष्यासाठी वर्तमानकाळात आपलं आयुष्य कसं सुखकर होईल आयुष्याशी कोणत्या विचारांची लगट आपल्याला करावी लागेलं यासाठी अनेक पुस्तकं संपूर्ण जगात भूतकाळात लिहल्या गेली जी काही शतकांपूर्वी आताच्याही शतको पुढील वर्तमान काळातील वर्षांचा,स्थितीचा विचार करून लिहल्या गेली,आजही ती लिहल्या जात आहेत....

हे लेखन सर्व गुंतागुंतीच वाटत असेल पण माझ्या लेखी "पुस्तक" या शब्दाची व्याख्या ही आहे की
 "वर्तमान काळातील जीवन सुखकर करण्यासाठी आणि भविष्य काळातील कल्पनेतील जगण्यासाठी इतिहासाने उपयोगी ठरेल अश्या भूतकाळातील नोंदी ठेवण्याचं हे एक माध्यम"
कदाचित माझा कल हा इतिहास विषयाकडे जास्त असल्यामुळे मला तसे वाटत असावं त्यामुळे वर विचारानुसार ही व्याख्या बदलत जाते...

आज घडीला अनेक पुस्तके,ग्रंथ हे आपल्याला जगण्यासाठी समृद्ध करत आहेत.आपला वैभवशाली इतिहास आपल्या समोर ठेवत आहे इतिहासात अनेक लेखक होवुन गेले ज्यांनी आपल्या विचारधारा लिखाणातून व्यक्त करत जगाला एक समृद्ध जीवन कसे जगायचे याचा संदेश दिला....

भारताचा इतिहास लिहणारे अनेक लेखक होऊन गेले,ज्यांनी अनेक पुस्तके,ग्रंथ आपल्या देशाच्या संस्कृतीशी, इतिहासाशी निगडीत लिहले.
आज पुस्तक दिनी त्यांना या लेखात लिहावेसे वाटते....

जेम्स मिल- History of Birtish India. (खंड ३)
माल्कम- Political History of India.
व्हॅलेंटाईन चिरोल-Father of indian unrest.
राॅबट आर्म- Historical Frugments.
राधाकुमुध मुखर्ची-Ancient India, Ancient india Education,Gupta Empire, Hindu Civilization Nationalism in Hindu culture, Local Self Govt.in Ancient india.
के.पी.जैस्वाल -History of India.
सर जदुनाथ हरकार-Fall of Mughal Empire (खंड ४),Shivaji &His Time.
दादाभाई नौरोजी-Poverty of Birtish Rule in India.
जेम्स टाॅड- Annals and Antiquities of Rajasthan.
ऐ.एस.अळतेकर-The Position of women in Hindu Civilization.
एडवर्ड सैद-Orientalism.
लिओपोल्ड वाॅन रेंके- Princes of people of Southern Europe.
हेगेल- Philosophy of Dialectic.(तत्त्वज्ञान)
डॉ.के.एन.चिटणीस- Research Methodology in History.
(वरील लेख माझ्या नावासहित शेअर करायला माझी हरकत नाही)
Written by,
Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...