कोल्हाट्याचं पोरं...!
"किशोर शांताबाई काळे" यांचे आत्मचरित्र 'कोल्हाट्याचं पोर' आज एका दिवसात वाचुन पूर्ण केले...
नृत्य ही कला बाईच्या जीवनातील अडथळे कसे दुर करते,सोबतच वेळोवेळी हीच कला तिच्या जीवनाची कशी फरफट करते हे दुःखद वास्तव 'कोल्हाट्याचं पोर' या आत्मचरित्रातून कोल्हाट्याचं पोर "किशोर शांताबाई काळे"
यांनी आपल्या लेखणीतून पुस्तक रुपात लिहले आहे...
शाळेत असतांना हजेरीत लावायला बापाचं नाव नाही म्हणून तिथं किशोर आपल्या आईचं नाव लावतो,त्याच मायेचा दुसरा लेक,दीपक आजोबाचं नाव बापाच्या जागी लिहितो..! का तर वंश चालावा अन् आपला वडिलोपार्जित व्यवसाय या नावानं ओळखला जावा म्हणुन...
येथे पुरुषमंडळी आयतं बसून खातात-पितात आणि त्यांच्या मायबहिणी त्यांची हौसमौज-खाणंपिणं भागवण्यासाठी नाचगाणं करतात,मन विदीर्ण करून सोडील अशी मायलेकराची करूण कहाणी....
कोल्हाटी समाजातील ती माय जी समजदार असती,तिच्या जीवनाची भविष्यात होणारी आबळ तिला दिसते अन् ती निघून जाते एका सावकारा संगतीनं,मोठ्या मुश्कीलीनं ती या जित्यापणी मरणाला मुकली जाते खरी,परंतु मानलेल्या नवर्याकडे ती राहते तरीही ती एक नाच,गाणं करणारी स्त्री आहे अन् ती वाईट आहे,म्हणून समाजात होणारी तिच्या सार्या जीवनाची ससेहोलपट...
तिकडे किशोरची आईशिवाय होणारी वाईट अवस्था,आज्याचं दारूच्या नशेत त्याच्याकडून पडेल ते कामे करून घेणं,जिजीचे किशोरला पोटच्या पोरासारखं जपणं...किशोरच्या नशिबी आलेलं उभे आयुष्याचं दुखणं जे न सरणारे आहे,या अश्या वाईट परिस्थितीतही प्राथमिक शिक्षण पूर्ण करणं अन् उभे आयुष्य जगण्यासाठी चालू असलेला त्याचा संघर्ष...
खुप सुंदर आणि प्रेरणा देणारे पुस्तक हे आहे...
अतिशय वाईट परिस्थितीत किशोर शांताबाई काळे 'एम बी बी एस' चे ध्येय पूर्ण करतो अन् कोल्हाट्याचं पोर गावातले पहीलं डॉक्टर होतं....आयुष्यातला बराच काळ आईशिवाय राहवून पोरके होणं यासर्व अवस्थेतून आईसाठी वाटणारी नितांत माया,सोबतच आईसम असलेल्या मावश्यांची नाच,गाण्यातुन होणारी वाईट अवस्था अन् यासर्व जाच्यातून यांना कायमचं बाहेर काढण्यासाठी किशोरचा तो खडतर जीवन प्रवास...
तो भविष्यात येणाऱ्या सुगीच्या दिवसांना कल्पनेत अनुभवत अन् त्यासाठी अपार कष्ट सोसत असतो,किशोरचा खडतर जीवन प्रवास,कोल्हाटी समाजातील स्त्रीयांचे होणारे हाल,कलेचा वारसा जपण्यासाठी होणारी कोल्हाटी समाजातील स्त्रीयाची धरपकड सुन्न करणारी आहे...
Written by,
Bharat Sonawane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा