मुख्य सामग्रीवर वगळा

Education आणि बरच काही..!

Education आणि बरच काही..!

कॉलेजवयीन मुलांची होणारी मनाची द्विधा मनस्थिती,सोबतच वाढणारा मानसिक तणाव अन् बरच काही जे समोर जरी सर्व नॉर्मल दिसत असलं तरी आतल्या आत मनाला त्रास देणारं आहे.मुलांना नैराश्येच्या गर्तेत झोकवणारे आहे.
आज हा एक नवीन विषय घेऊन लिहण्याचा प्रयत्न करतो आहे,Actually या विषयावर आता लिहायला लागतंय हेच खुप काळजी घेणारं अन् विचार करायला भाग पाडणारे आहे...

त्याला कारण कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत असणारा प्रार्दुभाव किंवा इतर बरेचसे कारणे,बंद-चालु होणारी कॉलेजेस,ऑनलाईन लेक्चर चालू असले तरी बऱ्याच गोष्टी न समजता डोक्यावरून जात आहेत.आपण ज्या Stream मध्ये शिकतो आहे त्यात कुठलाही अभ्यास नसतांना फक्त अन् फक्त ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून पास होवुन पुढील वर्गात झालेली आपली बढती.ऑनलाईन माध्यमातून होणाऱ्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे...

परंतु आता पुढे काय,जेव्हा कुठल्याही interview साठी आपण जाणार आहोत,तिथे काय होणार तिथे विचारली जाणारी प्रश्न अन् मग आपल्याला उत्तरे न येत असल्यामुळे होणारी आपली वाईट अवस्था.साहजिक आहे यात कोणाचीच चुक नाहीये पण कुठेही नोकरी करण्यासाठी आपण तितपत पात्र ठरायला हवे आहेना,सोबतच सर्व होत असताना इथेच आपण आपला Interview Fail गेल्यामुळे नैराश्येच्या गर्तेत जातो...
 
मग यासाठी पर्याय काय..?

त्यामुळेच कॉलेजमध्ये प्रवेश घेताना आपण कुठल्या Stream मध्ये तो घेतोय हे खुप महत्त्वाचं या ठिकाणी वाटतं (कारण Interview मध्ये होणारी वाईट अवस्था बऱ्यापैकी या एकाच गोष्टीवर अवलंबून असते, तुम्ही जे शिकत आहात त्यात कितपत ज्ञान तुम्हाला आहे...) कॉलेजेमध्ये मिळणारे Practical knowledge असो किंवा Theory knowledge कळायला हवं आहे,आता कॉलेज चालू नसल्यामुळे यापैकी काहीही होत नाहीये परंतु आपण चांगल्या ग्रेडने पास तर होत आहोत...

यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे आपण ज्या Stream मध्ये शिकत आहोत त्याची आपल्याला आवड असणे,त्या शिक्षणाचे Basic knowledge असणे.

तर Basic knowledge म्हणजे काय तर आपण जे काही शिकतो आहे त्याबद्दल कॉलेजमध्ये शिकवले जाणारे सोडून आपल्याला त्या शिक्षणाशी निगडित असलेल्या क्षेत्राची माहीत असलेली सर्व Information.

Example घ्यायचं तर सर्वांना परिचित असणारे Agri हे क्षेत्र यात कसे आपल्याला शिक्षणा व्यतिरिक्त किंवा शिक्षणाशिवायही बऱ्याच गोष्टी माहीत असतात,तसेच विविध Streamसाठी हे Basic knowledge आपल्याला हवं आहे.

Written by
©®Bharat.L.Sonawane.
MBA-Production and Operations.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...