फुलांची कविता झाली..!
फुलांनी वाहत्या पाण्यात वाहणं शिकुन घ्यावं आता,
दरवळास त्याच्या हुंगले कित्येक जणांनी,
करार आयुष्याशी जगण्याचा त्यांनी करून घ्यावा आता..!
भ्रमर तो फिरतसे गुलकंदाची ओढ त्यास आता,
गंध कित्येक शोषले परागकणांशी,
भरारी घेण्या पंख त्याचे आसमंताशी धजावती आता..!
रुळले न रुळावे फुलझाडांनी आता,
अभिषेक तो व्यर्थ न व्हावा,
फुलांचा संगतीचा पानांशी व्यवहार मात्र आता..!
हीतगुज फुलांशी घालू मी बघतो आता,
झाडांनी नाकारले मज देण्यास,
झाडांनी देण्याचा अन् मी घेण्याचा करार संपला आता..!
फुलांशीच लगट ही करायची होती आता,
संवाद पांकळ्यांशी नेहमीचाच होता,
बिखरले बहुत काही अन्
झाडांनी स्विकारले माझ्याशिवाय जगणे आता..!
फुलांनी वाहत्या पाण्यात वाहणं शिकुन घ्यावं आता,
दरवळास त्याच्या हुंगले कित्येक जणांनी,
करार आयुष्याशी जगण्याचा त्यांनी करून घ्यावा आता..!
Written by,
Bharat Sonawane.
अतिशय सुंंदर कविता ...
उत्तर द्याहटवाअतिशय सुंंदर कविता ...
उत्तर द्याहटवाअतिशय सुंंदर कविता ...
उत्तर द्याहटवा