मुख्य सामग्रीवर वगळा

एक होता कार्व्हर..!


सध्याच्या वास्तव परिस्थितीवर भाष्य करु बघणारं "एक होता कार्व्हर" हे पुस्तक आहे....

वीणा गवाणकर लिखित एक होता कार्व्हर वाचलं अन्  सध्याच्या या वाईट परिस्थितीला मानव कीती कारणीभूत आहे हे कळुन चुकलं.मुळात पुस्तकाचा हा विषय नाही पण माझ्या नजरेतून जेव्हा मी हे पुस्तक वाचत आहे तेव्हा विचार करण्याच्या व्रृत्तीला हा काळ डोळ्यांच्या सामोरा येताना दिसला....

शतकाचा महानायक ठरवता येईल असा तो "कार्व्हर" त्याच्या संघर्षपूर्ण काळात महानायक ठरलाच पण त्यानंतर मात्र हे कसब क्वचित,हातावर मोजता येईल इतपत लोकांमध्ये दिसून आले म्हणून आजही कार्व्हर माझ्या दृष्टीने महानायक ठरतोय...

आज जगाच्या पाठीवर जो देश सत्ता गाजवतो तो महासत्ता असलेला देश अमेरिकेला तिथे असलेल्या निर्जीव दक्षिण प्रदेशाला अमरत्व देणारा महामानव म्हणजेच "कार्व्हर"
निष्काम कर्मयोगी हे पदवी ज्याच्या कर्तुत्वाशी जुळते असा तो  कार्व्हर...
"शून्यातून विश्व निर्माण करणे" हा वाकप्रचार  ज्याला लागू पडतो तो कार्व्हर ज्याच उभ आयुष्य जगण्यासाठी असलेला संघर्ष त्याचा प्रवास हा त्या वाईट काळातही मानवतावाद जपून ठेवण्यास कारणीभूत ठरला. त्यामुळेच मानवतावादावरचा विश्वास अजून घट्ट झाला अन् अमेरिका सारखा देश महासत्ता म्हणून उदयास आला...


अश्या या सामान्य पण विचारांच्या पलिकडेचे जीवन जगलेल्या कार्व्हर जगासमोर आणण्याच काम विणा गवाणकर यांनी मराठी भाषेत पुस्तक रुपात अवघ्या देशासमोर आणलं कार्व्हर यांच्या बद्दल जाणुन घ्यायला वाचायला जेव्हा आपल्याला इतकं सुंदर वाटतं तेव्हा विणा गवाणकर यांना कार्व्हर यांचे जीवन आपल्या शब्दात उत्रवणे ही भावना खूप सुखदायक आहे...


कार्व्हरांचं चरित्र आपल्याला बरंच काही शिकवून जातं. आजच्या आमच्या गोंधळलेल्या पिढीसाठी ते फक्त प्रेरणादायी नव्हे तर एक उत्तम मार्गदर्शक पण ठरु शकतात. ध्येय म्हणजे काय याचं उत्तर कार्व्हरांची जीवनगाथा वाचली कि उमगउमगत...

Written by,

Bharat Sonwane....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...