मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आयुष्याची गणितं..!

आयुष्याची गणितं..! पहाटेच्या कुडकुडणाऱ्या थंडीचा प्रवास दुपारच्या सुमारास,साधारण बाराच्या ठोक्याला रांनवाटेला अनवाणी पायांना तापलेल्या मातीच्या फुफाट्यात सावलीच्या आधाराने पावलांना सावरत-सावरत चालत राहायचं... सावलीत पावलांना सावरणे असतेच,पण नशीबाला आलेला कडक उन्हाचा पारा काही आयुष्यभर सोबत न सोडणारा असतो.उपरण्याने जितकं होईल तितकं सावरत जिथवर उन्हाच्या झळाया डोळ्यांना दिसतात,तिथवर सीमा ठरवून चालतं व्हायचं,कश्यासाठी चालतो आहे माहीत नाही किंवा याला उत्तरही शोधायचं नसतं... एका अंगाला परतीच्या वाटेचा खापरीचा रस्ता दिसतो,अर्धवट वाहत्या पाण्याने भरलेला,गुळगुळीत झालेल्या दगड धोंड्यांचा  नितळ,पारदर्शी वाहत्या पाण्याचा चेहऱ्यावर ते थंडगार पाणी घेऊन बकर्याच्या खुरांनी रस्त्याची मोकळी झालेली मुतरट वासाची मातड,मातीचा फुफाटी चेहऱ्यावर अनुभवायला येते. ती खसाखसा हातानी घासून धुवून टाकायची नायतर,रात्रीची झोप ती येऊन देत नाय अन् सारे गाल टराटर उलून अंगाला झोंबायला लागते ... एकूण हिवाळ्याच्या दिवसात हा गाव रहाटीचा जगण्याचा तोरा काही अलगच आहे,असतो.साल दर साल परसाकडच्या मुंज्याला बोनं ...

एकावेळी दोन आयुष्य जगणारी माणसं..!

एकावेळी दोन आयुष्य जगणारी माणसं..! खिडकी पल्ल्याड असलेल्या जगाला अलिकडे कित्येकदा निरखून बघत असतो.जसं मन अस्तित्वाच्या शोधार्थ भटकंती करायला लागलं आहे तसे हे खिडकी पल्ल्याड असलेलं जग खिडकीतून न्याहाळत असताना मला छान वाटायला लागलं आहे..! कुणाच्या आयुष्यात खूप सर्व उजेड असल्यानं त्याचं आयुष्य खूप सुखाचे क्षण देऊ करणारं किवा प्रकाशमान झालेलं मला भासू लागलं आहे. सोबतच अनेकांच्या आयुष्यात ठरलेला तो कायमचा अंधार आणि काळोखात माखलेले त्यांचे आयुष्य बघितलं की,आयुष्याला घेऊन आपण उगाच अनेक नको त्या अपेक्षा करत बसतो याची प्रचिती होते..! अलीकडे खिडकीत बसून अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे एकाग्र चित्ताने बसलं की आपोआपच सुटतात,त्यामुळं हे विंडोग्रीलच्या आधाराला बसून बाहेरचं जग न्याहाळणे आवडायला लागले आहे मला हल्ली..! खूपवेळा विंडोग्रीलच्या आधाराला बसून असले की,अश्या काळोखाच्या रात्री स्ट्रीटलाईटच्या उजेडाखाली आयुष्य जगणारी माणसं मला खूप आवडतात.ते त्यांचे जीवन एका स्वतंत्र आयुष्यात जगत असतात,स्वतंत्र म्हणजे असे एकाच वेळी दोन आयुष्य,एक दाखवण्याचं अन् एक त्यांच्या विचारात विचार करत आपल्याच कोशा...

आयुष्य आणि क्युबिकल..!

आयुष्य आणि क्युबिकल..! पावसाच्या अधूनमधून रिमझीम सरी कोसळत आहे,शहरावर धुक्यांची शाल पांघरली गेली आहे,संपूर्ण शहर धुकमय झालं आहे,आकाशातील ढगांना हात लावून अनुभवता येतंय,सोबतीला गुलाबी थंडीचा गारवाही अनुभवतोय यातच माझ्या नशिबाने मला मिळालेलं आसपासच्या हाकेच्या अंतरावर मिळालेलं निसर्ग सौंदर्य जे डोळ्यात कित्येकवेळा साठवूनही माझी भूक क्षमली नाहीये..! कुणाला कसली भूक असते तर कुणाला कसली आमचा बाबतीत आम्हाला अश्यावेळी निसर्गाच्या सान्निध्यात राहून मनसोक्त जगायला हवं असतं,बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा हे जग अनुभवलं..! मी नेहमीच म्हणत असतो,शहराच्या चकमकीच्या फ्लेक्सच्या दुनियेत, ऑफिसच्या क्युबिकल्समध्ये आपण आपलं जगणं बंदिस्त करून घेतलं आहे.खरच आपण निसर्गाशी संवाद साधायला अन् त्याच्याशी एकरूप व्हायला विसरलो आहे..! आपला प्रवास कधीचाच उलट्या दिशेने सुरू व्हायला हवा होता पण अजूनही कुणीतरी दुसरा तिसरा व्यक्ती शहर की और चलो..! चा नारा देतो आणि आपल्या गावाच्या प्रती,निसर्गाच्या प्रती जाग्या झालेल्या जाणिवा जाग्या होण्या आधीच मारून टाकतो आहे..! व्यवहार कुणाला चुकत नाही ते आपल्यालाही चुकणार ना...

Mindset..!

Mindset..! गेले काही दिवस एक अनामिक हुरहूर लागून असते,आयुष्याच्या किंवा वयाच्या या टप्प्यावर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत असेल असेही वाटून जाते आहे.इथून पुढे मी जे काही पोस्टमध्ये लिहणार आहे,त्या बाबतीत अलीकडे मी खूप विचार केला अन् आज नकळत अस्वस्थाच्या दाटलेल्या वेळी हे लिहायला घेतले..! आयुष्यात आपल्याला काय हवं आहे..? आणि काय नको आहे..? याची वजाबाकी,बेरीज आपण आयुष्यभर जगत असताना करत असतो.आपलं संपूर्ण आयुष्य भटकंती करत,आपल्याला अपेक्षित जे काही क्षण आहे ते मिळवण्यासठी आयुष्यभर आपण वणवण करत असतो.जन्म ते मृत्यू या रोलर कॉस्टरमधील अदभुत अनुभव देणाऱ्या प्रवासातील अनेक वळणांच्या या रस्त्यावर हे सर्व क्षण आपल्याला अनुभवता येत असतं..! या प्रवासात अनेक वळणं येतात,अनेकदा आपण कोलमडून जातो तर अनेकदा आपण इतक्या एका उंचीच्या ठिकाणी जावून पोहचतो की,काहीही करायचे असते अश्यावेळी तो इतरांचे काय हा इतरवेळी पहिले येणारा विचार आपल्या मनात अश्यावेळी येत नाही.तो आपण करायला सोडून देतो (माझ्याबाबतीत असं होवू शकत नाही)... तर गेली दोन वर्ष आयुष्यातील अस्वस्थतेचा काळ अनुभवतो आहे,म्हणजे यातील तिसरी अवस्थ...

एक अनोखं विश्व..!

एक अनोखं विश्व..! एक अनोखं विश्र्व..! जोवर ठरवलेल्या गोष्टी मनासारख्या होत नाही तोवर आपण ठरवून काहीही केलेलं ठीक होत नसते किंवा कुठल्याही त्या गोष्टीसाठी जी आपल्याला करायची असूनही,तूर्तच करायची नसते तरीही आपण करत असतो ती कधीतरी पूर्णत्वाकडे किंवा पूर्णही होते पण मनातून ती गोष्ट करायची नसते,तेव्हा त्या पूर्ण झालेल्या गोष्टीसाठी आपल्याला कुठलही सोयरसुतक नसते..! आपण अनेकदा चालता बोलता म्हणून जातो की मनाच्या विरोधात जावून खूप काही आपण करू शकतो किंवा करायला हवं पण जेव्हा मनाच्या विरोधात जावून आपण काही गोष्टी करत असतो अन् त्यात जरी आपल्याला यश मिळत असेल,तरीही मनाला हवं असलेलं समाधान त्यातून आपल्याला भेटत नसते..! अगदी आपण ठरवूनही किंवा मनाला कित्येकवेळा मारून त्याच्या विरोधात जावून कुठल्याही गोष्टी केल्या ज्या आपल्याला किंवा आपल्या स्वभावाला योग्य वाटत असल्या तरीही मनाला त्या पटत नसेल तर मानसिक समाधान आपल्याला मिळत नाही.हळूहळू अश्या गोष्टींचा किंवा मनाला समाधान भेटणार आहे,अश्या गोष्टी नाही भेटल्या की आपण आपोआपच मानसिक तणावात जातो अन् मानसिक आजाराचे निदान आपल्याला होते.यासाठी आपल्य...

गाव माझा..!

गाव माझा..! पहाटेची थंडी आता दिवसेंदिवस वाढत आहे.जसजशी पहाट होते तसतशी पहाटेची साखर झोप आधिकच गडद होत जाते पण पहाटेच्या साखर झोपेसोबत सवयीच्या झालेल्या काही आवाजाने मात्र मन सभोवतालच्या वातावरणातील बदल अन् कानावर पडणारे सगळेच आवाज गोधडीत पडूनही कितीवेळ ऐकत बसलेलो असतो..! पूर्वेच्या दिशेने खिडकीच्या फटीतून येणारी सूर्याची कोवळी किरणं,पहाटेच्या कोवळ्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात रस्त्यावर निपचित पडलेली कुत्रे,पहाटेच उठून त्यांच्या पिलांची सुरू झालेली ओरडायची स्पर्धा.तारेवर भरलेली असंख्य पक्षांची शाळा,त्यांचं एक लईत ओरडत आसमंताला साद घालणं,बैलगाडीचा इतक्या पहाटे शेताकडे जातांना चाकाला लावलेल्या गुंघराचा येणारा आवाज..! मंदिरात उत्तरार्धकडे वळालेला काकडा,शेवटचा अभंग,शेवटची गवळण,शेवटची आरती,पसायदान,घंटेचा नाद,कपुरचा सुगंध,कपाळी लावलेला बुक्का,अष्टगंध,चंदन गंध,म्हाताऱ्या आजोबांचे पांढरे धोतर त्याला येणारा कस्तुरीचा सुगंध,अन् आजोबांच्या चेहऱ्यावर असलेले भक्तिभाव..! आजोबांच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हरी भक्तित त्यांचं रमून जाणे अन् त्यांची ती इच्छा..! झाला शेवट हा गोड ...

आयुष्य हरवलेल्या माणसांची गणितं..!

आयुष्य हरवलेल्या माणसांची गणितं..! आयुष्यात आयुष्याला घेऊन रिकामपण आलेली माणसं आपल्या आयुष्यातील आठवणींवर आपल्या दिवसातील २४ तासातील जवळ जवळ ७०% दिवस हा आपल्या भूतकाळातील आठवणींवर जगत असतो.उरलेल्या ३०% दिवस तो फार फारतर ५% झोप घेत असतो अन् उरलेल्या २५% दिवस मधील  १५% दिवस तो उद्याचे आपले उज्ज्वल आयुष्य आणि सगळं सोईनुसार नाही झालेच तर ठोखरा खात आपण जगत असलेलं भविष्य काळातील आयुष्य डोळ्यांसमोर कल्पनेत बघत असतो.त्यात राहिलेला १०% असलेला दिवस हा फक्त वर्तमान काळातील आयुष्य फक्त तो जगत असतो. त्यातही बराच वेळ तो फक्त अनेक गोष्टींशी,अनेक तर्क वितर्क लावण्यासाठी घालवत असतो... हे असं आयुष्य जगणाऱ्या माणसांच्या आयुष्यात शक्यतो फारसे बदल होत नाही अन् झालेच तर ते खूप हळुवारप्रमाणे होतात.इतके हळुवार की त्याला सुद्धा या भविष्यातील येणाऱ्या सुखाची चाहूल होत नसते.या सुखासाठी सुद्धा त्याला आपण भोगत असलेले एकाकीपण अन् आपलं हे हळुवार आयुष्य योग्य अन् कारणी लागत आहे असं वाटत असते..! या माणसांना शक्यतो कुणाचा सहवास नकोसा वाटतो,अंधार हवाहवासा वाटतो.पहाटेचा सूर्योदय कधीतरी यांच्या आयुष्यात पु...

Aurangabad Industrial Hub City..!

Aurangabad Industrial Hub City..! औरंगाबाद शहर अन् औद्योगिक वसाहतींचे जुळून आलेले समीकरण..! औरंगाबाद शहर अन् औद्योगिक वसाहतीबद्दल यापूर्वी मी अनेक लेख लिहले,जे औरंगाबाद शहर सोबतीने त्याचा इतिहास अन् साधारण पाच दशकांपूर्वी काळानुरूप ऑटोमोबाईल क्षेत्रात औरंगाबाद शहराने धरलेलं बाळसं आता याच क्षेत्रात संपूर्ण जगतात ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक महत्त्वाचं शहर म्हणून झालेली ओळख हा औरंगाबाद शहराचा चढता आलेख मी माझ्या लेखणीतून नेहमीच आपल्या समोर लिखित स्वरूपात उपलब्ध करून देत आलो आहे... एकीकडे औरंगाबादमध्ये उज्ज्वल भविष्याचा विचार करून,नव्याने डीएमआयसी अंतर्गत निर्माण होणारे नवीन प्रकल्प,अलिकडेच पूर्णत्वास आलेली ऑरिक औद्योगिक वसाहत आणि शहराला जोडुन असलेल्या चिकलठाणा एमआयडीसी,शेंद्रा एमआयडीसी,वाळूज एमआयडीसी,चितेगाव परिसरात असलेली जुनी एमआयडीसी यांच्या माध्यमातून औरंगाबाद शहराला "ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल हब" सिटी ही मिळालेली नवी ओळख आहे... औरंगाबाद शहरात उपलब्ध झालेला रोजगार आणि एकीकडे कोरोनाच्या काळात उद्योग विश्वात झालेला बदल,नवीन रुजु झालेल्या संकल्पना अन् पुन्हा एकदा आता औरंगा...

गुपित आयुष्याचे..!

गुपित आयुष्याचे..! मी माझा एकाकीच बरा होतो,अलिकडे गेले काही दिवस माणसांच्या सहवासात होतो अन् आता जेव्हा पूर्वापार असलेला मीच मला पुन्हा नव्याने भेटलो तेव्हा माझी मलाच विचार करायला लावणारी माझी मलाच पुन्हा एकदा नव्याने भेट झाली.त्यावेळी खूप काही चुकल्यासारखे वाटत होते अन् ते खरेही आहे,गेले काही दिवस खूप काही हातचे सुटून गेल्यासारखे झालं आहे,मला वाटतं आहे..! अस्ताला जाणारा सूर्य,सूर्याच्या साक्षीने जेव्हा सायंकाळची भटकंती रोजच नियमाने होत असायची,तेव्हा मी निसर्गातील सजीव असून निर्जीव असलेल्या झाडांना,फुलांना,दगडांना,डोंगरदऱ्यांना बोलतं करत होतो,तेही माझाशी संवाद साधत असायचे. या अवस्थेला यायला मला जवळ जवळ दोन वर्ष लागली होती,माणसांशी माणसे बोलतात पण माणसांनी या निसर्गातील या निर्जीव गोष्टींशी संवाद साधायला,संवाद करायला नको का..? म्हणून पांथस्थ होवून माझं विश्व अन् मी त्यांच्यात समरस होऊन हे सर्व अनुभवत होतो... पण पण...! गेले काही दिवस पुन्हा या माणसांच्या दूनियेशी संबंध आला अन् गेले दोन वर्ष जे एकांतांच्या सान्निध्यात राहून मी निसर्गाशी एकरूप झालो होतो ते कुठेतरी या महिना-पंधर...

After long time Cricket..!

After long time Cricket..! #Afterlongtime..! आता सध्या मला असलेलं रिकामपण अन् लहानपणीची दोन्ही हातांवर मोजता येईल इतकी मित्र सध्या रोजच्या माझ्या आयुष्यात सोबती असल्यानं आयुष्यातील काही आठवणींना उजाळा दिला जातोय.होय,तब्बल नऊ ते दहा वर्षांनी पुन्हा एकदा क्रिकेटची बॅट हातात धरली आहे,गेले आठ-पंधरा दिवस वेळ भेटल तसं खेळत असतो.... आता पूर्वीसारखं खेळता येत नाही पण आयुष्याच्या या वळणावर जसं समजून घेणारी ही मित्र भेटली आहे अगदी तितकंच अन् तसच क्रिकेट मध्येही ती सांभाळून घेतात... १३-१४ व्या वर्षी आमच्या टीमचा असलेलो मी युवराज आता खरंच नाही खेळत पहिल्यासारखं,पहिल्यासारखे सहज बाँड्रीपार सिक्स नाही जात माझ्याकडून किंवा नाही टीमच्या अडीअडचणीवेळी विकेट घेऊन टीमला संकटातून तेव्हाच बाहेर काढता येतं मला आता.आता एक छान आहे हेच मित्र समजदार झाल्यानं समजून घेतात हल्ली अश्यावेळी मला... सुरुवातीच्या चार-पाच दिवस तर हातात धरलेली बॅट पहिल्यासारखी घुमवतासुद्धा येत नव्हती,की बाँड्रीत गेलेला बॉल बॉलरपर्यंत सुद्धा फेकता येत नव्हता,हात खांद्यापासून दुखायला लागायचा. फिल्डींग करतांना कित्येक हातातल्या क...

सिमांतनी भाग ५

सिमांतनी-भाग - ५ सिमांतनी- भाग ५. कोजागिरी होवुन आठ दिवस सरले होते,अश्याच एका अंधाऱ्या रात्री सिमांतनीच्या पोटात एकाकी कळा येऊ लागल्या सिमांतनी अंथरुणाला रेटा देत त्या कळा सहू लागली होती... अंधारी रात्र अन् गोठवलेली थंडी यामुळे तिची अजूनच जास्तीची अबळ होत होती,इतक्या सर्व थंडीतही तिला धरधरुन घाम फुटला होता,सर्व अंग घामाने घामेजलेलं झालं होतं.तिची ही अवस्था बघून तिच्या पायथ्याशी झोपलेली तिची सासुबाई जागी झाली अन् तिच्या बाळंतपणाचे शेवटचे दिवस तिच्या नजरेसमोरून तरळुन गेले... तिला हे कळुन चुकले होते की होणारा त्रास हा तिचा अन् बाळाच्या जीवाशी खेळणारा ठरु शकेल,म्हणुन तिला ज्या काही उपाययोजना करता येईल त्या तिनं केल्या.या उडालेल्या धांदलीत सिमांतनीचा दादला उठला त्याला हे सर्व नवं असल्यानं सिमांतनीकडे पाहून त्याला अपराधी वाटु लागलं,तो स्वत:ला कोसत होता,जीवाचा त्रागा करत होता काळोखाची असलेली मध्यरात्र सरता सरेनाशी झाली होती,होणाऱ्या प्रसववेदना मिनिटागणिक वाढु लागल्या होत्या... ही सर्व धांदल ऐकून ओसरीत झोपलेला सिमांतनीचा सासरा कचाकच शिव्या देत मधल्या घरात आला अन् डोळ्यासमोर असलेली ...

कविता माझ्या आयुष्याची..!

कविता माझ्या आयुष्याची..! स्वप्नांशीच मी बांधील राहिलो, कल्पनेतले सत्यात ते कितपत उतरले स्वप्न, कल्पनेतल्या स्वप्नांना सत्यात उत्रविण्या, मग मी झुरतच राहिलो..! बंदिस्त खोलीत मी माझ्याच राहिलो, खोलीत उतरले ते कितपत किरणं, कावड फटीतून येणाऱ्या आशेच्या तिरीपेस, मग मात्र मी बघतच राहिलो..! उन्हं कावडा पल्याडची अन्  सावलीस मी सहवत राहिलो, कुणी वार केला मग कावडावर, त्या भीतीनं मात्र मी कडी-कोंड्याच्या आत  मलाच मग बंदिस्त करत राहिलो..! ठेचकाळल्या चौकटीवरील बिजागिरी जश्या, असे वाटते की, घाव माझ्यावरीच झाले ते दगडांचे, अन् मग काय, माझ्याच आयुष्याला घेऊन मीच मला, बरबाद होतांना बघत राहिलो..! रक्ताळलेल्या हातांकडे माझ्या मी बघत राहिलो, हातांनी हातांशीच तो मागण्याचा करार केला, जेव्हा वार झाले,तेव्हा सावरले किती, तेव्हा हाताकडे बघुनच मग मी, माझ्या आयुष्याचीच गोळा बेरीज करत राहिलो अन् मग पुन्हा पुन्हा उद्याच्या उज्वल भविष्यासाठी मी भिकच मागत राहिलो..! Written by, Bharat Sonwane. Written by, Bharat Sonwane.

Travel Diary - कास पठार...!

Travel Diary - कास पठार..! बरेच दिवस झालेत निसर्ग भ्रमंतीपर कुठलेही लेखन करू शकलो नाही.कित्येक दिवसांचा मनात विचार चालू होता की,"कास पठार" विषयी लेखन करावं,परंतु हा केलेला विचार सत्यात उतरत नव्हता... कारण सोबतीला अनेक प्रश्न होती काय लिहावं..? कुठून लिहावं..?, सुरुवात कुठून करावी..?,माझ्या माहितीपर लेखातून कास पठार बघणाऱ्या पर्यटक वर्गाचं समाधान होईल का..? असे अन् अनेक प्रश्न होती... कारण "कास पठार" म्हंटले की तिथलं रम्य वातावरण अन् तिथले जग प्रसिद्ध अनेक सर्व नाजूक नजाकत असलेली फुले,झाडे,वेली,वनस्पती या सर्वांच्या सौंदर्याला न्याय मिळायला हवा असतो."कास पठार" हे त्याच्या विशेष गोष्टींमधून नेहमीच लक्षात असते,मग मी नेमकं काय लिहावं हा विचार गेले कित्येक दिवस करत होतो... तर चला आता पावसाळा परतीच्या वाटेवर आहे अन् हिवाळा आपल्या उश्याला येऊन ठेपला आहे,गेले तीन-चार दिवस पहाटे थंडीचा पारा चढता आहे.यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रभर समाधानकारक पाऊस पडला असल्या कारणाने,सर्वच निसर्ग हा हिरवी शाल पांघरून आपल्या सौंदर्याची मुक्तपणे उधळण करत आहे... नद...

गाव पोरका झाला..!

गाव पोरका झाला..! पितृपक्ष संपला पण पितृपक्षातील उन्हं अजूनही पहाटेच्या पहारे शरिराची काहीली काहीली करून जात आहे.अश्या या भरउन्हात पहाटे दहाच्या सुमाराला गावच्या जुन्या येशीतुज जाणं होतं,येशीत मधोमध असलेल्या मुंज्याला शिवनामायचे पाणी तांब्यात आणून त्याला न्हांनुंन घेतलं,कपूरची एक वडी तिथं जाळली की त्याचा येणारा सुगंध अनुभवत,यशीत डोकं टेकवून उतरतीच्या दिशेनं पावलं चालू लागली..! गावातले गुरखे रानाला,डोंगराला,धरण पाळेला असलेल्या हिरव्या कुरणाच्या रानात गाय,म्हशी,बकऱ्या चरायला घेऊन निघाले.डोईवर बांधलेलं उपरणे,कंबराला बांधलेली छोटी कुऱ्हाड,तारेच्या पिशीत भाकरीचं पेंडकं अन खांद्यात अडकवलेला रेडू घेऊन येशीतून रांनच्या वाटेला लागलं की त्यांना न्याहाळणं होतं,दूरवर त्यांच्या पावलांनी उधळलेली धुळ आसमंतात त्यांचं सकाळच्या प्रहरी अस्तित्व निर्माण करते... गावच्या नव्या तरण्या सुना हौसे खातर नदीच्या तीरावर धुने धुवायला म्हणून निघायच्या,येशीतून दहाच्या सुमाराला यांचा ऐकू येणारा गलका.नदीच्या तीरावर गुळगुळीत झालेल्या दगडांवर धुणे धुण्याचा येणारा आवाज अन् ऐकायला हव्या अश्या त्यांच्या गप्पा,मा...

जगणं औद्योगिक वसाहतीचं..!

जगणं औद्योगिक वसाहतीचं..! औद्योगिक वसाहतीत काम करणारा मजूरवर्ग अन् माझे नाते मला नेहमीच खूप जवळचे वाटत आले आहे,का..? माहित नाही. औद्योगिक वसाहतीत गेलो की,माझी नजर नेहमीप्रमाणे त्या माझ्या प्रत्येक जवळच्या मजूर मित्रांना शोधत असते.कारण या प्रत्येक मित्राच्या आयुष्यामागे प्रत्येकाची एक वेगळी कथा असते,त्यांचं जीवन न अनुभवतासुद्धा फक्त पारखायची कुवत असलेली नजर असली की आपण त्यांच्या या जीवनाशी संवाद करू लागतो... मला शेतकऱ्याच्या जीवनापेक्षा काही अंशी का होईना यांचं जीवन खूप कष्टी अन् खूप काही सोसायला लावणारे वाटते.म्हणजे शेतकऱ्याचा संघर्ष काही कमी नाही तोही मी अनुभवला आहे,पिढीजात शेतकरी असल्याकारणाने पण आता सध्याची परिस्थिती बघता एकर दोन एकर शेती असलेल्यांनी शेती न केलेलीच मला योग्य वाटते,कारण शेतीत कुठलाही ताळमेळ उरलेला नाही... असो शेती हा माझा आजच्या लिखाणाचा विषय नाही, औद्योगिक वसाहतीत गेलं की काही ठराविक वेळेला तुम्हाला कावर्याबावर्या करत फिरणाऱ्या तरुणांच्या नजरा तुम्हाला दिसतील,अर्धवट शिक्षण झालेल्या अन् अलीकडे बऱ्यापैकी सुशिक्षित असलेला तरुणही यात असतो... पर्याय नाहीये का...

सिमांतनी भाग - ४

सिमांतनी - भाग-४ सिमांतनी - ४ सिमांतनीचे नऊ महिने नऊ आठवड्यासारखे सरून गेले अन् ऐन बोचनाऱ्या थंडीत सिमांतनीचे दिवस भरले असल्याचे गावच्या सुईनीने सांगितले.सिमांतनी आता कुठल्याही वखताला बाळंत होईल,हे सहा बाळंतपण झालेल्या तिच्या सासुबाईला कळलं... आता मात्र सिमांतनीच्या दादला असलेला जो एकुलता एक मुलगा असा तरी या पहिल्या खेपेला सिमांतनीला व्हावा अन् तिला देवानं मोकळं करावं अन् मलाही हा नातूच व्हावा म्हणजे मी डोळे मिटायला मोकळी,असं सिमांतनीची सासू सांच्याला भांडे घासत स्वतःशीच बडबडत होती... सांच्याला जेवणं आवरून,सिमांतनीची सासू भांडे घासून तिने,सिमांतनीला अंथरूण टाकून दिलं. थंडी खूप असल्यानं अन् शेणानं सांजवेळी सारलेल्या भिंती असल्यानं घरात अजूनच हुडहुडी भरून आल्यासारखे तिला वाटत होते.तिच्या सासूने तिला खाली अंथरायला दिलेली घोंगडी चांगली उबदार असल्यानं तिनं गरमट धरली होती अन् अंगावर पांघरूण म्हणून लेपड्याची केलेली गोधडी अंगावर असल्यानं आता तिला बर वाटत होतं... सासरा महुरच्या पडवीत टाकलेल्या खाटेवर खोकत-खोकत बिड्या फुंकीत सिमांतनीच्या सासुबाईच्या आई-बापाच्या नावाचा उद्धार करत होता...

सीमांतनी भाग-३

सिमांतनी भाग-३ रात्रीची भाकर खावून झाली अन् सिमांतनीने भांड्यांचा गराडा परसदारच्या अंगणात घेऊन ती भांडे घासायला बसली.तिच्या जोडीला आता सासूबाई भांडे नारळाच्या काथीने रखुंड्यात घासून देत होती अन् सिमांतनी ते भांडे हिसळून भांड्याच्या घमिल्यात टाकत होती... एरवी सिमांतनीचा सासरा बाहेर टाकलेल्या लाकडी बाजीवर खोकलत निपचित पडला होता,बिड्यांच व्यसन आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजण्यापर्यंत त्याला घेऊन आलं होतं.तो चेहऱ्यानं पार कृश झाला होता,काळा पडला होता,खोकून खोकून पार छातीचा भाता झाल्यागत त्याची छाती उघडी पडली होती... सिमांतनीच्या दादल्याने मधल्या घराच्या वळकटीत चटई अंथरली अन् गादी टाकून,अंगावर गोधडीचे पांघरूण घेऊन तो दिव्याच्या उजेडाकडे तर कधी त्याच्या सावलीकडे बघत सिमांतनीची वाट बघत लोळत पडला होता... दिवसभराच्या बकऱ्या राखणीच्या कामामुळे त्याला त्याच्या बायकोशी बोलायलासुद्धा फुरसद नसायची अन् रानात दिवसभराचा वखत कसा निघुन जातो याचीही त्याला कल्पना यायची नाही... अलिकडे सिमांतनीच्या या अडेलतडेल दिवसांत मात्र त्याला आपली तिला वेळ न देण्याची चुकी कळू लागली होती अन् तिला कमीतकमी या दि...

सिमांतनी भाग-२

सीमांतनी भाग-२ अस्ताला गेलेला सूर्य अन् पूनवेचा उगवता चंद्र,कोरा चहा घश्याखाली नेऊन सोडला अन् सिमांतीने दोन्ही हात टेकवत वाढलेला पोटाचा घेर सावरत पडवीत ठेवलेल्या चहाच्या कपांना अन सकाळपासून सांजवेळेपर्यंत पडलेल्या भांड्याच्या गराड्यास मोकळ्या परसदारच्या अंगणात घासायला म्हणून घेऊन आली. पोटूशी बाई असल्यानं चिरायची कामं सबबीने तिची सासूबाई तिला करू देत नव्हती यामागे काळजी कितपत होती अन् विचारांची अंधश्रद्धा किती हे कळून चुकलंच होतं.त्याला पर्याय नव्हता काही का असेना काही कामांपासून सिमांतनीची तूर्ताच तरी सुटका झाली होती... सिमांतनी मोकळ्या अंगणात भांडे घासत बसली होती,मनात आपल्या बाळाचा चालू असलेला विचार अन् बाळासाठी असलेला आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टच दिसत असायचा,भांडी हिसळत असतांनाचा आवाच अंगणातुन महुरच्या घरापर्यंत जायचा अन् भांड्याचा आवाज जसजसा वाढायचा तसतसा सिमांतनीच्या दादल्याच्या चकरा काळजीने आत बाहेर चालू असायच्या... घमील्यात असलेल्या पाण्यात पूनवेचा उगवता चंद्र हलत्या पाण्यात हलताना तिला दिसत होता,कित्येकवेळ त्याला न्याहाळत ती भांडे घासत राहिली.दिवसभरच्या कामामुळे तिच...