साधारण साडेपाचची ठरलेली वेळ नेहमीप्रमाणे ऊन असो,पाऊस असो, वारा,थंडी असो पण ही वेळ कधी चुकायची नाही वृत्तपत्र विक्रेत्याला ती कधी चुकतही नाहीच.मुळात या वृत्तपत्र मीडियाशी जोडून असलेले सर्वच निवांत झोप फार कमी घेतात प्रेसवाले सर्व मान्यवर,मित्र परिवार रात्रभर पेपर छापून त्या गरमा गरम पेपरच्या पार्सलला सर्व जिल्ह्यात वितरित करतो हे,वितरित करण्याचं काम अवघ्या चार ते पाच तासात पूर्ण जिल्ह्यात होत असते... तिथून पुढे जबाबदारी असते ती मग घरोघरी सायकलवर,गाडीवर,स्टॉलवर पेपर विकणाऱ्याची आपल्या वाचकाच्या हातात सकाळच्या गरम-गरम चहासोबत वृत्तपत्र त्याला कसे मिळेल हा प्रामाणिक हेतू समोर ठेऊन पहाटेचे हे काम सुरू होते... साडेपाचची वेळ स्वेटर,शूज घालून सायकलला टांग मारायची दोन किलोमीटर नाक्यावर पेपरची काळी-पिवळी गाडी पार्सल घेऊन पावणे सहाच्या दरम्यान येते.माझ्यासारखी अजून पाच-सहा पोरं,आमचा मालक सकाळी सकाळी कुठलाही दांगुडा न करता गाडीमधुन पार्सल काढायचे,व्यवस्थित रचायचे बारा वर्षापूर्वी आठवते जेव्हा सकाळ पेपर एक रुपयाला होता तेव्हा कन्नड शहरात सत्ताविसशे पेपर आम्ही रोज तीन तासात वाटत असा...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!