#डुंब्य्रावाडीचादुष्काळ.... भर दुपारची वेळ हाताला काम नसल्यामुळे परसदारच्या चौकटीतून नदीपल्याड दिसणाऱ्या दगडी पुलावर मी बसून होतो.चहूकडे कोरड्या वाऱ्याच्या सोसट्यात लाल मातीची धूळ आसमंताला भिडत होती,लाल मातीच्या उडण्याने अंगावर आलेल्या घामाला बकरीच्या मुत्रट मातीचा झोंबलेला वास येत होता.डोक्याला लावायला तेल नसल्यामुळे डोक्यातील केस पार जट झाल्यागत रुक्ष आणि वाऱ्यातून येणाऱ्या मुत्रट वासाच्या मातीने माखले होते. डोक्यातून येणारा घामाचा ओघळ कबरेच्या लवणातून खाली घरंगळत जाताना अंगाला जाणवत होता,घामाचा ओघळांनी सारा सदरा मळकट अन् सद्र्यावर कुत्रं मुतल्यागत झाला होता.हाताला नसलेलं काम अन् डोक्याला नसलेला ताण म्हणून मी येणारी जाणारी एखाद दुसरी गाडी न्याहाळत पुलावर बसलो होतो... गावाला यंदाच्या सालचा पडलेला दुष्काळ त्यामुळं माझ्यासगट सारा गाव रिकामाच होता.गाव,गावातील गडी माणूस रिकामा असून रिकामा नव्हता, कुणी चुल्हीला जळतंन आणायला भर पहाटच्याला बोडक्या झालेल्या टेकडीच्या वाटानं सरपण आणाया गेलं होतं.बायका काम नसल्यानं गप्पा झोडीत बसल्या होत्या तर कुणी शेवटच्या घटका मोजणाऱ्या हापशीवरून ...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!