या श्वासांना साठवणीचा छंद अजूनही
पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही...!
या श्वासांना साठवणीचा छंद अजूनही
पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही...!
शिंपडलेल्या अंगणामध्ये अजून बारीक ठसे
घर भरलेल्या हाकांनी मधून लागे पिसे...!
भिंतींना या जुन्या खडुचा रंग अजूनही
पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही...!
कशी पुसावी दिवसांवरली जुनी जुनीशी धुळ
पांघरतो मग रोज नव्याने हवीहवीशी झुल...!
हुंदक्यात या दाटून येते...!
हुंदक्यात या दाटून येते खंत अजूनही
पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही...!
काही गाणी,काही क्षण,काही समोर घडत असलेल्या गोष्टी बघितल्या की आपसुकच माझं बालपण मला आठवतं.फार नाही एक दहा-बारा वर्षांपूर्वीचे,अगदी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब,आदर्श कुटुंब जसं असावं तसे आमचं,ते आजही आहे...
जेव्हा आज,वेळी,अवेळी कधीतरी सांजसमयी अस्ताला जाणाऱ्या सुर्याबरोबर,कधी फार क्वचित वेळी सूर्योदय होताना,कधीतरी रात्रीच्या कातरवेळी मन विचारांवर हबी झालं की हे गाणं ऐकत असतो....
का कुणास ठावूक माहित नाही या गाण्याशी माझं कुठलं नातं आहे,की जे मला माझा भूतकाळ दाखवते.जे क्षण मी आता पुन्हा कधीच अनुभवू शकत नाही,ते अनुभवलेले क्षण या गाण्याने पुन्हा एकदा मी मनात ते सर्व आठवत जगत असतो.खरंतर आपल्या व्यक्तींसाठी आपल्याला काहीच लिहता येत नाही,व्यक्त होता येत नाही याची वेळोवेळी खंत वाटते...
माझं व्यक्त होणं कुठेतरी या गाण्यातून मलाच दिसून येतं....
एकूण काय तर छान असतात ते दिवस ज्यांना नवीन फुलणाऱ्या नात्यांचा सुगंध असतो.आई,बाबा,दादा,ताई अन् मी,या सर्वांचा मिळणारा तो एकत्रित सहवास.अन् आता अलीकडे जसजशी जबाबदारीची जाणीव होत गेली,कर्तव्याची जाणीव होत गेली तसतसे घरट्यातून पिलं उडून जावे तसं आपलं या विश्वात मुक्तपणे सैर करणं.
एक मात्र खरं आहे,व्यवहार कुणाला चुकत नाही,तो इथेही आड येतो...
व्यवहार,आर्थिक हे शब्द हल्ली नकोसे वाटतात पण माणसाच्या आयुष्याचे कोडे उलगडायचे असेल तर असे अवघड शब्द जवळ करावे लागतात...
या श्वासांना साठवणीचा छंद अजूनही
पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही...!
काय बोलावं या दोन ओळींच्या बाबतीत संपूर्ण जीवनप्रवास भेटतो मला माझा या दोन ओळीत....
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा