मुख्य सामग्रीवर वगळा

Chadar the ice Trail..!

Chadar the ice Trail..!

बऱ्याचवेळा काही आवडी निवडी या आपल्याला अनुभवायचा असतात पण ते साहस आपल्यात नसते किंवा ते सर्व इतिहासात जमा झालेले असते त्यामुळे हे सर्व आपल्याला अनुभवायला भेटत नाही किंवा आपल्या स्वभवताली ती परिस्थिती नसल्याने ते सर्व आपल्याला अनुभवता येत नाही....

लहानपणी आपल्या घरात टीव्ही आला परिस्थितीच्या मानाने तो सर्वांच्या घरी उशीरा आला त्यामुळे आपल्या नाईंटीजच्या मित्रांना टीव्ही बघण्याचे सुख काय असते अन् त्यासाठी मित्रांच्या घराचे झिजवलेले उंबरठे हे सर्व आपल्याला बऱ्यापैकी ज्ञात आहेत मुळात तो लिखाणाचा उद्देश नाहीच पण आजच्या टीव्ही बघण्यात अन् त्यावेळच्या टीव्ही बघण्यात झालेला बदल हा खूप वेगळा आहे,आवडीनुसार टीव्हीवरील चॅनल बदलण्यासाठी रिमोटचे बटन आपण दाबत असतो कुणाला न्यूज,कुणाला सिरियल, कुणाला Discovery,Net geo, कुणाला काय तर कुणाला काय कारण आता हे सर्व पर्याय उपलब्ध झाले आधुनिक युगाच्या चढत्या आलेखला ज्या वर्षांपासून सुरुवात झालेली ती वर्षांचे आपले जन्म म्हणून कदाचित हे सर्व आपण जवळून अनुभवले....

त्यावेळी एकच टीव्ही चॅनल मग त्यात वार,वेळ यांची सांगड घालून दूरदर्शन बग्यांचे लाड पुरवायचे.मला टीव्ही फार बघायला आवडत नाही तो आजही अन् पूर्वीही फारफार वयानुसार शक्तिमान,बोंगो, ज्युनियर जी,आँखे, व्योमकेश बक्षी, सी आय डी विजय,अश्या मालिका मी बघितल्या त्याही फार आवडीने नाही जसा मुड असेल तसा...
पण यासर्व सिरियल सोडल्या तर  कधीतरी महिन्यातून एखाद वेळेला लागणारी The Chadar Ice Trail नावाची डॉक्युमेंट्री अन् अशीच एक अजून असायची तिचे नाव मला आठवत नाही त्या मी बघायचो कुठल्या सिरियलमध्ये काही प्रॉब्लेम आलेत की प्रसारण न करू शकले तेव्हा या डॉक्युमेंट्री फिल्म लागत असायच्या अन् मी यांची खूप वाट बघायचो...
काळाच्या ओघात दूरदर्शन आपले बदल करत होतं त्याला जोडीला आता मेट्रो नावाचं चॅनल आलं पण ते फार दिवस टिकले नाही, सिरियलचा ओघ बदलला,जश्या प्रकारे आपल्या भाषेत प्रसिध्द असलेले पुस्तक विविध भाषेत अनुवादित करून ती वाचकांपर्यंत देश विदेशात पोहचवली जातात तशीच सिरियलची गत झाली अन् विविध देशातील,राज्यातील सिरियल डब करून आपल्या मराठी भाषेत येऊ लागल्या...

The Chadar Ice Trail नावाची डॉक्युमेंट्री वरून तुम्हाला कळले असेलच की माझा ओघ कोणत्या सिरियल, फिल्म बघण्याकडे असेल तर अश्याच प्रकारच्या अनेक सिरियल साधारण २००३-४,५ साली येऊ लागल्या अन् दूरदर्शने माझ्या सारखी आवड असणाऱ्या प्रेक्षकांची मने जिंकली त्यात काही सिरियल आजही मी बघतो जरी त्या टीव्ही माध्यमात आता उपलब्ध नसल्या त्यात मग Emperor of the sea,Jewel in the palace,Jungma,Earth Matters,The Paintings of  India, laurel and hardy,समुदर के लुटेरे या सिरीयल,डॉक्युमेंट्री असत यात मला सर्वाधिक आवडणारी The Chadar Ice Trail  ही डॉक्युमेंट्री आहे खूप म्हणजे इतकी की ती नेहमी लागत नसल्याने तिची वाट मी बघत असायचो....

 तर मग इतकं काय आहे त्या डॉक्युमेंट्रीमध्ये ते पुढील लेखमध्ये सांगतो तोवर पोस्ट केलेला व्हिडिओ बघा त्यावरून तुम्हाला बरेच काही समजेल....

Written by,
Bharat.L.Sonawane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...