"फकिरा"
लेखक - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ओळख मराठी साहित्यात सर्व प्रथम झाली ती "स्मशानातील सोनं" या कथेमुळे झाली आजही ही कथा कथेतील पात्र भीमा मनात इतके घर करून आहे की कित्येकदा वाचूनही वाचत राहावी अशी ही कथा आज तिला साजेशी "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे" यांची "फकिरा" ही कादंबरी वाचली...
"फकिरा" "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे" लिखित ही कादंबरी,१९६१ मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार फकिरा या कादंबरीला मिळाला.या कांदबरीत "फकिरा" नावाच्या तरुणाचे कथानक मांडले आहे. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारा "फकिरा" आणि त्याची शौर्यगाथा सांगणारी कलादृष्ट्या उत्तम अशी ही कादंबरी आहे....
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कादंबऱ्या लिहल्या,ज्यात जगण्यासाठी असलेला संघर्ष हा आहेच,कादंबरीला वि.स.खांडेकरांची यांनी दिलेली प्रस्तावना खुप सुंदर अन् पुस्तकाला बोलके करणारी आहे.प्रस्तावनेत ते म्हणतात,अण्णा भाऊंना प्रतिभेचे देणे आहे.शोषणाविरुद्ध बंड करणारे आण्णाभाऊ साठे.या कादंबरीच्या प्रस्तावनेत ते सांगतात,ही कादंबरी केवळ माझ्या प्रतिभेने निर्माण केली नाही.प्रतिभेला सत्याचे - जीवनाचे दर्शन नसेल,तर प्रतिभा,अनुभूती वगैरे शब्द निरर्थक आहेत,असा माझा अनुभव आहे.सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधारातील आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते.
अण्णाभाऊंच्या या "फकीरा" कादंबरी मध्ये नैतिकतेचे अनेक उदाहरणे आपल्याला वाचायला भेटतात,मग ते गावासाठी जत्रा भरावी म्हणुन पिढीदर पिढी,साल दर साल चालत असलेल्या भर जत्रेतून आपल्या पराक्रमाने आपल्या गावात जत्रा भरावी म्हणुन खोबऱ्याची वाटी घेऊन येताना मरण आलेल्या बापाचा बदला घेणे असो की,मित्राच्या संरक्षासाठी काळरात्रीला शत्रूवर तुटून पडणे,आपल्या माणसाला दरोडेखोर म्हणुन इंग्रज शासनाने डांबून ठेवल्यावर त्याला सोडवून आणणे असे अनेक उदाहरणे आपल्याला "फकिरा" कादंबरीत पाहायला मिळते...
गोरगरिबांचा नायक नजरेसमोर ठेवणारी 'फकिरा' कादंबरी मराठी साहित्यात विश्वात खुप मोलाची अन् महत्त्वाची समजली जाते अन् ती आहे सुद्धा.कादंबरीच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत.भारतीय भाषांसह अनेक इतर अनेक देशांच्या भाषेत फकिरा अनुवादित झाली आहे.
समाजात बदल,विचारांची क्रांती घडवुन आणणारी कादंबरी म्हणून 'फकिरा' कायम वाचणाऱ्यांचा मनात घर करून बसली आहे.'फकिरा' वंचित समाजातील अंधश्रद्धा,अशिक्षितपणा आणि दारिद्र्यावर भाष्य करू बघत आहे अन् यामुळे बऱ्याच अंशी समाजात परिवर्तन झालेही आहे.
Written by,
Bharat Sonwane ....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा